Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; महाबजेटमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळालं?

ajit pawar News : अर्थसंकल्पात अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. महायुतीच्या महाबजेटमधून शेतकऱ्यांना काय काय मिळालं, जाणून घेऊयात.
Maharashtra Budget
Maharashtra Budget 2025saam tv
Published On

अर्थमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान ते गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेविषयी मोठ्या घोषणा केल्या. या बजेटमध्ये ९ हजार ७१० कोटी रुपये मंजूर केले.

शेतकऱ्यांसाठी काय काय?

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये ३५१ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद आहे. कृषि क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'कृत्रिम बुध्दिमत्ता' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget
Maharashtra Budget 2025 : 64 हजार 755 कोटींचा समृद्धी महामार्ग, काम किती टक्के पूर्ण झालं? अजित पवारांनी दिली खडानखडा माहिती

जलयुक्त शिवार अभियान 2.0

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

Maharashtra Budget
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची फक्त ३ शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...; VIDEO

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना -

'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार' ही योजना राज्यात कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आलीये. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८८ हजार ५७४ कोटी रुपये आहे. या लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू आहेत.

दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ही 2 हजार 300 कोटी रूपये आहे..

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक आणि जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये आहे.

Maharashtra Budget
Maharashtra Budget 2025: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अजित पवारांनी अर्थसंकल्पात काय सांगितलं?

तापी महापुनर्भरण प्रकल्प

शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यातून मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि अन्वेषणाचे काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com