Akola News: अकोल्यात खळबळ! १३ वर्षीय मुलीला म्हणाला, चल तुला घरी सोडतो...पुढे घडले ते धक्कादायक

ही घटना अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
 Crime News
Crime NewsSaam TV

Akola Crime News : अकोल्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. तर याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

 Crime News
Maharashtra Politics : स्वतःचा TRP वाढवण्याचा खडसेंचा प्रयत्न; 'त्या' व्यक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांची टीका

अकोला (Akola) शहरातील मोठी उमरी भागात राहणारी एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्याने घरी जात असताना तिच्याच ओळखीतील एक २६ वर्षीय तरुण तिथे आला आणि म्हणाला, चल तुला घरी सोडून देतो असं म्हणून तिला उमरीतील स्मशानभूमीच्या मागे घेऊन गेला.

त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार गेल्या दहा दिवसांपूर्वी म्हणजेच १५ जानेवारीच्या रात्री घडला होता. या प्रकारानंतर आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांनाही ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली.

 Crime News
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; सुरक्षेचं कारण देत या पक्षांनी फिरवली पाठ

त्यामुळे अल्पवयीन मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. दरम्यान काही दिवसानंतर मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात तिच्या आजीने तिला विचारना केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीवर घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी (Police) घटनेचे गांभीर्य पाहता आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com