Amravati News: नवनीत राणा व रवी राणा यांची पोलीसात तक्रार; युवक काँग्रेसकडून ईडी चौकशीची मागणी

Amravati News : नवनीत राणा व रवी राणा यांची पोलीसात तक्रार; युवक काँग्रेसकडून ईडी चौकशीची मागणी
Navneet Rana Ravi Rana
Navneet Rana Ravi RanaSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला. तसेच रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यावर केलेल्या टीकेच्या विरोधात राणा (Amravati) दाम्पत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Navneet Rana Ravi Rana
Sangram Jagtap News: आता आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल; मराठा आरक्षणावर आमदार संग्राम जगताप यांचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवारी (१२ सप्टेंबर) दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कडक नोटा घेतल्या आणि काम दुसऱ्याचं केल्याचे विधान केले होतं. तसेच काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्यावर रवी राणा यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. यावर अमरावतीत युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. 

Navneet Rana Ravi Rana
Nanded Crime News: गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची झोपेतच हत्या; सैन्यदलात कार्यरत पतीचे कृत्य, आरोपी पती स्वतःच गेला पोलिसात

युवक काँग्रेसकडून (Congress) अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच नवनीत राणा यांची ईडी व आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत चौकशी करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी आमदार बळवंत वानखडे यांचा अपमान केल्याने रवी राणा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसचे वैभव देशमुख यांनी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com