अकलूजच्या घोडेबाजारात 8 दिवसांत अडीच कोटींची उलाढाल; दुष्काळामुळे खरेदी-विक्रीत ३० टक्क्यांची घट

Akluj horse market : महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि पारंपरिक मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या घोडेबाजाराला यंदा दुष्काळाची मोठी झळ बसली आहे. राज्यातील चारा आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे घोड्यांच्या खरेदी-विक्रीत मोठी घट झाली आहे.
Latest news from Akluj Ghode Bazar Solapur district
Latest news from Akluj Ghode Bazar Solapur districtsaam tv
Published On: 

भारत नागणे

कार्तिकी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरलेल्या ऐतिहासिक घोडेबाजाराला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या आठ दिवसांत या बाजारात अडीच कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत खरेदी-विक्रीत सुमारे ३० टक्क्यांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांत विविध जातींचे एक हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांतील व्यापारी घोडे घेऊन अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. बाजारात काठेवाडी, मारवाडी यांसह नामांकित जातींच्या घोड्यांना खरेदीदारांकडून विशेष पसंती मिळत आहे.

Latest news from Akluj Ghode Bazar Solapur district
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

गेल्या १८ वर्षांपासून अकलूज येथे हा घोडेबाजार भरवला जात असून, कार्तिकी यात्रेचे तो प्रमुख आकर्षण बनला आहे. घोड्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी राज्यभरातून शौकीन आणि व्यापारी येथे गर्दी करत आहेत.

मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. चारा आणि पाण्याची टंचाई तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी घोडे खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहारात जवळपास ३० टक्क्यांची घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Latest news from Akluj Ghode Bazar Solapur district
High Court : पत्नीला वेळ देता येत नसेल तर ती क्रूरता नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय!

दरम्यान, बाजारात येणाऱ्या व्यापारी आणि घोड्यांसाठी बाजार समितीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, चारा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. आगामी दिवसांत आणखी घोडे बाजारात दाखल होण्याची शक्यता असून, उलाढालीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.