Ration : ...तर 'गिव्ह इट अप'साठी सक्ती करु; 'त्या' रेशन कार्डधारकांना इशारा

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडण्यासाठी निरंतर मोहीम शासनाने हाती घेतली आहे.
Ration Shop, Ration , anna suraksha yojana
Ration Shop, Ration , anna suraksha yojanasaam tv
Published On

Latur News : अन्न सुरक्षा योजनेच्या ( anna suraksha yojana) निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांनी योजनेतून स्वतः बाहेर पडावे म्हणून 'गिव्ह इट अप' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उक्रमात सप्टेंबरअखेरपर्यंत सहभागी होऊन अन्न सुरक्षा योजनेतून स्वतःहून बाहेर पडावे अन्यथा शासनाच्या निर्देशानुसार निकषात बसत नसलेल्या रेशन (ration) कार्डधारकांवर (ration card) सक्तीने कारवाई करण्यात येईल असा इशारा लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे.

"गिव्ह इट अप' या उपक्रमाला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेशनच्या धान्याची गरज नाही किंवा उत्पन्न जास्तीचे आहे, अशा नागरिकांना रेशनचे धान्य बंद करुनही शिधापत्रिका चालू ठेवणे शक्य आहे.

Ration Shop, Ration , anna suraksha yojana
Crime : 'त्या' निलंबीत पोलीसाची अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यास मारहाण

रेशनवरील धान्य घेण्याची गरज नसेल तर, रेशनधारकांना अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडता येईल. रेशनवरील धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क करावा. धान्याचा हक्क सोडल्यास इतर गरजूंपर्यंत धान्य देता येईल, त्यामुळे गरज नसलेल्या रेशनकार्डधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने यांनी केले.

Ration Shop, Ration , anna suraksha yojana
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडण्यासाठी निरंतर मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे गरज नसलेल्या नागरीकांनी किंवा उत्पन्न वाढलेल्या नागरिकांना रेशनवरील धान्य बंद करता येईल. अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील रेशनकार्डधारकांनी खोटी माहिती देऊन धान्य घेत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांकडून धान्याची रक्कम शासनाच्या निर्देशानुसार वसुल करता येणार आहे.

Ration Shop, Ration , anna suraksha yojana
Court : 'मविआ' ला 'सर्वाेच्च' चा दणका; शिंदे-फडणवीस सरकारला विचारला प्रश्न

या अनुषंगाने शासन कधी काय निर्णय घेईल, हे सांगता येत नसल्याने निकषात बसत नसलेल्या रेशनकार्डधारकांनी स्वतःहून अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडनेच योग्य होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com