अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

Ajit Pawar Last Wish About NCP Unity: अजित पवारांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरू लागलाय...दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया समोर येतायत... मात्र खरचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अजितदादांची नेमकी काय इच्छा होती?
Leaders of both NCP factions amid growing talks of party reunification after Ajit Pawar’s demise.
Leaders of both NCP factions amid growing talks of party reunification after Ajit Pawar’s demise.Saam Tv
Published On

पुणे महापालिकेतील प्रचारसभेत अजित पवारांनी केलेल्या याचं विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा राज्यात सुरु झाली.. मात्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं दादांच्या राष्ट्रवादीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलयं... अशातच विद्या प्रतिष्ठानचे सदस्य आणि अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुर्जर यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी पुन्हा एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा होती असं म्हटलंय

दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून काही नेत्यानी सकारात्मक भूमिका मांडली आहे. तर काहींनी असा कुठलाच प्रस्ताव नसल्याचं सांगितलयं...

खरतर पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीत झालेली युती विलीनीकरणाच्या चर्चेसाठी महत्त्वाची ठरली... त्यातच अजित पवारांनीही वेळोवेळी सकारात्मक विधान केल्यानं राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती... मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानं पक्षाचं अस्तित्व आणि भविष्यातील राजकीय गणितांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही काळाची गरज आहे...मात्र दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते राष्ट्रवादीची ही एकी कशाप्रकारे मान्य करतात ? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com