Surjeet Singh Rathore Arrested: अभिनेता सुरजित सिंहला मुंबई पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?

करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोड यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Surjeet Singh
Surjeet Singh Saam Tv
Published On

सूरज सावंत

Surjeet Singh Rathore Arrested: करणी सेनेचा नेता सुरजीत सिंह राठोडला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा विनयभंग आणि छळ केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मॉडेलने मुंबईतील बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये सुरजीत सिंह राठोड विरोधात गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरजित सिंह राठोड हे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही तो खूप चर्चेत होता.

Surjeet Singh
Sushant Singh Rajput Birthday: सुशांतला कशी मिळाली पहिली भूमिका, एका अॅक्शनने जिंकले निर्मात्यांचे मन...

सुरजितने सांगितले की, सुशांतच्या निधनाच्या दिवशी रिया चक्रवर्तीला सुरजीतने कूपर हॉस्पिटलच्या शवागारात नेले होते, जिथे पोस्टमॉर्टम नंतर सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या खोलीत संशयीत रित्या मृतावस्थेत आढळला होता. जेव्हा सुशांतचा मृत्यू आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू होती, त्यावेळी सुरजीतने माध्यमांना सांगितले होते की, रियाने हॉस्पिटलच्या शवागारात सुशांत सिंग राजपूतच्या छातीवर हात ठेवत सॉरी बाबू म्हणत रडू लागली होती.

Surjeet Singh
Sushant Singh Rajput: सुशांतच्या बहिणीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा, लाडक्या अभिनेत्याच्या आठवणीत चाहते झाले भावूक...

अखिल भारतीय राजपूत करनी सेनेचा सदस्य सुरजीत सिंह राठोडने सांगितले होते की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू त्याच्या जवळचे नातेवाईक होते. त्याने सुशांत सिंगचा मित्र आणि निर्माता संदीप सिंगवरही गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई पोलीस आणि सीबीआयने संदीप सिंग यांचीही चौकशी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com