Bribe Case : गावचा कारभारी एसीबीच्या ताब्यात; ना हरकत प्रमाणपत्रासाठी घेतले १० हजार

Akola News : गावातीलच एका व्यक्तीला गावातच गॅरेजचा व्यवसाय सुरू करावयाचा होता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडे कर्ज प्रकरण टाकले होते. या कर्जासाठी त्या तरुणाला गावच्या सरपंचाचे ना- हरकत प्रमाणपत्र अपेक्षित होते
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : गावचा कारभार सांभाळणाऱ्या सरपंचानेही प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी केली. यातील पहिला हप्ता स्वीकारत असतानाच टाकळी खुर्द गावच्या महिला सरपंचाला लाच घेतांना अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गावातून अटक केली आहे. 

अकोला (Akola) जिल्ह्यातील सर्वात तरूण व थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच म्हणून ओळख असलेल्या प्रज्ञा जगजीवन दामोदर असे लाच घेतांना अटक झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. गावातीलच एका व्यक्तीला गावातच गॅरेजचा व्यवसाय सुरू करावयाचा होता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडे कर्ज प्रकरण टाकले होते. या कर्जासाठी त्या तरुणाला गावच्या सरपंचाचे ना- हरकत प्रमाणपत्र अपेक्षित होते. हे ना- हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरपंच प्रज्ञा दामोदर यांनी तक्रारदाराला ५० हजार लाचेची (Bribe) मागणी केली. 

Akola News
Ulhasnagar Crime : धक्कादायक.. भाडे देत नसल्याने दुकान मालकाकडून हत्या; उल्हासनगरातील मध्यरात्रीची घटना

१० हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले 

दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तत्पूर्वी तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याची पडताळणी करत एसीबीने सापळा रचला. दरम्यान ठरलेल्या रकमेतील पहिला टप्पा १० हजार रुपये स्वीकारताना आज या (Sarpanch) सरपंच तरुणीला गावातूनच अटक केली. याप्रकरणी अधिक तपास अकोला एसीबी युनिट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com