

अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या कारणावरून कारवाई
काँग्रेस, एमआयएम आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर कारवाई
अक्षय गवळी, साम प्रतिनिधी
अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांना अपात्र करण्यात आलंय. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ही कारवाई केली आहे. अपात्र झालेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, एमआयएम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. अकोला महापालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांवर अवैध जात प्रमाणपत्रामुळे अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमरीन सदफ सय्यद नाझीम, सीमा अंजुम शेख अनिस, शेख अब्दुल्ला शेख सलीम अशी निलंबित नगरसेवकांचं नाव आहे. अपात्र झालेल्या नगरसेवकांपैकी अमरीन या प्रभाग क्रमांक 16 ब येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निवडून आल्यायेत. तर सीमा अंजुम शेख अनिस या प्रभाग क्रमांक 2 अ येथून एमआयएमच्या तिकीटावर निवडून आल्यात. तर शेख अब्दुल्ला शेख सलीम यांनी प्रभाग क्रमांक 1 अ मधून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला होताय.
पण या तीनही नगरसेवकांचे नगरसेवक पद आता जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन अपात्र ठरलं आहे. त्यामुळे या तीनही नगरसेवकांसाठी मोठा झटका मानला जातोये. अकोला महापालिकेतील आणखी काही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडालीये. या नगरसेवकांकडे न्यायालय जाण्याचा मार्ग मात्र अद्यापही मोकळा आहे.
मुंबई महापालिकेतही जाती प्रमाणपत्रावरून एका नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं होतं. ही कारवाई एक-दोन महिन्यापूर्वी बीएमसीनं केली होती. ऑल इंडिया मजलिस -ई -इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाला मोठा धक्का बसला होता. गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 137 मधून निवडून आलेले एमआयएमचे नगरसेवक शमीर पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आलं होतं.
शमीर पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवली होती, तेथे त्यांना मोठा विजय मिळला होता. मात्र, त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.