Akola Garlic News : तुम्ही खाताय नकली लसूण, कोण कालवतंय अन्नात सिमेंट?

Akola Garlic News : तुमच्या भाजीत नकली लसूण? कोण कालवतंय अन्नात सिमेंट? भेसळयुक्त लसूण, ग्राहक गेला फसून
Akola Garlic News
Special Report: लसूण खाताय सावधान! तुमच्या भाजीत नकली लसूणSaam TV
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Akola Garlic News : तुम्ही भाजीला खमंग फोडणी देण्यासाठी वापरत असलेला लसूण डुप्लिकेट तर नाही ना? कारण डुप्लिकेट लसणाचा संतापजनक प्रकार समोर आलाय. डुप्लिकेट लसणाचा प्रकार कुठे घडला? कसा बनवला गेलाय डुप्लिकेट लसूण? त्याबाबत जाणून घेऊयात.

भाजी खमंग व्हावी म्हणून तुम्ही लसणाची फोडणी देता. मात्र तुम्ही खात असलेला लसूण डुप्लिकेट तर नाही ना...! कारण अकोल्यातून डुप्लिकेट लसूण विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय..एकमद हुबेहूब ओरिजनल लसणासारखाच दिसणारा हा आहे डुप्लिकेट लसूण...अकोल्यातल्या बाजोरियानगर परिसरातल्या ग्राहकांनी फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला. त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी लसूण सोलत असताना या लसणाच्या पाकळ्या वेगळ्या झाल्या नाहीत... त्यामुळे सुभाष पाटलांच्या पत्नीने चाकूने लसणाच्या पाकळ्या कापल्या. त्यावेळी तो लसूण नसून सिमेंटचा खडा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

पाहा व्हिडिओ

गेल्या काही वर्षात अन्नात भेसळीचं प्रमाण वाढलंय.. कधी पोह्यात, तांदळात प्लास्टिकचे तुकडे, कधी पाणीपुरीत अॅसिडयुक्त मीठ तर कधी शेंगदाण्यात लाल रंगाचे खडे टाकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यातच आता लसणाच्या नावाखाली सिमेंटचे खडे आणि क्लोरीन बीचचं कोटिंग करून तुमची फसवणूक केली जाते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com