Ambarnath News : नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेचं धक्कादायक कृत्य; महापालिकेच्या इमारतीवर गेली अन्...

Ambarnath Marathi News : अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीवरून एका महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला.
Ambarnath Crime News
Ambarnath Crime NewsSaam TV
Published On

Ambarnath Crime News : अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीवरून एका महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्या महिलेला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे. थरकाप उडवणारी ही घटना बुधवारी घडली. (Latest Marathi News)

Ambarnath Crime News
Beed Accident News : बीड-केज मार्गावर भीषण अपघात; माजी नगरसेवकाचा जागीच मृत्यू, पोलीस जमादार जखमी

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला औरंगाबादची (Aurangabad) असून नोकरी मिळवण्यासाठी पालिका कार्यालयात आली होती. या महिलेचे आपल्या पती बरोबर जमत नसल्याने आणि तिच्या पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याने ही महिला आर्थिक विवंचनेत सापडली होती.

या महिलेने पूर्वी नर्स म्हणून रुग्णालयामध्ये काम देखील केले. मात्र आता नोकरी नसल्यामुळे तिच्या समोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता. बुधवारी नोकरीच्या शोधात ही महिला अंबरनाथ (Ambarnath) महापालिका कार्यालयात आली, मात्र तिला कोणत्याही अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्यामुळे ती त्रस्त झाली.

Ambarnath Crime News
Bhandara Crime : प्रेमविवाहानंतर तरुणीने संपवलं जीवन; १ वर्षाची चिमुकली पोरकी, मन सुन्न करणारी घटना!

त्यानंतर ही महिला थेट महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. सुरूवातीला तिने आपल्या पायातील चप्पल आणि पर्स खाली (Crime News) फेकली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. महिलेने उडी मारण्याच्या आधीच तिला पकडले. त्यानंतर त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com