Amravati News: दुर्दैवी घटना! पेरणी सुरू असतानाच घात झाला... वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; २ गंभीर जखमी

Amravati Rain News: अमरावती जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदूर बाजार आणि नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात अतिवृष्‍टीची नोंद झाली आहे.
Amravati News
Amravati NewsSaamtv
Published On: 

अमर घटारे, प्रतिनिधी...

Amravati News: अमरावती जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदूर बाजार आणि नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात अतिवृष्‍टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक नाल्‍यांना पूर आला आहे. काही भागांत तर शेतजमीनदेखील खरडून गेली आहे.

एकीकडे पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असतानाच दर्यापूर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Amravati Rain Update News)

Amravati News
Beed Farmer News: बीड जिल्ह्यात खरीपाच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण; पण पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर फाट्यावर वीज पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. शेतात पेरणी सुरू असताना अचानक मुसळधार पाऊस झाला. यात शेतात काम करणाऱ्या मजुरांची तारांबळ उडाली. यावेळी वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

माहूराज खडे असे मृत शेतकऱ्याचे नाव नाव आहे. तर चंद्रशेखर अभ्यंकर आणि बाळू रामगड हे दोघे गंभीर जखमी झालेत. दुर्घटनेतील जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी स्थानिक आमदार बळवंत वानखडे यांनी जाऊन जखमींची भेट घेतली.

Amravati News
Pune Politics: दादा... जरा आता आमचाही विचार करा की; मनसेच्या वसंत मोरेंची थेट अजित पवारांना विनंती

चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

दरम्यान, बोरीवलीमधूनही (Borivli) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असताना सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली रोड परिसरात नुकतीच घडली.

बाळासाहेब प्रभू (55 वर्ष) हे चौथ्या माळ्यावरून पडून गंभीर जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी जखमी कामगाराला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com