

सांगली - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण वय २३ हे जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आणि त्यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. (Latest Sangli News In Marathi)
हे देखील पहा -
पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले. चार महार येथून त्यांच्या सेवेला सुरवात झाली होती. दरम्यान, एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाली होते.
जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले. रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील सहकरी साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर बहीण शिक्षण घेत आहे.शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच शोककळा पसरली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.