Amravati : अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली, पहिल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग

Amravati Airport : १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे लोकार्पण पार पडले. मुंबईहून आलेले पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
Amravati Airport :
Amravati Airport :Amravati Airport :
Published On

Amravati Airport Inauguration : गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रत्यक्षित असलेले अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,एकनाथ शिंदे,केंद्रीय उड्डाण मंत्री कीजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. आजपासून अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती विमानसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विमानाचे बुकिंग हाऊसफूल होते.

अमरावती विमानतळासोबतच आशिया खंडातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे देखील आज लोकार्पण होणार पार पडणार आहे, या विमानतळामुळे अमरावतीच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, ७२ आसनी विमान अमरावती ते मुंबई व मुंबई ते अमरावती असे आठवड्यातून तीन वेळा असेल. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस आठवड्यातून विमानसेवा असेल.

पहिल्या विमानाचे सुरक्षित लँडिंग -

१४ वर्षानंतर आज अखेर अमरावतीकरांचं स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई वरून पहिलं विमान अमरावती विमानतळावर सुरक्षित लँड झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यासह इतर मंत्र्यानी पहिल्या विमानाने प्रवास केला. अमरावती विमानतळावर विमान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. पहिलं विमान लँड झाल्यानंतर अमरावती विमानतळावर मोठा जल्लोष करण्यात आला.

Amravati Airport :
Crime : थोरल्याशी वाद, धाकट्याचा खून! ६ जणांनी अपहरण केलं अन् तरूणाचा जीव घेतला, अहिल्यानगर हादरले

अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे नवनिर्मित अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी केले आहे.

Amravati Airport :
MPSC परीक्षा पुढे ढकला, PSI पदसंख्या वाढवा; पुणे आणि संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com