Akola News: कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा शॉक लागला, पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू; अकोला शहरातील घटना

Akola Police News: कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना अकोला शहरातील अंबिकानगर परिसरात घडली.
Akola Police Death News
Akola Police Death News Saam TV

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

Akola Police Death News

कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना अकोला शहरातील अंबिकानगर परिसरात घडली. गणेश रामराव सोनोने (५७, रा. अंबिका नगर, मलकापूर) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.

Akola Police Death News
Nanded Accident: नांदेडमध्ये भरधाव ट्रकने ८ दुचाकी चिरडल्या, अपघातामध्ये दोघे ठार

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रामराव सोनोने अकोला शहरातील (Akola News) खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मलकापूर स्थित अंबिका नगरमध्ये राहत होते. उकाडा जाणवत असल्याने मंगळवारी (ता. ३०) सकाळी ते नेहमीप्रमाणे कुलरमध्ये पाणी भरत होते.

घरातील कामकाज आटोपून ते ड्युटीवर (Police) जाणार होते. परंतु त्यापूर्वीच सोनोने यांच्यावर काळाने घाला घातला. कुलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील उघड्या वायरल त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे सोनोने यांना विजेचा जोरदार धक्का लागला.

ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनोने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोनोने हे ९ महिन्यांनंतर पोलिस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कुलरचा शॉक चिमुकलीचा मृत्यू

अगदी आठवडाभरापूर्वी जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. दुपारच्या सुमारास कुलर सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. ही घटना किनोद येथे घडली होती. झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

Akola Police Death News
Jalgaon Crime : दोन मित्रांमधील थट्टामस्करीचा शेवट झाला भयानक; जळगावमधील घटना सुन्न करणारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com