Amravati Lok Sabha : उमेदवारांचा निवडणूक खर्च जुळेना; निवडणूक अधिकाऱ्यांकडून तिघा उमेदवारांना नोटीस

Amravati News : लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा यावर्षी २५ लाखाने वाढवून ती ९५ लाख केली होती. दैनंदिन खर्चाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना दिल्या होत्या
Amravati Lok Sabha
Amravati Lok SabhaSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी उमेदवारांना निवडणूक आयोगाने आखून दिल्यानुसार खर्च सादर करावयाचा होता. मात्र उमेदवारांनी दिलेला खर्च जुळून येत नसल्याने अमरावती लोकसभा मतदार संघातील नवनीत राणा यांच्यासह बळवंत वानखेडे व दिनेश बुब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

Amravati Lok Sabha
Bhandara News : रोहयोच्या कामावर बोगस मजूर; रोजगार सेवकांनी लाटले शासनाचे पैसे, तुमसर तालुक्यातील प्रकार

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) खर्चाची मर्यादा यावर्षी २५ लाखाने वाढवून ती ९५ लाख केली होती. त्यानुसार त्याचा दैनंदिन खर्चाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना सर्व उमेदवारांना दिल्या होत्या. त्यानुसार उमेदवारांच्या खर्चाच्या सॅडो रजिस्टरनुसार खर्च जुळत नसल्याने (Amravati) अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना नोटीस बजावल्या आहे.

Amravati Lok Sabha
Kharip Hangam : कृषी केंद्राची तपासणी मोहीम; बोगस बियाणं, वाढीव दराने विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

सॅडो रजिस्टर मध्ये सर्वाधिक खर्च माहायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्या तुलनेत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब  व महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी २८ लाखपर्यंत खर्च दाखवला आहे, शासनाच्या सॅडो रजिस्टरनुसार नवनीत राणा यांनी १ कोटी २६ लाख ६९ हजार १७६ रुपयांचा खर्च केला आहे. तर राणा यांनी १७ लाख ३० हजार ५७६ खर्च दाखवला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी सॅडो रजिस्टनुसार ५८ लाख २२ हजार २५२ रुपये खर्च केला असून त्यांनी २४ लाख १ हजार ७४७ रुपये खर्च दाखवला आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार यांचा सॅडो रजिस्टनुसार ७७ लाख १३ हजार ७८४ रुपये खर्च केला असून त्यांनी २८ लाख ४७ हजार ५५४ रुपयाचा खर्च दाखवला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com