Ambadas Danve News: शासन दारी गेलं असतं तर मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली नसती; अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा

पिकं हातची गेलेली आहेत, कृत्रिम पाऊस होत नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय.
Ambadas Danve
Ambadas DanveSaam tv

Maharashtra Political News:

मुंबईत मंत्रालयात मंगळवारी अमरावती येथील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आक्रमक होत संरक्षण जाळीवर उड्या मारल्या. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

"सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. सरकार काही करेल की नाही ही शंका आहे. हे सरकार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. राज्याची नमो योजना कुठे गेली? ही पिके हातची गेलेली आहेत, कृत्रिम पाऊस होत नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय.

Ambadas Danve
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरे गट-काँग्रेसचे सूर जुळले, महत्वाच्या मुद्द्यावर एकमत

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर शासन आपल्या दारी ही योजना राबवली जात आहे. या योजनेवरुन देखील दानवेंनी टीकास्त्र सोडलंय. 2024 लवकर यायला हवे. शासन त्यांच्या दारी गेलं असतं तर मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असं दानवे म्हणालेत.

सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी

अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंर सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार आल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याची पदे अजित पवार यांच्याकडे गेलीत. भाजपची नाराजीच भाजपला भारी जाईल, असा इशारा देखील दानवेंनी दिला आहे.

Ambadas Danve
Kalyan Political News: दहीहंडी कुणाची फुटणार? कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com