Maharashtra Election: मनोज जरांगेंचा उद्या अंतिम फैसला; कुणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?

Manoj Jarange: मनोज जरांगे उद्या आपल्या समाज बांधवांशी दीर्घ बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते निवडणुकांसंदर्भात निकाल घेणार आहेत.
Maharashtra Election: मनोज जरांगेंचा उद्या अंतिम फैसला; कुणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?
Manoj Jarange Patil On Hunger StrikeSaam Tv
Published On

आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षण देण्याची मनोज जरांगेची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या उमेदवारांना पाडायचं असा निर्धार जरांगेंनी केलाय. सध्या अंतरवलीत खलबतं सुरु आहेत. जरांगे काय राजकीय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. पाहूया एक रिपोर्ट

राज्यात आचारसंहिता लागली पण राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. त्यामुळे गावागावातील मराठा समाजाचा हिरमोड झाला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटीलही आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला डावलल्यावर काय होतं? हे सत्ताधाऱ्यांना दाखवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. फडणवीसांवर हल्लाबोल करत भाजपचा सुपडा साफ करणार असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.

जरांगे पाटील यांनी शनिवारी दुपारी अंतरवली सराटीत तज्ज्ञांची बैठक बोलावली. या बैठकीत उमेदवार द्यायचे की उमेदवार पाडायचे? यावर खलबत झाली आहेत. 20 ऑक्टोबरला अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवस अंतरवली सराटीत मोठ्या घडामोडींना वेग येणार आहे.

माझ्या विरोधात खूप मोठा कट रचला जातोय,असा गंभीर आरोप जरांगे यांनी केलाय.

काही मतदारसंघातील मराठा समाजाची मते पाहूयात.

जरांगे लढणार, कुणाला नडणार?

आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात 1 लाख 80 हजार मराठा मतं

जामनेर मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतं

येवला मतदारसंघात 1 लाख 46 हजार मराठा मतं

परळी मतदारसंघात 1 लाख 14 हजार मराठा मतं असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं.

मराठवाडा, प. महाराष्ट्र, प. विदर्भ, खान्देशातील 50 जागांवर जरांगेंची तयारी असल्याची चर्चा आहे.

इच्छुकांचा डेटाही गोळा केला आहे.

जरांगे काय राजकीय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत जरांगेंनी भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिला होता. लोकसभेचा अनुभव पाहता महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com