रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Akola Police Assault Minor End Life Case: कायद्याचे रक्षक आता भक्षक झालेत की काय, याची प्रचीती देणारी घटना समोर आलीये. अकोल्यातील एका घटनेनं खाकी वर्दीला काळीमा फासलाय. खाकीच्या आड दडलेल्या नराधमाचं नेमकं काय प्रकरण आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
police officer accused of assaulting minor in Akola
police officer accused of assaulting minor in Akolasaam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता अकोला हादरलंय... नराधमांना कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय... अकोल्यात खाकी वर्दीला काळीमा फासणारी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आलीय... एका पोलीस कर्मचाऱ्यानं घरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला... ही घटना इथेच थांबत नाही... जबर मानसिक धक्का बसलेल्या पीडित मुलीनं या घटनेनंतर टोकाचं पाऊल उचललं. तिनं आत्महत्या केली.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन केलं... फरार आरोपी पोलिसावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.... इतकं नाहीतर आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या इतर पोलिसांवरही कारवाईची मागणी केलीये.

बाळापुरातील अकोला नाका परिसरात रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर पीडित मुलीचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला. त्यामुळे खाकीच्या आड दडलेल्या नराधमावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com