Ajit Pawar News: अजित पवार गटाच्या मेळाव्यात जेवणासाठी गोंधळ; कार्यकर्त्यांकडून अक्षरश: प्लेट्सची ओढाताण

Ajit Pawar News: अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा जेवणासाठी एकच गोंधळ पाहायला मिळाला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam tv
Published On

चेतन व्यास

Ajit pawar News in Marathi:

राजकीय पक्षांच्या अनेक मेळ्यावात जेवणाची पंगत पाहायला मिळते. नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमानंतर जेवणाची पद्धत जुनीच आहे. आज वर्ध्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवर्तन मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा जेवणासाठी एकच गोंधळ पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

राज्यातील सत्तासंघर्षामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने कार्यकत्यांना जेवणाची मेजवाणी मिळत नव्हती. अशातच आज वर्ध्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवर्तन मेळाव्याचं आयोजन केलं होतं.

Ajit Pawar News
Aaditya Thackeray News: शिंदे सरकारला लाज वाटली पाहिजे; जालन्यातील घटनेवरून आदित्य ठाकरे कडाडले

वर्ध्यातील हा मेळावा संपल्यानंतर जेवणाची मेजवाणीवर संपेपर्यंत ताव मारला. यामुळे काहींच्या हातातील प्लेट रिकाम्या राहिल्या.

वर्ध्यातील दादाजी धुनिवाले सभागृहात आयोजित परिवर्तन मेळावा हा राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याच्या नियोजनशुन्यतेमुळे झालेला गोंधळ चांगलाच गाजला. मेळावा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी जेवणाच्या ठिकाणी एकच झुंबड झाली. त्यांतर कार्यकर्त्यांनी अक्षरश: प्लेट्सची ओढाताण करण्यात आली.

कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून कॅटरर्सच्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल सोडले. कार्यकर्त्यांनी भांडी रिकामी होईपर्यंत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी जिलेबीवर ताव मारला, सर्वांनी प्लेट भरून जिलेबी घेतल्या. त्यामुळे काही वेळेतच जिलेबी संपली. त्यानंतर कार्यकर्ते मसाला भाताकडे वळले. तर काही जण काही कडीकडे वळले.

Ajit Pawar News
Ajit Pawar Upset : अजित पवार महायुतीत नाराज?, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

या गोंधळात कुणाचे पोट भरले तर कुणाला उपाशीच बाहेर पडावे लागले. या प्रकारमुळे कार्यकर्त्यांनी आयोजकांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com