Akola : एक रुपयाचा व्यवहार नसतानाही नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी; 63,00,000 रुपयांचा सोयाबीन खरेदी घोटाळा उघड

Akola News : अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील सोयाबीन खरेदी घोटाळा सध्या राज्यभरात गाजत आहे. यात खरेदी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ज्यात सुमारे ६३ लाख ४४ हजार ९२४ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. तब्बल १२९७ क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार हा प्रकार आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांसह १२ जणांविरुद्ध आर्थिक व फौजदारी गुन्हा झाला. 

अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील सोयाबीन खरेदी घोटाळा सध्या राज्यभरात गाजत आहे. यात खरेदी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे. कंपनीने १५ फेब्रुवारीनंतर एकूण १९७२३.९२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. मात्र नाफेडच्या गोदामात केवळ १८४२६.९२ क्विंटल माल जमा झाला आहे. उर्वरित १२९७ क्विंटल सोयाबीनची फक्त कागदोपत्री ऑनलाईन खरेदी झाल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या खरेदी केंद्रावर ६८ शेतकऱ्यांच्या नावावर सुमारे ६३ लाख ४४ हजार ९२४ रूपयांनी शासनाला चुना लावला.

Akola News
Nanded : गावात देशी दारूचे दुकान; ग्रामपंचायत हद्दीतून हटवण्यासाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको

कंपनीला बदनाम करण्याचा आरोप 
अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी अंदुरा गावातील विविध शेतकरी हिताचे उपक्रम राबविल्याने नावारूपास आलेली शेतकरी उत्पादक कंपनी आहे. नाफेड मार्फत पणन विभागाच्या माध्यमातून शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केली जाते. यासाठी अंदुरा येथे सबएजन्ट म्हणून कंपनी या नोंदणीकृत संस्थेला खरेदीसाठी नियुक्त केले होते. मात्र, कंपनीला बदनाम करण्यासाठी काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काहींनी हा कट रचल्याचा आरोप कंपनीने केला.

Akola News
Dhule : अवैध गर्भपात केंद्रावर छापेमारी; रुग्णालयाची मान्यता रद्दच्या हालचाली, डॉक्टरसह नर्सवर गुन्हा दाखल

बारा जणांवर गुन्हा दाखल 
कंपनीने सोयाबीन खरेदीसाठी नियुक्त केलेल्या व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरशी काही व्यापाऱ्यांसह नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप कंपनीच्या संचालक मंडळाने केला. यात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी, व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरने सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी केल्या. हा प्रकार लक्षात आल्याने कंपनीने २४ फेब्रुवारी व ४ मार्चला जिल्हा पणन अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली. तसेच दोषींवर कारवाईसाठी पोलीस तक्रारही केली. मात्र, यात कोणतीही कारवाई न केलेल्या जिल्हा पणन अधिकारी मारूती काकडे यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळासह १२ लोकांवर गुन्हे दाखल केले. 

तसेच यात सहभागी व्यापाऱ्यांनी संगनमत करून काही शेतकऱ्यांकडून त्यांचे सातबारे घेतले. एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर एका दिवशी २५ क्विंटल खरेदी करण्याची परवानगी नाफेडने दिली. याचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे सोयाबीन हमीभावापेक्षा खरेदीचा गोरखधंदा राज्यभरात सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली. दरम्यान, राजकीय हस्तक्षेपातून कंपनीला बदनाम केलं जात असल्याचा आरोप कंपनीने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com