Crime : मुलाला हाताशी घेत नवऱ्याचा काटा, मग बायकोनं रचला अपघाताचा बनाव, पण पोलिसांनी भंडाफोड केलाच

Akola Crime News : अकोलामधील अंबिका नगरमध्ये पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने नवऱ्याचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचला. 26 दिवसांनंतर पोलिसांनी शवविच्छेदन, तांत्रिक तपास आणि कबुलीजबाबाद्वारे गुन्हा उघड केला.
Crime
CrimeSaam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोला : पतीचा सततचा त्रास असह्य झाला, पुढं पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने नवऱ्याला कायमचं संपलंय.. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतल्या अंबिका नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.. हत्येनंतर पत्नी आणि मुलाने अपघाताचा बनाव रचला होता, मात्र २६ दिवसानंतर संपूर्ण घटना जुने शहर पोलिसांनी उघड केलीय.. रमेश सातरोटे (वय 52) असं हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.. तर शिला रमेश सातरोटे असं मारेकरी पत्नीचे नाव आहे. मारकऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

नेमकी काय होती घटना?

तारीख.. 30 एप्रिल 2025 रोजी अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशनला अंबिका नगर येथील रहिवासी शिला रमेश सातरोटे (वय ४२) यांनी तक्रार दिली की, पती रमेश सातरोटे यांचा अकस्मात मृत्यू झालाय.. दारूचे नशेत जमिनीवर कोसळून त्यांचा अचानक मृत्यू झाला, असं रमेशच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे यादरम्यान, रमेशची पत्नी शिला हिने पतीच्या मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया करण्यासाठी मोठा विरोध केला होता.. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला कुठलाही आक्षेप नसल्याचं शिला नेहमी पोलिसांना सांगत होती.. अखेर पोलिसांनी रमेश याच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याचवेळी पोलिसांना मृत रमेशच्या नातेवाईकांवर संशय झाला होता. मात्र पोलिसांना प्रतीक्षा होती वैद्यकीय अहवालाची. अखेर वैद्यकीय अहवाल हाती लागला आणि धक्कादायक खुलासे उघड झाले. त्यानंतर वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासाअंती सदर घटना ही आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे 26 दिवसांनंतर समोर आले.

Crime
Beed : बीडमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, रस्त्यावर रक्ताचा सडा, सहा जणांचा जागीच मृत्यू

पोलिसांना सुरुवातीपासूनच मृत रमेशच्या पत्नीवर संशय होता. पोलिसांनी खोलात जाऊन तपास करून सबळ पुरावे प्राप्त केले. मृतकाची पत्नी शिला तसेच तिचा लहान मुलगा यांच्याविरुध्द पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी रमेश अर्थातच पतीच्या हत्या केल्याची कबुली दिली. मारेकरी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारक गृहात दाखल करण्यात आले आहे. पत्नी शिला हिला अकोला जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस तिची कोठडी मागणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश लेव्हलकर यांनी केला आहे.

Crime
Midnight Shootout : मोठी बातमी : संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून...

रमेश सततचा त्रास असह्य झाला, म्हणून..

मृत रमेश याला अति दारू पिण्याच्या सवय होती. दारू पिऊन नेहमीच भांडण व मारहाण करत असल्याने अल्पवयीन मुलगा व पत्नीने दोघांनी मिळून 29 एप्रिलच्या रात्री 10 वाजताच्या दरम्यान हे कृत्य केलं. रमेश दारू पिऊन घरामध्ये धिंगाणा घालत असताना आईला खूप मारत होता, शिवीगाळ करत होता ते त्याचा लहान मुलगा यास सहन न झाल्यानं त्यानं घरातील फावडे उचलून वडिलांना मारहाण केली. आई व मुलांने मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी कबुली दोघांनी दिली आहे. तांत्रिक विश्लेषण, शवविच्छेदन अहवाल, व गोपनीय माहितीचे संकलन करून सदरच्या गुन्ह्यामध्ये कलम 103 (1) तसेच 3(5),238 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com