अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी करिता उमेदवारांना चिन्हाचे वाटप आज करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हि संपूर्ण प्रक्रिया पार पडली यावेळी प्रत्यक्ष उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये नगारा, शिट्टी, विमान, कपबशी अशा चिन्हांचे वाटप करण्यात आले. सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलला त्यांच्या मागणी प्रमाणे चिन्ह वाटप करण्यात आले तर, इतर उमेदवारांना त्यांच्या नामनिर्देशन अर्जात पसंती दिल्यानुसार चिन्हांचे वाटप करण्यात आले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक पदाच्या २१ जागांसाठी ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असून २१ पैकी ४ जागांसाठी अविरोध निवड होण्याची शक्यता असल्याने १७ जागांसाठी अंतिम ५० उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. गुरुवारी उमेदवारांना चिन्ह वाटप पार पडले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समक्ष उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना चिन्ह वाटप करण्यात आले. सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल अशा दोन प्रमुख पॅनलमध्ये हि निवडणूक लढवली जाणार असून सहकार पॅनल साठी 'नगारा' तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांसाठी 'शिट्टी' या निवडणूक चिन्हाला मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्रसिंह चव्हाण यांनी दिली.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.