

अमर घटारे
Accident News: अमरावती येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. अमरावती ते खंडवा प्रवास करणाऱ्या एस टी बसचा मेळघाटात मोठा अपघात झालाय. या अपघातात २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दु्र्घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचाव कार्य सुरु केलं आहे. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा एस टी बस मेळघाटात पोहचली असता एअर पाईप फुटला. त्यामुळे १७ वा टर्न घटांग येथे बस ४० फुट खोल दरीत बस कोसळली आहे. या अपघातात २ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सेमाडोह आरोग्य केंद्रात त्यांना भर्ती करत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अमरावती (Amravati) खंडवा एस टी बसचा घाटांग जवळ ब्रेक एअर पाईप फुटल्यामुळे अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समृद्धी महामार्गावर नाशिकजवळ भीषण अपघात
नागरिकांच्या सुविधेसाठी तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग जीवघेणा ठरत आहे. आज सकाळी नाशिकजवळ (Nashik) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कारवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कारने महामार्गावरील कठड्याला इतकी जोरदार धडक दिली की कारचा पुढील भागाचा अक्षरश: चक्काजूर झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.