Amravati School Timing: अमरावतीत 20 मार्चपासून दुपारी शाळा राहणार बंद; पहिल्या सत्रातच भरणार सर्व शाळा

Amravati School : अमरावती जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. उन्हाचा चटका वाढल्याने येथील प्रशासनाने दुपार सत्रातील शाळा बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Amravati School Timing
Amravati School TimingSaam Tv
Published On

मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. यात विदर्भ ब्रम्हपुरी येथील तापमानाने उच्चांकी गाठलीय. येथील तापमान 42 डिग्री सेल्सिअस अंशापेक्षा जास्त होते. पुणे शहर आणि जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत चाळीशी पार तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे अमरावतीमधील शाळांचे वेळापत्रक बदलेले आहे.

अमरावती जिल्ह्यातील तापमान वाढल्यामुळे येथील शाळा आता दुपारी बंद राहणार आहेत. अमरावती जिल्ह्यासह विदर्भात तापमान 40 अंशावर गेलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 अशी शाळांची वेळ राहणार आहे. हा निर्णय खाजगीसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांना लागू असेल.

Amravati School Timing
School Open: सीबीएसई पॅटर्न; पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरणार १ एप्रिलपासून

या निर्णयाने 2 लाख 56 हजार विद्यार्थी आणि त्यांचे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदाच मार्च महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दुपारच्या शाळा बंद तर सकाळी शाळा चालू राहणार आहे, त्यामुळे उन्हाचे चटके विद्यार्थ्यांना सहन करावे लागणार नाही, शिक्षण विभागाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढलाय.

Amravati School Timing
School Timing: राज्यात 1 एप्रिलला भरणार शाळा? 13 जून ऐवजी 1 एप्रिलला वाजणार घंटा

यामुळे शहरात दुपारनंतर रस्त्यावर सन्नाटा पाहायला मिळतोय. सध्या पारा 40.03 सेल्सिअस अंशापर्यंत पोहचला आहे. वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळते, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहेत.

पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील कमाल तापमान 41°C पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीउष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकजडून केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com