अंबरनाथमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरवर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

अंबरनाथमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरवर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Crime news
Crime newsSaam tv
Published On

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका लेबर कॉन्ट्रॅक्टरवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात लेबर कॉन्ट्रॅक्टर थोडक्यात बचावला असून गोळीबाराची ही घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ (Ambernath) पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. (Ambernath news Firing on a labor contractor Incident captured on CCTV camera)

Crime news
रात्री बहिणीकडे जेवण करून आला अन्‌ घेतला गळफास

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव परिसरात मुकूल पाल्म नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत सफायर नावाच्या इमारतीत तळमजल्यावर लेबर कॉन्ट्रॅक्टर कमरुद्दीन खान यांचे ऑफिस आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कमरुद्दीन हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना ऑफिसच्या खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर दोन (Crime News) गोळ्या झाडल्या. मात्र या गोळ्या कमरुद्दीन यांना न लागता भिंतीवर लागल्या.

बांधकाम व्यावसायिकासोबत वाद

गोळीबाराची ही घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली. या प्रकरणात पोलिसांनी आयपीसी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी कमरुद्दीन शेख यांनी एका संशयिताचे नाव घेतले असून याच परिसरातल्या एका जागेवरून कमरुद्दीन खान यांचे गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या एका बांधकाम व्यावसायिकासोबत वाद आहेत. त्यामुळे हा हल्ला नेमका त्याच वादातून झालाय? की यामागे अन्य काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस (Police) आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com