Anil Awachat Passes Away: अनिल अवचट यांच्या निधनाने सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी, नेत्यांकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे आज निधन झाले.
Anil Awachat
Anil AwachatSaam Tv
Published On

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे आज निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं. त्यांच्या निधनावर राज्यातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे (Anil Awachat Passes Away Political Leaders Express Grief).

Anil Awachat
Anil Awachat Passes Away: ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले - शरद पवार

"ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वंसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शोक व्यक्त केला.

पुण्याच्या महापौरांकडून शोक व्यक्त

"सुप्रसिद्ध आणि संवेदनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट (Anil Awachat) यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ उभा करुन दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे होते. डॉ. अनिल अवचट यांच्या स्मृती यथोचित जतन करण्याचा पुणे महापालिकेच्या माध्यमातून असेल. समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली", असं महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहली.

Anil Awachat
हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले; शरद पवारांची अनिल अवचट यांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्र्यांकडून अनिल अवचट यांना श्रद्धांजली

"ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतीशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, 'मुक्तांगण' परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली.

बहुआयामी आणि व्यासंगी व्यक्तीमत्व आज आपल्यातून गेले - पृथ्वीराज चव्हाण

"महाराष्ट्राला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. साहित्यिक, शिल्पकार, संगीताची आवड आणि सामाजिक जाणीव असणारे एक बहुआयामी आणि व्यासंगी व्यक्तीमत्व आज आपल्यातून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली", असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी श्रद्धांजली वाहली.

संजय राऊत ऑन अनिल अवचट

अनिल अवचट यांच्या निधनाची बातमी कळाली, मुक्तांगणाच्या माध्यमातून जे काम केलं ते महाराष्ट्राला, देशाला जगाला आदर्श देणारे होते. तरुण पिढीवर ज्याप्रकारे अंमली पदार्थांचा अमल आहे. अवचट यांनी नशा मुक्तीच्या कामात झोकून दिलं आहे. मुक्तांगणामधून त्यांनी अनेक कुटुंब अनेक तरुणांना सावरले. अत्यंत संवेदनशील लेखक होते, पत्रकार होते चांगले वक्ते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका थोर समाज सेवक लेखकाला मुकलाय. मी शिवसेनेतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) श्रद्धांजली वाहली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com