Maharashtra News Live Updates : ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 6 june 2025 : आज, शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, महाराष्ट्रात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

Shapur : वीज कोसळून चार बैलांचा मृत्यू,शहापुरातील घटना 

शहापुरात वीज पडून चार बैलांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे काम आटपून माळरानावर चरत असताना वीज पडली.

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, रस्त्यावर झाडे तुटून पडली

नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नांदेड ते बिलोली राज्य महामार्गावर वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे ठीकठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तर तासभर पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतींना तळ्याचं स्वरूप आलं आहे.

हगवणे माय लेकासह प्रणय साठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

जेसीबी फसवणूक प्रकरणांमध्ये हगवणे मायलेकांसह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि ३ एजंट अशा एकूण सहा जणांची उद्या कोर्टात एकत्रित सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये हगवणे मायलेकांसह प्रणय साठे अशा तिघांना एक दिवसाची पोलीस कस्टडी राजगुरुनगर न्यायालयाने देत निकाल दिला.

बकरी ईदच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये तणाव, इमारतीत येणाऱ्या वाहनांची तपासणी

मीरा रोडच्या नॉर्थ गार्डन सिटी या संकुलात पुन्हा एकदा बकरी ईदच्या निमित्ताने वाद निर्माण झाला आहे. कुणी चोरून बकरा नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारती मध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणातील चार आरोपी अटक, संदीप काचगुंडे मात्र फरार

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता येथील शुभांगी शिंदे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती.. आता या प्रकरणातील आरोपी पतीसह सासरा, सासू व नणंद यांना अटक करण्यात आली.. परंतु यातील पाचवा आरोपी संदीप काचगुंडे फरार आहे.. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असून दुसरीकडे संदीप काचगुंडे याला अटक करण्यासाठी पथक रवांना केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने यांनी दिली..

महानगरपालिकेच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पुणे महापालिकेचे दुर्लक्ष

पुणे महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या महाराजांच्या स्मारकाला आज 6 जून श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त युवासेनेमार्फत दुग्धाभिषेक करत महापुष्पहार अर्पण करून , महाराजांची महाआरती करून राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अनिकेत दादा जवळकर, युवा सेना गड संवर्धन पक्षाचे प्रमुख भूषण दादा वर्पे, युवा सेना महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य कु.शर्मिला येवले, शिवसेनेचे पदाधिकारी राजेश दादा पळसकर ,आनंद दादा भिलारे, अरुण कडू आणि अनिराज कुऱ्हाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणात शशांक हगवणेला आणखी अडचणीत

- शशांकचा मित्र प्रणय साठे अटकेत

- रिकव्हरी एजंटशी मध्यस्ती केल्याचा ठपका

- शशांकने चालक देवानंद कोळीच्या माध्यमातून गुगल पेने ₹30,000 प्रणय साठेला दिले

- ही रक्कम प्रणयने आरोपी गणेश पोतलेला ट्रान्सफर केल्याचे उघड

- आरोपी प्रणय साठे (वय 27, रा. कोथरूड) याला आज 14.54 वा. अटक

- शशांक, लता हगवणे व प्रणय साठे यांना आज राजगुरुनगर न्यायालयात हजर करणार

पुण्यात पावसाला सुरुवात

पुण्यात पावसाला सुरुवात

पुण्यात वादळ वाऱ्यासह पाऊसाला सुरवात

शहरातील अनेक भागात पाऊस सुरू

जमिनीचा ताबा घेण्यासाठी बंदुकीचा धाक, पिंपरी चिंचवडमधील शेतकरी दहशतीखाली

जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्याने शेतकरी कुटुंबीयाला चक्क बंदुकीचा भाग दाखवला आहे. ही धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासरसाई भागात घडली आहे. कासारसाई भागात काही शेतकऱ्यांची जमीन आहे, जमिनीवर एडवकेट संदीप भोईर आपल्या साथीदारांसोबत आले असता त्यां ठिकाणी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी संदीप भोईर आणि त्यांच्यासोबत असलेल्या टोळक्याला येण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे संतापलेल्या संदीप भोईर यांनी चक्क आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने शेतकरी कुटुंबीयांन बंदुकीचा धाक दाखवला आहे

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेजण शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत - भास्कर जाधव

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेजण शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत. दोघांचेही पक्ष दोघांनी आबादीत ठेवावे. कुणीही कुणाचा पक्ष कुठल्याही पक्षात विलीन करू नये. आगामी निवडणूकांच्या पार्शभूमीवर आपापल्या पक्षाच्या ताकतिप्रमाणे जागा मागणीत सहमती दर्शवावी, असे विधान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे...

अपहरण झालेला 3 वर्षांचा चिमुरडा पंधरा दिवसांनी सापडला

लातूर शहरातील गुमास्ता कॉलनी येथील स्वरूप भीमाशंकर स्वामी हा तीन वर्षाचा चिमूरडा मागच्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झाला होता...

अखेर पंधरा दिवसानंतर हा चिमुरडा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना रडताना आढळला...

दरम्यान या मुलाची चौकशी केल्यानंतर हा मुलगा लातूर येथील असल्याची माहिती मिळाली.. अखेर 15 दिवसानंतर स्वरूप स्वामी हा चिमुरडा पोलिसांनी कुटुंबाकडे बाधन केला आहे...

तर या चिमूरड्याचं अपहरण करणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे...

आरोपी देखील लातूर येथील रहिवासी आहे..

अपहरण झालेला 3 वर्षाचा चिमुरडा पंधरा दिवसांनी सापडला

लातूर शहरातील गुमास्ता कॉलनी येथील स्वरूप भीमाशंकर स्वामी हा तीन वर्षाचा चिमूरडा मागच्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झाला होता... अखेर पंधरा दिवसानंतर हा चिमुरडा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना रडताना आढळला... दरम्यान या मुलाची चौकशी केल्यानंतर हा मुलगा लातूर येथील असल्याची माहिती मिळाली.. अखेर 15 दिवसानंतर स्वरूप स्वामी हा चिमुरडा पोलिसांनी कुटुंबाकडे बाधन केला आहे... तर या चिमूरड्याचं अपहरण करणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे... आरोपी देखील लातूर येथील रहिवासी आहे.. दरम्यान अपहरण झालेल्या मुलाच्या आईला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Nashik Live : नाशिकमध्ये वऱ्हाडाचा ट्रक पलटी, २० जण जखमी

-नाशिकच्या पिंपळगाव येथून लग्नाला जाणारा ट्रक कदवा येथील जाऊळके रस्त्यावर आक्रळे जवळ रस्त्यावर पलटी झाला असून यात 14 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, याच वेळी या रस्त्यावरून माजी आमदार धनराज महाले हे लग्नाला जात असताना ते घटनास्थळी थांबत त्यांनी तातडीने रुग्णवाहिकाना फोन करत जखमींना पिंपळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले,तर व्हराडी मंडळींना मानसिक धीर दिला,दरम्यान हा रस्ता काँक्रीट झाल्याने वाहने सुसाट धावत जातात,त्यामुळे अपघात नेमका कसा घडला ट्रक कसा पलटी झाला याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही.

Maharashtra News Live Updates : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? वाचा तटकरे काय म्हणाले

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का? असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही. असा कोणताही ठराव आम्ही आगामी अधिवेशनात ठेवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात किंवा राज्यात सत्तेत जावं अशी वरिष्ठ स्तरावर चर्चा 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू होती. सुनील तटकरे याचा खुलासा

महायुती म्हणून आमची निवडून एकत्र लढण्याची तयारी आहे- सुनील तटकरे

विकृत मनोवृती ठेचून काढली पाहिजे

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विकृत मनोवृती पासून नेहमी लांब राहील पाहिजे

पक्षात विकृत मनोवृतीचे लोक नसावे यासाठी आगामी वर्धापन दिन ठराव मांडणार

महायुती म्हणून आमची निवडून एकत्र लढण्याची तयारी आहे

मात्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे

मात्र अशी परिस्थिती असली तरी आम्ही महायुतीच्या विचाराला तडा जाऊ देणार नाही याची आम्ही काळजी घेऊ

Jalna: जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच....

जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या एका तलावामध्ये मृत माशांचा खच पडला आहे. आज सकाळी तलावात मोठ्या प्रमाणात मृत माशा आढळून आल्या आहे. तलावातील माशा मृत झाल्याने मच्छी व्यवसायिकांचं लाखोचं नुकसान झालं आहे.दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात माशा मृत कश्या झाल्या याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नसलं तरी दूषित पाण्यामुळेच या माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे...

Nashik News : जूनच्या सुरुवातीलाच नाशिकमधील गंगापूर धरण ४४ टक्के भरलं

- नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी

-

- धरणात २५०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

- मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्के अधिक पाणीसाठा

- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक, धरणाच्या पाणीपातळीत वाढ

- यंदा नाशिक विरुद्ध मराठवाडा पाण्याचा वाद टळण्याची चिन्हं

Shivsena: शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील सर्व प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

- सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रथमच नाशिकमधील नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीला

- सुधाकर बडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी करण्यात आलीय नियुक्ती

- या नियुक्तीनंतर उपनेते दत्ता गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी, वसंत गीते, सुनील बागुल आणि अन्य नेते मुंबईत घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

- काही खाजगी कामानिमित्त महानगरप्रमुख विलास शिंदे मात्र अनुपस्थित

- उद्धव ठाकरे नाशिकमधील या नेत्यांशी काय चर्चा करतात आणि काय आदेश देतात, याकडे लक्ष

हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेची आज पुन्हा चौकशी होणार...

हगवणे माय-लेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आलंय. पण या कटात बँकेच्या एजंटचा काय सहभाग आहे? हे निश्चित करण्यासाठी आज म्हाळुंगे पोलिसांनी संबंधित बँकेच्या प्रतिनिधींना चौकशीला बोलावलं आहे.

हॉटेलचा विषय संजय शिरसाट यांच्यासाठी संपलेला आहे. मात्र राज्यातील जनतेसाठी संपलेला नाही- इमतियाज जलील

हॉटेलचा विषय संजय शिरसाट यांच्यासाठी संपलेला आहे. मात्र राज्यातील जनतेसाठी संपलेला नाही.

याबाबत मी खोलात जाऊन चौकशी केली. त्यावेळी आणखी एक प्रकरण सापडले आहे.

MIDC शेंद्रा मध्ये पालकमंत्र्यांनी जमीन घेतली. २१ हजार २७५ स्क्वेअर मीटर (पाच एकर) यांचा मुलगा सिद्धांत याना MIDC ने दिली आहे.

६ कोटी ९ लाख ४o हजार २०० रुपये ला घेतली.

यात जी जमीन घेतली आहे, midc शेंद्रा ने जमीन ट्रक टर्मिनस साठी राखीव होती, ती आरक्षण काढून प्लॉट दिले आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५४ पैकी १४ अर्ज बाद, १४० उमेदवार रिंगणात

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. १५४ अर्जांपैकी १४ अर्ज बाद झाल्याने आता १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २९ जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे कारण बाजार समितीवर महायुती की महाविकास आघाडी यांचा झेंडा फडकतो हे निकालातून स्पष्ट होणार आहे.निवडणुकीच्या रिंगणात राजकीय नेते, माजी संचालक आणि स्थानिक मान्यवर उमेदवार म्हणून उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरली आहे.

किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा

अँकर - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे. युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा हस्ते शिवप्रतिमेचे विधीवत पुजन या वेळी करण्यात आले. उत्सव मूर्ती आणि त्या नंतर मेघडंबरीतील शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. राजपुरोहितांचे मंत्रघोष आणि शाहिरीच्या साथीने हा सोहळा पार पडला. यावेळी रायगड पोलिस दलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देण्यात आली.

अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातून १२ लाख ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

गुणवत्ता यादी मंगळवारी होणार जाहीर

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तब्बल १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

त्यातील ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन लॉक केला आहे

केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाची गुणवत्ता यादी येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे

या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १८ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत

यंदा संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्ट मोडवर

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोवंश हत्या सहन केली जाणार नाही म्हणत पोलिसांना कारवाईचे दिले होते आदेश..

- बकरी ईदला गोवंश हत्या होऊ नये यासाठी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.. सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गो तस्करांना पोलिसांनी केले 15 दिवसांसाठी हद्दपार

- नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातून मोठ्या प्रमाणात गोवंश पोलीसांच्या ताब्यात घेतलं आहे..

- ईदच्या पार्श्वभुमीवर पोलीसांनी तपासत डीसीपी निकेतन कदम यांची कारवाई केली आहे...

- कन्हान पोलिसांसाठी 70 जणांवरांची सुटका केली.. याप्रकरणी मोहम्मद शश्रीफ नामक व्यक्तीला अटक केली...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद-मनोज जरांगे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच्या भूमिकेबाबत मनोज जरांगे पाटील यांनी संशय व्यक्त केलाय. या प्रकरणात जे आरोपी पकडले ते आंदोलनानंतर अटक केली. सरकारी वकील देखील तेच करताहेत. आरोपींचे वकील म्हणतात आरोपींना दोषमुक्त करा त्यावर सरकारी वकील म्हणतात हरकत नाही याचा अर्थ काय घ्यायचा , असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय.

१६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला.दोघे संशयित ताब्यात...

राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बेकायदेशीररित्या पीकअपने वाहतूक करतांना व बाळगतांना दोघा संशयितांना नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले..या कारवाईत १६ लाखांचा ( गुटखा ) मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नांदगाव तालुक्यातील वेहेळेगाव - नांदगाव रस्त्यावर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या विंचूर येथील महेश आहेर व निलेश बोथरा या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचे या कारवाईने चांगलेच धाबे दणाणले आहे.

Pune: पुणे अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू 

पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भीषण अपघात झाला असून भरता वेगाने जाणाऱ्या कारणे दुचाकी स्वराला जोडता धडक दिलेले दुचाकी स्वार महामार्गाच्या विरुद्ध बाजूच्या लेन वरती जाऊन कोसळत कार खाली चिरडला गेलाय,या अपघातात शरद वाघ या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताचा हा सर्व थरार CCTV कँमेय्रात चित्रीत झालाय, अपघाताची ही दुर्दैवी घटना पाहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन

तसेच कोविड योद्धा स्मारकाचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला फेब्रुवारी 2002 ला शस्त्र परवाना देण्यात आला

निलेश चव्हाणवर गंभीर गुन्हा असून देखील गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आली....

वारजे पोलीस आणि पुणे पोलीस आयुक्तालयाकडून चुकीची माहिती देण्यात आली...

निलेश चव्हाणच्या शस्त्र परवानाच्या अर्जावर त्यावेळी माहिती देणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने त्यावेळी शस्त्र परवाना देण्याची गरज नसल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाला दिली होती....

मात्र त्यावेळीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जालिंदर सुपेकर ऍडिशनल कमिशनर वारंवार मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय....

निलेश निलेश चव्हाण ला शस्त्र परवाना मिळवून देण्यास मदत केली का असा प्रश्न निर्माण होतोय???

मे महिन्यात झालेल्या अवकाळीचा भाजीपाल्यांना फटका.. बाजारात आवक घटली; पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ

मे महिन्यात सलग पंधरा दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांची शेतावरच मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.. यामुळे बाजारात भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक घटली आहे.. तर आवक घटल्याने भाजीपाल्यांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत... टोमॅटो, पालक, मेथी, शेवगा , कोथिंबीर या पालेभाज्यांचे भाव सध्या चांगलेच भाव खात आहेत.. दरम्यान नागरिकांना वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरामुळे आर्थिक भार सहन करावा लागतो आहे..

राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातोय

कोल्हापुरातल्या नवीन राजवाडा येथे सुद्धा मागील दोन वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातोय... मागील दोन्ही वर्ष नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा सोहळा पार पडला. अगदी शाही दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडत आला आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात नवीन राजवाड्यात राज्याभिषेक सोहळा होत आहे. विशेष म्हणजे यावर्षी नवीन राजवाड्यातल्या दरबार हॉलमध्ये 351 वा राज्याभिषेक दिन सोहळा पार पडत आहे. शाहिरी पोवाडा, मराठा लाईट इनफन्ट्रीच्या सिल्व्हर वाद्यवृंदाचे सादरीकरण, समूह गीत आदी कार्यक्रम सुद्धा पार पडत आहेत. यावेळी शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक होत आहे. या सोहळ्यास खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, शासकीय अधिकारी, समाजातील मान्यवर व शिवभक्त उपस्थित आहेत.

तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज 6 जुन चे औचित्य साधुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे.त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक केल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशासनाकडून अभिषेक पूजा करावी. तसेच भवानी तलवार पूजा मांडावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा कडून करण्यात आली.

बिबट्याच्या हल्ल्यात एक ठार

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रायपुर-भडाने शिवारात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शेतकरी रामदास सिताराम आहेर याच्यावर हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.रामदास अहिरे हे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटपून घरी येत असतांना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर मागून हल्ला करत त्याच्या मानेचे लचके तोडत गंभीर जखमी केले त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली,वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचत रामदास अहिरे यांना चांदवड येथे पुढील उपचारासाठी नेले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान बिबट्याच्या मुक्त संचारने परिसरातील नागरीकां मध्ये दहशत पसरली असून हा बिबट्या नरभक्षक झाल्याने सर्वांनी त्याची धास्ती घेतलीय.

नहरात आंघोळीला गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

भाऊ व मित्रासोबत आंघोळीला गेलेल्या बालकाचा तामसवाडी शिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात बुडून मृत्यू झाला. मोहम्मद रजा रफिक शेख (८) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृत बालकाचे नाव आहे.मोहम्मद रजा हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेदून गेलेल्या नहरात आंघोळीला गेले होते. पाण्याच्या अंदाज न लागल्याने मोहम्मद हा पाण्याच्या प्रवाहात ओढत गेला. दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाने वाचवावाचवा असा ओरडू लागला. तोपर्यंत मोहम्मद हा नहरातील पाण्यात बुडाला. परिसरात कुणीच नसल्याने या बालकांच्या मदतीसाठी कुणीही येऊ शकले नाही. या घटनेने सर्व मुले प्रचंड घाबरली होती. मोहम्मदच्या कुटुंबाला ही दुर्दैवी माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने टोमॅटो पिकांचा शेतात चिखल

वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने नांदेडमध्ये भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेय, गडगा इथल्या भुजंग भाकरे यांच्या एक एकर क्षेत्रातील टोमॅटो पिकांचा शेतातच चिखल झालाय. या अस्मानी संकटानंतर अद्याप नुकसानीचा पंचनामा झाला नसल्याने हतबल शेतकऱ्यांने सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केलीय.

शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीनच्या बियाणे वाटपात घोळ..?

शेतकऱ्यांना खरीप हंगामात मदत व्हावी यासाठी शासनाकडून महाडीबीटी द्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 किलो बियाणे शंभर टक्के अनुदानावर दिले जात आहे.मात्र महाबीज कंपनीच्या बियाण्याची पॅकिंग 22 किलोची असल्याने शेतकऱ्यांना तीन बॅग सोयाबीन बियाणे वाटप केले जात असून शेतकऱ्याच्या पदरात 66 किलो बियाणे पडत असल्याने नऊ किलो बियाणं कमी मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांकडे केल्यानंतर धाराशिवचे कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी तात्काळ कृषी सेवा केंद्राला भेट देऊन सदरील प्रकाराची पाहणी केली.दरम्यान पॅकिंग फोडून बियाणे वाटप करणे नियमबाह्य असल्याने उपलब्ध पॅकिंग नुसारच शेतकऱ्यांना बियाणे वाटप करता येणे शक्य आहे असे कृषी विभागाकडून सांगितलं जातंय.

नागपुरात कोरोनाने दोन जणांच्या मृत्यूनंतर आता स्वाइन फ्ल्यूने तोंड वर काढायला सुरुवात झाली

नागपुरात कोरोनाने दोन जणांच्या मृत्यूनंतर आता स्वाइन फ्ल्यूने तोंड वर काढायला सुरुवात झाली...नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

- सध्या विदर्भात मान्सून लांबला आणि नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हे वातावरण स्वाईन फ्लू साठी पोषक ठरत आहे.

- नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे 60 वर्षीय व्यक्तीच्या प्रकृती बिघडली त्यांच्यात स्वाईन फ्ल्यू सदस्य लक्षणे आढळून आल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आला मात्र खेळ मे महिन्याच्या शेवटी त्यांचा मृत्यू झाला.

- आरोग्य विभागाच्या नोंदणी नुसार पूर्व विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एक जानेवारी ते पाच जून दरम्यान 27 स्वयंपलीचे रुग्ण मिळून आले.

- यापैकी सर्वाधिक 14 रुग्ण हे केवळ नागपूर शहरी भागात मिळून आले तेच ग्रामीण भागात 6 रुग्णांची नोंद झाली.

- तेच चंद्रपूर येथे 3 रुग्ण, तर भंडारा गोंदिया गडचिरोली येथील प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले... यामध्ये बहुतांश रुग्ण हे बरे होऊन घरी सुद्धा गेले आहे.

Maharashtra News Live Updates : आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा, मावळ्यांची किल्ले रायगडावर कूच

Summary

किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. शिवराज्याभिषेकाचा आज 352 वा वर्धापन दिन आहे. या खास सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर मोठी गर्दी केलीय. संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होणारेय. त्यासाठी राज्यभरातील लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर दाखल झालेत. किल्ले रायगडवर जल्लोषमय वातावरण दिसून येतंय.

भंडाऱ्यात अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचाराच्या दोन घटना

भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाणे हद्दीतील दोन वेगवेगळ्या गावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री याप्रकरणी अड्याळ पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक पीडिता ही सात वर्षांची असून काल ती घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना दुपारी ३० वर्षीय नराधमान तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गणेश गोटेफोडे या आरोपीला अटक केली आहे. तर दुसरी घटना १४ वर्षीय मुलीसोबत घडली आहे. बोरगाव येथील २१ वर्षीय आरोपी अभय धुर्वे याने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात उडत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात गरोदर राहिल्याने पीडीतेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी अभय धुर्वे ला अटक केली आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतुकीत बदल

पुणे शहरात शनिवारी बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे. या परिसरात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतूक नियमनाबाबत आदेश जारी केला आहे. सात जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून नमाज संपेपर्यंत काही मार्ग बंद ठेवण्यात येतील. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी उत्पादनांचे लिकिंग होत असल्याबाबत तक्रारी... थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, पालकमंत्री आकाश फुंडकर.

अकोला जिल्हा वार्षिक योजनेत 2025 या वर्षात मार्च अखेरपर्यंत 374 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला DPDC बैठकीत मान्यता देण्यात आली. अकोला जिल्ह्यात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील काळासाठी अधिकाधिक व व्यापक कामांचे नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत व वेळेत प्रक्रिया पूर्ण करून कामांना चालना द्यावी, असे पालकमंत्री फुंडकर यांनी ‍दिले.

दरम्यान, कृषी उत्पादनांचे लिकिंग होत असल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यामुळे थेट कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. पंचनाम्याची रीतसर प्रक्रिया पूर्ण न केल्याबद्दल एचडीएफसी एर्गोविरोधात पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल आहे. या कंपनीने त्यानंतर सादर केलेले खोटे पंचनामे कृषी विभागाने पोलीसांकडे दाखल करन्याचे सूचना पालकमंत्र्यांनी दिले आहेत..

मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची,हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का ? आमदार इद्रिस नायकवडी

बकरी ईदच्या कुर्बानीवरून मंत्री नितेश राणेंनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडींनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय. बकरी ईद कशी साजरी करायची,हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का ? असा सवाल करत वाचळवीर नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला शहाणापण सांगण्याची गरज नाही,अशी टीका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे.मंत्रीपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे.तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या पशूंची कुर्बानी मुस्लिम समाजाकडून देण्यात येत नाही,आणि ती होऊ नये,याचीही जबाबदारी मुस्लिम समाजाची असल्याचेही आमदार इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे,सांगलीच्या मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जत मधील शिक्षण संस्थेत बेकायदेशीर शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप

सांगलीच्या जत मध्ये एका शिक्षण संस्थेत बेकायदेशीररित्या शिक्षक भरती सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावरून संचालक गटामध्ये वाद न्यायप्रविष्ठ आहे,शिवाय पीटीआर देखील मंजूर नाही,त्यामुळे शिक्षण उपसंचालकांकडून कोणतीही कार्यवाही न करण्याच्या सूचना आहेत.तरी देखील जाहिरात देऊन शिक्षकभरती करण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीने शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक संतोष पट्टणशेट्टी यांनी केली आहे.दरम्यान याबाबत के.एम,हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापकांनी सदर शिक्षक भरती संचालक मंडळाच्या एका गटाकडून कायदेशिररित्या करण्यात येत आहे,त्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे अर्ज देखील केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Maharashtra News Live Updates : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिव राज्याभिषेक

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य सोहळ्याला आता काही वेळात सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. मेघडंबरीसह पुरातन वस्तू आकर्षक फुलांनी सजवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com