साई संस्थान पुन्हा वादात; पुरातन साई मंदिराच्या बांधकामात बदल...

साई मंदिरातील फोटो व्हिडिओ मनाई असतानाही व्हायरल केल्याप्रकरणी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
साई संस्थान पुन्हा वादात; पुरातन साई मंदिराच्या बांधकामात बदल...
साई संस्थान पुन्हा वादात; पुरातन साई मंदिराच्या बांधकामात बदल...Saam TV
Published On

शिर्डी: साई मंदिरातील फोटो व्हिडिओ मनाई असतानाही व्हायरल केल्याप्रकरणी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ताजी असताना त्यापाठोपाठ आता दुसरा वाद निर्माण होणार आहे. शंभर वर्षांहून अधिक जुने बांधकाम असलेल्या साई मंदिराच्या वास्तूत पुरातत्त्व विभागाचा सल्ला न घेता काही बदल करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीच्या या पुरातन मंदिरातील संभाव्य बदलांची सुरक्षा कारणास्तव दहशतवाद विरोधी पथकाला कल्पना देण्यात आली होती का या दोन मुद्द्यावरून आता नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.

साई संस्थान पुन्हा वादात; पुरातन साई मंदिराच्या बांधकामात बदल...
तब्बल 24 शाळांमध्ये चोरी करणारे गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

माहितीच्या अधिकारतील कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटलंय पुरातन साई मंदिरात मध्ये बदलून गेलेले साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी तदर्थ समितीची मान्यता घेतली नव्हती परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या बदलाची माहिती घेण्यासाठी तदर्थ समितीचे अध्यक्ष जिल्हा प्रधान्य न्याधीश अणि आणखी एका सदस्य सह साई मंदिरात गेले त्यावेळी बगाटे यांच्या सांगण्यावरून या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व काही फोटो समाज माध्यमात व्हायरल करण्यात आले, त्यावरून फोटो व्हिडिओ व्हायरल करणारे संस्थानच्या अधिकाऱ्यासह 6 जणांना करण्यात आली. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार बगाटे असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आपण लावून धरणार असल्याचं संजय काळे यांनी म्हटले.

साईबाबांचे समाधी मंदिर ही पुरातन आहे. साईबाबांनी समाधी घेऊन 110 वर्षे पूर्ण झाली आहे. पुरातत्व विभागाने शंभर वर्षे पूर्ण झालेला हा वाडा ताब्यात घेतला आहे. बदलून गेलेले साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साई मंदिरमध्ये बरेच बदल केले आहे. प्रधान न्यायाधीश आणि सदस्य बदल केल्याचं साई मंदिरात पाहणी करता गेले होते साई मंदिर मध्ये एक पारायण कक्ष आहे. तो तोडून त्या ठिकाणी मिटींग हॉल करण्यात आला असल्याचं मला माहिती अधिकारात समोर आल आहे. असा बदल करण्याचा बगाटे यांना कोणताही अधिकार नाही त्यामुळे त्यांनी मंदिराच्या सुरक्षेला धोका पोचवला आहे. अशा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com