
यंदाही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने टोलमाफी केलीय. ही टोलमाफी १८ जून ते १० जुलै या कालावधीत लागू असणार आहे. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आलंय. पंढरपूरच्या जाणाऱ्या १० पालखीमार्गावर ही टोलमाफी असणार आहे. (Ashadhi Wari 2025 Toll Free Pass Sticker)
वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. ही बैठक २८ मे रोजी पार पडली होती. या बैठकीत वारीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. टोलमाफीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांवर, भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी २०२५ गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करणं आवश्यक आहे.
वाहनांच्या आणि पालखीच्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओ ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. देण्यात आलेले पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह विभागामार्फत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात.
पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत टोलमाफीची सवलत असेन. पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी ही सवलत असेल अशा सूचना देण्यात आल्यात.
मुंबईमधील सायन-पनवेल महामार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग,
मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग,
पुणे-सोलापूर,
पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग, त्याशिवाय मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग,
मुंबई-पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, तसेच इतर जिल्हा मार्ग.
टोलमाफीसाठी पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेत पालख्यांच्या वाहनांना स्टिकर्स लावावे लागतील. हे स्टिकर्स भाविकांना संबंधित जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, शाखा, चौकी येथून मागणीप्रमाणे टोल फ्री पास मिळतील. हा पास किंवा स्टिकर्स घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक पोलीस चौकीत जावे लागेल. तिथे अर्ज भरून दिल्यानंतर टोलमाफीचा पास मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.