Akola News : भरधाव कारने PSI ला उडवलं; PSI राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Akola Accident News : अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांना कारने उडवल्यामुळे मृत्यू झाला आहे.
Akola News
Akola NewsSaam Digital
Published On

अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने उडवलं. यात बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक मोरे हे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला आहे.

Akola News
Ahmednagar News : ताराबाईची साडी ठरली जीवनाची दोरी; प्रसंगावधान राखल्याने वाचले दोघांचे प्राण, ताराबाईंच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक

अपघात झालेली चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात. दुचाकीवरून जात असताना मोरे यांच्या दुचाकीला कारनं उड़वल्यानं ही दुःखद घटना घडली आहे. मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय राजेंद्र मोरे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान कुरणखेड येथे असताना आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला जबर बार लागल्यांने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  कार अकोल्यातीलच असून  नागपूरवरून अकोल्याकडे येत होती. 

Akola News
Sawantwadi News : क्रुरतेचा कळस! विदेशी महिलेला घनदाट जंगलात ३ दिवस ठेवलं बांधून; दृश्य पाहून पोलीसही गेले चक्रावून

पीएसआय राजेंद्र मोरे अकोला येथे कुटुंबासह रहात होते. आपल्या दुचाकीने दररोज अकोल्यातून बोरगावमंजू पोलीस ठाण्यात येत होते. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले पोरकी झाली आहेत. अचानक घडलेल्या या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Akola News
Ahmednagar News : ताराबाईची साडी ठरली जीवनाची दोरी; प्रसंगावधान राखल्याने वाचले दोघांचे प्राण, ताराबाईंच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com