राज्यावरील सर्व संकट दूर होऊ दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुराया चरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यावरील सर्व संकट दूर व्हावेत असं साकडं घातलं आहे.

कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. राज्यातील गरिबांना चांगले दिवस येऊदेत. कष्टकरी कामगार शेतमजूर, उद्योजक या सर्वांना सुखाचे आनंदाचे हे वर्ष जावो, कोरोनाची कायमची जाण्याची वेळ आली आहे. पांडूरंगाच्या पुण्याईने हे संकट देखील दूर होईल. राज्यावरील सर्व अडचणी दूर व्हावेत, असं साकड मी घातले आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Ashadhi Ekadashi 2022: श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून मिळाला नवले दाम्पत्याला मान

राज्यात चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या (Farmers) आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी शासन कटीबद्ध आहे. आम्ही पहिल्याच बैठकीत जलयुक्त शिवार योजना सुरु केली आहे. आज आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आहे. त्यांनीही राज्याला चांगले दिवस येण्यासाठी योजना राबवा. केंद्र तुमच्या पाठिमागे आहे, असंही शिंदे म्हणाले.

आज मला तुमच्या आशिवार्दामुळे हा दिवस मिळाला आहे. हे मी कधीही विसरणार नाही. या राज्यातील जनतेसाठी जेवढे काही करायला मिळेल तेवढे मी करेन, असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. बाहेरच्या राज्यात जशी इतर देवस्थान असताता. त्या ठिकाणी रस्ते जशी असतात, परिसर स्वच्छ असतो. तशा पद्धतीचा पंढरपुरचा आराखडा तयार करण्याच्या मी सूचना दिल्या आहेत. या निधीत काही कमी पडू देणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
शिंदेंच्या ४ पिढ्यांनी केली पांडूरंगाची पूजा; संभाजी ते रुद्रांश शिंदेंकडून शासकीय महापूजा

'हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. यासाठी आम्ही काम करणार आहे. पंढरपुरात निधी देत असताना हात आखडता घेणार नाही. कोणताही घटना असमाधानी असता कामा नये, सर्वांना आम्ही समाधान करणार नाही. आम्ही सर्वसामान्य आहोत. आमचे सर्व आमदार तळागाळातून आले आहेत, त्यामुळे सर्व सामान्यांची आम्ही कामे करणार आहे, असंही शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com