Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अनधिकृत की अधिकृत? कुस्ती सम्राट काझी यांचा मोठा गौप्यस्फोट

अस्लम काझी यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत काही महत्वाच्या बाबी समोर आणल्या आहेत
kusti maidan
kusti maidanSaam Tv
Published On

Solapur News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही नुकतीच पुण्यात पार पडली.सिकंदर शेख मुळे या महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी स्पर्धांबाबत अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समोर आल्या. राज्यात कुस्ती सम्राट म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडीतील अस्लम काझी यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत काही महत्वाच्या बाबी समोर आणल्या आहेत. (Latest Marathi News)

kusti maidan
PM Modi Rally In Mumbai : मोदींच्या सभेत झाला होता घुसखोरीचा प्रयत्न, आतापर्यंत २ जणांना घेतलं ताब्यात

"पुण्यात (Pune) महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा झाल्या,त्या अनधिकृत की अधिकृत यापेक्षा यंदाच्या वर्षी ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या आहेत त्यातील पैलवानांच नुकसान नहोण्यासाठी जानकर मंडळींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन अस्लम काझी यांनी केलं आहेत.

तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विश्वस्तांबाबत कोर्टात प्रकरण चालू आहे.याचे प्रमुख आजही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब लांडगे हेच आहेत. मात्र रामदास तडस यांनी शरद पवार किंवा बाळासाहेब लांडगे यांना विश्वासात न घेता,महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करताना, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संपूर्ण सहमती असणे आवश्यक आहे. पण तसे झाल्याचे काही दिसत नाही,उलट अशी माहिती समोर येत आहे की,मार्च 2023 या महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.राज्यातील अनेक तालमीतील पैलवान याच्या तयारीला देखील लागले आहेत.

दरम्यान,शासकीय नोकरी प्राप्त करताना खेळाडूंसाठी विशेष कोटा असतो.त्यासाठी त्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे लागते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांना देखील एक प्रमाणपत्र दिले जाते. पण यंदाच्या वर्षी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे प्रमाणपत्र पैलवानांना दिले आहेत,त्यावर बाळासाहेब लांडगे,शरद पवार किंवा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच सहीशिक्का नाही.

kusti maidan
Surjeet Singh Rathore Arrested: अभिनेता सुरजित सिंहला मुंबई पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?

हे प्रमाणपत्र (Certificate) शासकीय नोकरीसाठी (Job) ग्राह्य धरले जाणार नाही ,अशी महत्वपूर्ण माहिती कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी सांगितली. त्यामुळे महाराष्ट्र कुस्ती फेडरेशन आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादात महाराष्ट्र केसरी बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com