शरम तो उनको आती है...! मिटकरींचा फडणवीसांसह राज ठाकरेंवर निशाणा (व्हिडीओ पाहा)

अमाेल मिटकरी हे इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत बोलत होते.
amol mitkari & devendra fadnavis
amol mitkari & devendra fadnavissaam tv

सांगली : सध्या राज्यात माेठ्यानं बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. भाजपची (bjp) एक टीम पवार साहेबांवर बोलण्यासाठी नेमली आहे. गोवा जिकल्यानंतर विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नागपूरमध्ये राेड शाे करीत महाराष्ट्रात सत्ता बदल होणार अशी आराेळी ठाेकरी. कोल्हापूरच्या पाेटनिवडणुकीनंतर (kolhapur byelection) गप्प पडलेत सगळे असे म्हणत अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी शरम तो उनको आती हे जो शरम को शर्माते हे.. ये तो इतने बेशरम हे की शरम भी इनको शर्माते है असा टाेला विविध दाखले देत भाजप नेत्यांसह राज ठाकरेंना (raj thackeray) सांगलीत (sangli) लगावला आहे. (amol mitkari latest marathi news)

अमाेल मिटकरी हे इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी मिटकरी म्हणाले राज ठाकरे म्हणतात पवार साहेब शिवाजी महाराज यांचे नाव कधी घेत नाहीत पण त्यांची मुलाखत पहा असे म्हणत मुलाखतीचा व्हिडीओ लावून उपस्थितांना म्हणाले हे पवार साहेब आहेत आणि त्यांच्या ह्रदयात शिवाजी महाराज आहेत.

amol mitkari & devendra fadnavis
नक्षलवादी नर्मदाच्या मृत्यूचा ठपका पाेलिसांवर; २५ एप्रिलला दंडकारण्य बंदची हाक

अमोल मिटकरी म्हणाले खान साहेब म्हणजेच राज ठाकरे नुसते नकला करतात तर किरीट सोमय्या दरराेज काही ना काही घेऊन येत आज माेठा घाेटाळा बाहेर काढल्याचा आव आणतात. हे सगळं ढाेंग असल्याचे मिटकरींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

amol mitkari & devendra fadnavis
वडिलांची पायपीट थांबण्यासाठी मुलगा झाला संशाेधक; बनवली Electric Bicycle
amol mitkari & devendra fadnavis
Fire: पुणे नगर महामार्गावर भीषण आग; फर्निचर मॉल, मोबाईल शॉपसह ८ दुकानांना झळ
amol mitkari & devendra fadnavis
IPL 2022: बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्जच्या लढतीचे ठिकाण बदललं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com