दादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर? राष्ट्रवादीच्या आमदाराचे खळबळजनक सवाल

Ajit Pawar Plane Crash Suicide Bomber Theory: अजितदादांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा राजकारण तापलयं... पायलटचा सुसाईड बॉम्बरसारखा वापर करण्यात आला का? असा सवाल राष्ट्रवादीच्या आमदारानं उपस्थित केलाय... त्यामुळे पुन्हा एकदा विमान दुर्घटनेवरुन घात की अपघात यावर चर्चा सुरु झाली आहे.
Political leaders react as new conspiracy theories emerge in the Ajit Pawar aircraft crash case.
Political leaders react as new conspiracy theories emerge in the Ajit Pawar aircraft crash case.Saam Tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातावरुन संशयाचं धुकं अजूनही कायम आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीच घात की अपघात ? यावर बोट ठेवलंय. दुर्घटनेमागे कट आहे का? असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघाताप्रकरणी थेट सुसाईड बॉम्बरची थिअरी मांडलीय.

मिटकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांसमोर या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं मोठ आव्हान असणार आहे...

घात की अपघात?

मिटकरींचे सवाल

- VSR कंपनीचे पायलट दोन वेळा का बदलले गेले?

- VSR कंपनीनं डिसेंबर 2025 मध्येच पायलटचा 50 कोटींचा विमा का काढला?

- कंपनीवर बंदी असताना अजित पवारांना प्रवासासाठी हे विमान का देण्यात आलं?

- पायलटनं MAYDAY कॉल का दिला नाही?

दुसरीकडे बीडचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी विमान प्रवासात अजितदादांच्या सोबत एकही पीए का नव्हता? असा सवाल केलाय. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघातावर आरोपांच्या फैरीतून राजकारण करू नये, असं शिंदेसेनेने म्हटलंय. राष्ट्रीय स्तरावरही अजितदादांच्या निधनाचे पडसाद उमटतायत... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्ज्जुन खर्गे यांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केलीय. सध्या सीआयडी चौकशी सुरु झाली आहे. गेल्या 10 दिवसात सर्वच यंत्रणांचा तपास कोणत्या दिशेने सुरु आहे? हे समोर येणे महत्वाचं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमिवर विमान दुर्घटनेत काय सत्य समोर येतंय? या घटनेला काही नवं वळण मिळणार का? याकडे राज्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com