Ajit Pawar Death: मी कामाचा माणूस, हातपाय हलतात तोवर...; अजित पवारांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Viral Video Before Death: अजित पवार यांचे अकाली निधन झाले आहे. अजित पवार हे नेहमी जनतेसाठी काम करायचे. त्यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे.
Ajit Pawar Death
Ajit Pawar DeathSaam tv
Published On

महाराष्ट्राचे अत्यंत निष्ठावान आणि कर्तुत्ववान नेतृत्व म्हणून अजित पवारांची ओळख होती. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांनी जनतेसाठी काम केले, तळागाळातील प्रत्येक माणसाला मदत केली. असं हे व्यक्तीमत्त्व आज आपल्याला सोडून केल्याने सर्वांनाच दुःख झालं आहे. दरम्यान, अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मी काम करणारा माणूस, असं त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अजित पवारांचा तो व्हिडिओ व्हायरल

अजित पवार हे नेहमीच जनतेच्या कामासाठी तत्पर असायचे. त्यांना कधीही फोन केला तरीही ते धावून यायचे. आज हे असं नेतृत्व आपल्यातून गेलं, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितलं होतं की, जोपर्यंत माझे हातपाय हलतात तोवर मी काम करणार. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

माझे हातपाय हलतात तोवर...

जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करेन, बाकी काही करणार नाही.मी काम करुन दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे, असं अजित पवारांनी एका भाषणात म्हटलं होतं. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी खूप काम केले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून काम केले. काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Passed Away: खासदार ते सहा वेळा उपमुख्यमंत्री; अशी राहिली अजित पवारांची राजकीय कारकिर्द!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com