
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत राजकीय घमासान सुरू होणार यात शंका नाही. सध्याचे चित्र पाहता विद्यमान आठही आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. जाणून घेऊ साताऱ्यात कसं महाभारत रंगणार आहे.
संजीवराजे निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांनी हाती तुतारी घेतली, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता.
भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना अडवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत.
पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकवटले आहेत.
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच काट्याची लढत रंगण्याची चिन्हं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील विद्यमान आमदार, त्यांच्याविरोधात भाजपकडून मनोज घोरपडे, धैर्यशील कदम इच्छुक आहेत.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसलेंमध्ये चुरस रंगणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सक्षम उमेदवाराच्या शोधात,मविआ उमेदवारावर गणितं अवलंबून आहे.
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंविरोधात मविआकडे सक्षम उमेदवार नाही, जागा ठाकरे गट की पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार यावर मविआचा उमेदवार ठरणार.
एकूणच जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा समोरासमोर लढती होतील.सध्या पक्षीय बलाबलात महायुतीचे पारडे जड दिसत असलं, तरी महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कोण यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.