

अमरावतीच्या वलगाव येथे दोन जिवलग मित्रांची हत्या
कबूतर चोरीच्या जुन्या वादातून घडली हत्याकांडाची घटना
पाच तरुणांनी धारदार शस्त्राने वार करत संपवलं
या प्रकरणी सरपंचासह ७ जणांना अटक करण्यात आली
अमरावतीमध्ये २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आली होती. वलगाव येथील या दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरले आहे. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वलगावच्या सरपंचासह ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. ५ मुख्य आरोपीसह वलगाव येथील सरपंच सुधीर उगले यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करत त्यांना संपवण्यात आले होते. या घटनेमुळे वलगाव हादरले आहे. वलगाव बसस्थानक परिसरात ५ हल्लेखोरांनी या दोन मित्रांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती.कबूतर चोरल्याच्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन तरुणाची हत्या करण्यात आली होती.
संजोग जोशी (वय २४ वर्षे) आणि ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक आणि क्रूर होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांनी जागीच प्राण सोडले.
अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांची हत्या करणारे पाचही आरोपी हे २५ वर्षे वयोगटातील आहेत. या प्रकरणात सरपंचाचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलिस करत आहेत. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.