Nagpur News: पोटच्या मुलाने केला घात; आईवर शस्त्राने वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरल

सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे.
crime news
crime newssaam tv
Published On: 

Nagpur News: नागपूर येथून काळीज सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका व्यसनाधीन मुलाने स्वत:च्या आईची हत्या केली आहे. ही थरारक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वनदेवीनगरात काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे. या धक्कादायक घटनेनं नागपूर हादरुन गेलं आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा दारुच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. यातच त्याने विळ्याने वार करत आईला संपवले.पोलिसांनी व्यसनाधिन मुलास अटक केली आहे.गोविंद संतराम काटेकर असं आरोपी मुलाचें नाव आहे. तर विमलाबाई संतराम काटेकर असे मयत वृद्ध आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी घरात कुठलंही काम करत नव्हता. आईच्या जीवावर तो जगत होता. सातत्याने दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी करायचा. त्यातून त्याने अनेकदा म्हाताऱ्या आईला मारहाणही केली होती.आईला आपलं मुलं कसंही असलं तरी ते प्रिय असतं. त्यामुळे मुलाच्या या वागण्याने एकदिवस आपल्याला जीव गमवावा लागेल असा विचार त्या माऊलीच्या मनात कधीच आला नाही.

crime news
Nagpur Crime News : शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिलेसोबत नराधमांचं हैवानी कृत्य | SAAM TV

नेहमी प्रमाणे आई घरी असताना मुलाने तिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र सतत मुलाच्या दारू पिण्याने त्याचे आरोग्य देखील खराब होत चालले होते. आपल्या मुलाच्या काळजीने आईने पैसे देणार नाही असं सांगितलं. त्यावर मुलाला राग अनावर झाला. त्याने पुन्हा आईला मारहाण केली. अशात त्याने घरात असलेला विळा आईवर चालवला आणि यातच आईला आपला जीव गमवावा लागला. पोलीस या घटनेत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.