अकोल्यात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात घडली घटना, पोलिसांत गुन्हा
Akola Crime NewsSaam TV

Akola News : अकोल्यात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात घडली घटना, पोलिसांत गुन्हा

Akola Crime News : अकोला शहरात एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. शहरातील मुलांच्या वसतिगृहात ही घटना घडली.

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

कोचिंग क्लासवरून घरी परतणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीवर तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. नराधमांनी अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिला एका वसतिगृहात नेलं. तेथे तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली.

अकोल्यात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात घडली घटना, पोलिसांत गुन्हा
Pune Crime: सावत्र बापाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; अश्लील वर्तन करत दिले चाकूचे चटके, पुण्यातील धक्कादायक घटना

अंकुश, अनुराग आणि दिपक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय विद्यार्थिनी ७ जून रोजी कोचिंग क्लासला जाते असं सांगत घराबाहेर पडली. रात्री बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही.

शोधाशोध करूनही तिचा थागपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जूनला घरी परतली. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

नेमकं काय घडलं ७ आणि ८ जूनच्या रात्री?

पीडित विद्यार्थिनी कोचिंग क्लासला जाण्यासाठी निघाली असता, आरोपी अंकुश हा तिच्याजवळ आला. त्याने पीडितेची फसवणूक करत तिला जवळच असलेल्या मुलांच्या वसतिगृहात नेलं. त्या ठिकाणी आरोपीचे दोन मित्र हजर होते. वसतिगृहातल्या खोलीतच तिन्ही तरुणांनी विद्यार्थिनीवर रात्रभर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले.

याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी पीडितेला दिली. पीडितेने कशीबशी आपली सुटका करत दुसऱ्या दिवशी घर गाठले आणि कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, अकोला शहरात असलेल्या नामांकित वसतिगृहात हा प्रकार घडल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर ताशेरे ओढले गेले आहेत.

या वसतिगृहात सुरक्षारक्षक अथवा वॉचमन होता का? जर असेल तर घटनेवेळी तो कुठे होता? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व घटनेला वसतिगृहातील कर्मचारी देखील जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. सध्या पोलीस घडलेल्या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.

अकोल्यात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मुलांच्या वसतिगृहात घडली घटना, पोलिसांत गुन्हा
Nagpur Hit And Run Case: आधी अपघात नंतर घातपात आता जादूटोणा; हिट अँड रन प्रकरणाला नवा अँगल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com