
कराड येथील कृष्णा रुग्णालयात 2 तर
सह्याद्री रुग्णालयात 1 असे 3 जणांवर उपचार होत आहेत.
जिल्ह्यात एकूण आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 4 वर पोहोचलीय.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांची माहिती
पुण्यातील सदाशिव पेठेतील एका भरधाव कारनं १२ जणांना उडवलं. सर्व विद्यार्थी MPSC ची तयारी करत होते.
पुणे महापालिका नवे आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांनी स्वीकारला पदभार
माजी आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
कोरोना काळात पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांनी काम केले आहे.
पदभार स्वीकारताना महापालिका अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त,खाते प्रमुख उपस्थित होते.
उद्या होणाऱ्या कुंभमेळा बैठकीला वैष्णव आखाड्यांचे महंत आले. याच साधू महंताच्या उपस्थित गोदा आरती करण्यात येत आहे. पूरोहित संघाकडून दररोज गोदा आरती केली जाते.
आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झाले. निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
धुळे शहरातील शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या खोली नंबर 102 ची खासदार संजय राऊत यांनी पाहणी केली. मला ही खोली पाहण्याचा मोह झाला. दोन कोटीची खोली पाहण्याचा मला योग आला हा दुर्मिळ योग आहे. विधानसभेत आम्ही आमच्या आमदारांना हा प्रश्न उपस्थित करायला लावणार. महाराष्ट्रात कशाप्रकारे भ्रष्टाचार चालतो हे मी पार्लमेंटमध्ये देखील सांगणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका गुन्हेगाराला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ शहरातील जाम रोड भागात तो लपून राहत होता. भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा वय ३५, असं बिश्नोई गँगच्या सदस्याचं नाव आहे. तो पंजाबमधील जालंधर येथील रहिवाशी आहे. याला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली.
आरोपी निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या कर्वेनगरच्या घरी दाखल झालेत. निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या घरी आले असून ते झाडाझडती करत आहेत. वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे ह्या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून त्याची जप्ती करण्यासाठी पोलीस दाखल झालेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत मनसेला मोठा धक्का...
शेकडो मनसैनिकांनी मनसेला केला जय महाराष्ट्र...
अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मनसैनिकांनी घेतला भाजपमध्ये प्रवेश...
भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात झाला पक्षप्रवेश...
धुळे शहरातील पांजरा नदी वरील फरशी पुलावरून कार थेट नदीपात्रात पलटल्याची घटना उघडकीस आली आहे, वाहनावरील कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट नदीपात्रात जाऊन पडली, या अपघातामध्ये सुदैवाने कारचालक बचावला असून, कारचालकाला किरकोळ दुखापत झाली असून स्थानिकानी तात्काळ धाव घेत कारचालकाला खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या गँगस्टर मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक
दोन वर्ष पासून यवतमाळ च्या जाब रोड भागात होता वास्तव्यास खबरीच्या माहिती वरून यवतमाळ पोलिसांकडून अटक
आरोपी भुपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा राहणार जालंधर पंजाब असे आरोपीचे नाव
2023 मध्ये राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून होता फरार,त्याच्यावर 25 हजाराचे चे होते बक्षिस
भुपेंद्र ला फॉरेन हुन सौरभ गुज्जर कडून होत होती फंडिंग अशी माहिती
टिटवाळा बल्याणी शाळा दुर्घटना प्रकरणात गुन्हा दाखल, संस्था चालक अटकेत!
केबीके इंटरनॅशनल शाळेच्या संरक्षक भिंतीचा कोसळल्याचा काल सायंकाळी घडली होती धक्कादायक घटना
अपघातात एका अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन लहान मुले गंभीर जखमी
स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस चौकीत शाळा चालकाविरोधात गुन्हा दाखल
निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शाळेचे संस्था चालक सुबराव बाबासाहेब खराडे यांना २४ तासांत पोलिसांनी घेतलं ताब्यात
जखमी मुलांवर उपचार सुरू, परिसरात संतापाचं वातावरण
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त बदनापूर शहरात निघाली भव्य रॅली; मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार नारायण कुचे DJ च्या तालावर थिरकले
डोक्यावर फेटे आणि खांद्यावर घोंगडी घेत शाळकरी विद्यार्थ्यांनी महिलांचाही देखील सहभाग
५ लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी नागपुरात छळ...
विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार...
पती, सासू, सासरे, नणंदच्या विरोधात गुन्हा दाखल...
भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात.
पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सी. आय. डी. चौकशीची सुनीता देशमुख यांची मागणी.
बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल.
भाजपा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला नवीन वळण.
छत्रपती संभाजी नगर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगर शहराच्या अध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. सोबतच स्थानिक मंत्री, खासदार, आमदार यांच्यामार्फत लॉबिंगही अनेकांनी केली होती. मात्र यात भाजपचे किशोर चितळे यशस्वी ठरलेत. किशोर शितोळे हे देवगिरी बँकेचे अध्यक्ष आहेत. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे मराठा चेहरा असलेल्या किशोर शितोळे याना संधी मिळाली आहे.
काय झाडी..काय डोंगर काय हाॅटेल या डाॅयलाॅगमुळे देशभरात चर्चेत आलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज नव्या कोऱ्या एसटी बस मधून प्रवास केला.
एसटी महामंडळाने सांगोला आगाराला नवीन पाच बस गाड्या दिल्या आहेत. आज माजी आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते नवीन बस गाड्याचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर शहाजी पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नव्या कोऱ्या बसमधून काही अंतर प्रवास केला.
जुन्या कसारा घाटातील जव्हार फाट्याजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्गावर पोलिस कर्मचारी प्रयत्न करत आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात ट्रक बंद पडल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू.
पुणे -
वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील तीन जून पर्यंत पोलीस कोठडी..
निलेश चव्हाण आणि राजेंद्र हगवणे यांची समोरासमोर चौकशी करायची आहे त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली
नाशिक -
- भक्ती गुजराथी यांचा व्हिसेरा पोलिसांनी ठेवला राखून
- पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हँगिंग असल्याचे समोर
- भक्ती गुजराथी यांच्या आत्महत्ये नंतर माहेरच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता संशय व्यक्त
- उर्वरित बाकीच्यांचे पोलिस आज घेणार जबाब
- भक्ती गुजराथी चा पती सासरा ,आणि सासू न्यायालयीन कोठडीत
- पीएम रिपोर्ट मध्ये हँगिंग असत तरी व्हिसेरा राखून व्हिसेरा रिपोर्ट नंतर होणार कारण स्पष्ट
मुंबई APMC दक्षता पथकाकडून मोठी कारवाई
सेस न भरल्यामुळे 200 कंटेनरवर कारवाई
तूर आयातदारावर 1 कोटी 11 लाख 48 हजार रुपयांचा दंड
दक्षता पथकाकडून बिना लायसन्स शेतमालाची आयात , निर्यात
अनधिकृत व्यापार करणारे एका आयातदारचा 200 कंटेनरवर कारवाई
काल दिवसभर रविवर्माची ठाणे येथे ATS ने केली होती चौकशी...
चौकशी दरम्यान अनेक खुलासे वर्माने एटीएस समोर केले होते...
यानंतर आता ठाणे एटीएसने रवी वर्माला मुंबई येथे रवाना केले आहे दरम्यान मुंबई एटीएस कडून देखील वर्माची चौकशी होणार आहे.
रायगडसह संपूर्ण महाराष्ट्राला मागील आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपले. भात शेतीची ऐन पेरणी हंगामात बरसलेल्या या अवकाळीमुळे रायगडमधील भातशेती आडचणीत आली आहे. शेतात पाणी साचल्याने पेरणी होण शक्य नाही. अशा परिस्थितीत शासनाच्या आप्तकालीन धोरणानुसार 65 MM पेक्षा आधिक पाऊस झाल्याने आपत्तीच्या निकशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून पंचनामे करण्याचे कान प्रगती पथावर असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किसन जावळे यांनी सांगितले आहे.
महादेव तुकाराम गिरमकर अस चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव
चोरीदरम्यान 38 हजार 400 रुपये मंदिरामध्ये चोरी करण्यात आली वापरली हत्यार पोलिसांनी केली जप्त
मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा स्वारगेट पोलिसांनी केला होता
या आरोपींनी अजून कुठे अशा प्रकारच्या चोर्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत
- अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीमध्ये ती शताब्दी जयंती उत्सव सोहळा
- उत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित..
- अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून मुख्यमंत्री जनसमुदायाला करणार संबोधित
- चौंडीमध्ये सभा आणि सोहळ्याची जय्यत तयारी
- गेल्या काही दिवसापूर्वी चौंडीमध्ये झाली होती कॅबिनेटची बैठक
- बैठकीत चौंडीच्या विकासासाठी देण्यात आलाय कोट्यावधीचा निधी..
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभुमी असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरीतून या वर्षीपासून पालखी सोहळ्याला सुरूवात होणार आहे.. माऊलींच्या 750 व्या जन्मदिनाचे औचित्य साधत पंढरपूरकडे निघणा-या या पालखीत जवळपास 30 हजार वारकरी सहभागी होणार आहेत..
V/O - अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरीत माऊलींनी ज्ञानेश्वरी रचली आणि सर्व जगाला ज्ञानाची गंगा अर्पण केली.. त्याच नेवासा नगरीतून या वर्षीपासून पंढरपूरला पायी पालखी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. ज्ञानेश्वर मंदिरासह जिल्ह्यातील सर्व संत महंताच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.. जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या पालख्या माऊलींच्या पायी पालखीत सहभागी होणार असून 19 जून रोजी दिंडीचे प्रस्थान होणार आहे..
मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका
गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाल्याची घोषणा! करत हातभार लावलेल्या सर्व कासवांचे मनःपूर्वक अभिनंदन!" असलेले लावण्यात आले बॅनर,
तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शीळ रोड परिसरात आंदोलन
पलावा पुलासाठी ठाकरे गट व मनसे एकत्र येणार
आगरी गटाचे व मनसेचे कार्यकर्ते पलावा पुलाच्या ठिकाणी दाखल
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावातील निबे वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या दोन महिन्यांत पाचवा बिबट्या जेरबंद झाला होता.. रात्री आठ वाजता बिबट्या जेरबंद झाला मात्र मध्यरात्रीनंतर पिंजऱ्याच्या फळ्या तोडून बिबट्या पसार झाला आहे.. वन विभागाकडे असणा-या पिंजऱ्याची दुरावस्था झाली असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे..
Anchor_पुण्याच्या इंदापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी शताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते ध्वजावंदन करून सामूहिक रित्या अहिल्यादेवींची आरती देखील पार पडली. या सोहळ्याला विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या.
पहाटेपासून कारवाईला झाली सुरुवात
जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या भागावर कारवाई सुरू
31 मे पूर्वी गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली मुदत आज संपणार
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला होता आढावा
कोल्हापूर पोलिसांनी किल्ले विशाळगडावरील पोलीस बंदोबस्त वाढवला
वैष्णवी हगवणे प्रकरणी अटक केलेल्या निलेश चव्हाणला थोड्या वेळात पिंपरी चिंचवड पोलीस कोर्टासमोर हजर करणार
सुट्टीच्या कोर्टात पुणे न्यायालयात निलेश चव्हाणची सुनावणी होणार
वैष्णवी हगवण्याचे बाळ घेऊन गेल्याचा आरोप निलेश चव्हाण वर असून तो फरार झाला होता त्याला पुणे पोलिसांनी नेपाळमधून अटक केली त्यानंतर आज कोर्टात हजर केला जाणार.
थोड्या वेळात निलेश चव्हाण ला सुट्टीच्या कोर्टात हजर केलं जाणार.
भंडाऱ्यात मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने धुमशाम बघायला मिळत आहेत. रखरखतं ऊन्ह आणि शरीराला बसणारे चटके यांना बेजार होणारा शेतकरी मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे रडकुंडीस आला आहे. कापणीयोग्य भातपीक जमीनदोस्त झाले, कापणी केलेले भातपीक पाण्याखाली आले आणि मळणी केलेले धान पाण्यात सापडल्याने अनेक ठिकाणी याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसल्याने ते आता चिंतेत सापडले आहेत.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचा वतीने करण्यात आले आहे.
बडतर्फ अधिकारी रणजीत कासले सोशल मीडियावर भडकाऊ वक्त करत आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
त्यामुळे रणजीत कासलेवर आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत...
रणजीत कासले वर वेळीच पाय बंद घालावेत अशी मागणी देखील बीड करांनी केली आहे...
मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळ बाबंडे येथील शेतकरी संभाजी साळवी यांनी साडे चार एकरामध्ये दोन लाख रूपये खर्च करून कलिंगड शेती केली होती. मात्र वेळेआधीच जोरदार बरसलेल्या पावसाने कलिंगड शेतीची पुरती वाट लावली आहे. या कलिंगड शेतीतून त्या शेतकऱ्याला सरासरी पाच लाखाचे उत्पन्न वर्षाकाठी मिळणार होते. मात्र वेळेआधीच कोसळलेल्या पावसाने कलिंगडाची पूर्णपणे नासधूस झाली. तर हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कलिंगडच्या मागणीत घट झाली. त्यामुळे संभाजी साळवी या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे कणकवलीतील प्रसिद्ध असलेला सावडावचा धबधबा ही पुर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. सावडाव धबधबा हा सिंधुदुर्गातील एक निवांत आणि निसर्गरम्य धबधबा असून यावर्षी पाऊस वेळेआधी सुरु झाल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे सर्वात सुरक्षित असणाऱ्या या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्यासंख्येने दाखल होत आहेत.
राज्य महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा
मनसेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
4-5 दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे यांसारखे प्रकार सर्रास सुरू त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी राज्यपुरुष आयोगाची गरज
मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र
देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण 51.5% असल्याचा पत्रात उल्लेख
चिपळूण तालुक्यात 310 घरकुल मंजूर झाले आहेत. अनेकांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तालुक्यातील प्रमुख नद्यांमध्ये बांधकाम करण्यायोग्य रेतीसाठा असून लिलाव प्रक्रिया रखडल्याने बांधकामासाठी वाळूची प्रचंड मागणी लक्षात घेता वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. अवैधपणे रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरूच असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. रेती घाटाचे लिलाव न झाल्याने किंवा शासन निर्णयाप्रमाणे दहा टक्के वाळू गट स्थानिक वापरासाठी आणि घरकुलांसाठी निश्चित निश्चितीकरण न झाल्याने वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. नव्या वाळू धोरणानुसार शासनाने घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा करून तसे शासन निर्णय निर्गमित केले. मात्र पावसाळा सुरू झाला तरी वाळू उपलब्ध होत नसल्याने मोफत वाळू धोरणाची अंमलबजावणी कधी होणार? असाच सवाल घरकुल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
गावात अवैध दारू विक्री आणि पिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी करूनही काहीच होत नाही. त्यामुळे बिलोली तालुक्यातील गंजगाव ग्रामपंचायतीने दारुड्यांच्या विरोधात एक ठराव घेतला. गावात दारू विक्री केल्यास पाच हजारांचा दंड आणि दारू पिऊन येणाऱ्यास एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे.
तेलंगणा-मराठवाडा सिमेलगत असलेल्या अनेक गावांमध्ये सर्रासपणेअवैध दारूची विक्री होत आहे. दारू सेवन केल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येत असून काही गावात खुनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी गंजगावसह अन्य ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाचा प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतोय.धाराशिवच्या वाशी तालुक्यातील दसमेगाव गाव येथील सचिन कोठावळे या शेतकऱ्याच्या ड्रॅगन शेतीच पावसामुळे नुकसान झाले.फळ आणि फूल धरणाच्या अवस्थेत असलेल्या ड्रॅगनची वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेती जमीनदोस्त झाली.दहा ते बारा लाखांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन बांधले जात आहे. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचे 21 फुटी पुतळ्यासह स्मारक उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी दीपमाळ, बारव अशा अनेक गोष्टी साकारण्यात येत आहेत. या स्मारकासाठी राज्य सरकारने 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.
25 मे ला दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेशने खाजगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झालं. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केला.
गोरखपूरमध्ये जिथं उतरला, त्यापुढं तो कुठं गेला? हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करणं सुरू झालं.
पुढचं दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचं आढळलं.
30 मे ला पिंपरी चिंचवड पोलीस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली इथं पोहचले.
त्यावेळी तो तिथं निदर्शनास आला अन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आळवल्या
जालन्यातील अंबड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. काल भरदिवसा अंबड तालुक्यात तीन गावात ५ ठिकाणी घरफोड्याच्या घटना समोर आल्या आहे. या घरफोड्यात सोने, चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.शिराढोण,पारनेर,किनगाव या गावांमध्ये पाच ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या आहे.अंबड तालुक्यातील शिराढोण येथील गणेश वाबळे हे शेतात कपाशी लागवडीसाठी गेले असता दुपारी त्यांचे घर फोडुन ९० हजार रोख, परमेश्वर वाबळे यांच्या घरातील रोख १० हजार ,सोने,चांदीचे दागिने तर रामेश्वर वाबळे यांच्या घरातील १५ हजार रोख,एक नथ अन्य वस्तू चोरिस गेल्या आहे.किनगाव येथील मोहन चौधरी यांचे घर फोडुन सोने, चांदी ,रोख असा अंदाजे साडेसहा ते सात लाखांचा ऐवज लंपास केला तर पारनेर येथील भगवान संसारे यांचे गावातील मध्यभागी असलेले घरफोडुन अंदाजे सहा लाखांचे सोने व रोख २३ हजार चोरीला गेले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे..
लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारा प्रतापसिंह रजपूत या पोलीस उपनिरीक्षकाने, अटकपूर्व जामीन अर्जामध्ये तक्रारदाराच्या बाजूने न्यायालयात रिपोर्ट देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्याकरिता 25 हजाराची लाच मागितली, मात्र संशय आल्याने चक्क ठाण्यातूनच या पोलीस उपनिरीक्षकाने पलायन केले आहे.. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी काम करणारया प्रत्येक ग्रामपंचायतील दोन महिलांना यापुढे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने त्याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यातल्या 55 हजार महिलांचा यापुढे सन्मान होणार असल्याचेही मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
- विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले महाविकास आघाडीतील उमेदवार सीसीटीव्ही फुटेजसाठी सतीश वारजूरकर, संतोषसिंग रावत आणि सुभाष धोटे यांची हायकोर्टात धाव...
- निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश...
- निवडणुकीशी संबंधित सीसीटीव्हीसह इतर व्हिडिओ फुटेज आणि १७ (सी) फॉर्मच्या प्रती मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत.
- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी वारजूरकर, बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांनी रावत, तर राजुरा मतदारसंघात देवराव भोंगळे यांनी धोटे यांचा पराभव केला. त्यानंतर या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट प्रिंटर्स ही उपकरणे मतदानासाठी गोदामांतून बाहेर काढण्यापासून ते मतदानानंतर गोदामांत परत ठेवण्यापर्यंतच्या काळातील सीसीटीव्हीसह इतर सर्व व्हिडिओ फुटेज आणि १७ (सी) फॉर्मच्या प्रती मिळविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज सादर केले. परंतु, त्यांची मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा
तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी
यावेळी दोघे कट्टर विरोधक आले आमने-सामने
रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनाला
दोघेही एकाच वेळी दर्शनाला आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही
यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते
शिरवणे एमआयडीसी मधील टर्बोचार्जिंग कंपनी मध्ये जहाजांचे कॉम्पोनंट्स सर्व्हिसिंगची कामं केली जातात.. याच कंपनीच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कंपनीतून जहाजाचे 4 कंप्रेसर व्हील, 2 बेअरिंग सेट, 60 स्पेशल टूल्स, 1 इंडक्शन स्टोव्ह असा एकूण 93 लाख 18 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.. घटनास्थळ परिसरातील 40 सिसिटीव्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी तुर्भे एमआयडीसी परिसरातून 4 आरोपीना अवघ्या 24 तासात अटक केली आहे... अटक चारही आरोपीना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेरुळ मध्ये घरफोडी केलेल्या सराईत गुन्हेगारांना नेरुळ पोलिसांनी 32 तासात अटक केली आहे. दोनही आरोपी पळून जात असताना त्यांना भुसावळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ सेक्टर 3 मध्ये घरफोडी करून सोने व रोख रक्कम असा एकूण 35 लाख 42 लाख रुपयांचा एवज चोरट्यांनी लंपास केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अस्लम इसराईल शेख आणि दिनेश कुमार नंदलाल सोनी या दोघांना अटक केली असून त्यांच्या जवळून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल रिकवर केला आहे... अस्लम इसराईल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशी, दहिसर, मुंबई अश्या विविध ठिकाणी तब्बल 16 गुन्ह्यांची नोंद आहे... न्यायालयाने आरोपिंना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई करत तब्बल दोनशे गोण्या दहा टन बोगस डीएपी खत जप्त केलय. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी कंपनी मालकासह भोलेश्वर रामेश्वर छानछरीया आणि केशव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमान्वये जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात डीएपी खताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे अशा प्रकारे बोगस डीएपी खत विक्री होत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे. या अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाने कारवाई करत बोगस खत जप्त केला आहे..
कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी व झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी पुरवठा राहणार बंद
सोमवार, २ जून दुपारी १.३० ते मंगळवार, ३ जून सकाळी ७.३० या दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा राहणार बंद
सिंहगड किल्ल्यावर सध्या अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील तीन दिवस – म्हणजे दि. 31 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
या काळात पायवाटांद्वारे गडावर येणाऱ्या पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, ही विनंती. गडावर JCB किंवा अन्य मोठ्या वाहनांचा वापर शक्य नसल्यामुळे काही स्थायिक RCC (रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट) बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे. ही सर्व कामे हातानेच करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीस अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे.
धानोरी येथे काही दिवसांपूर्वीच होर्डिंग कोसळले होते. सुर्दैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यापूर्वी होर्डिंग कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हकनाक जीव गेले आहेत. त्यानंतरही महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बेकायदा होर्डिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील या भागात करण्यात आली कारवाई
औंध, बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच होर्डिंगवर कारवाई
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचलेत. गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या.मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली अन पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.
यंदा हंगामापूर्वीच पावसाळा आल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील मोगरा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. आधी कडक ऊन आणि नंतर मे महिन्यातच आलेला पाऊस यामुळे मोगऱ्याच्या कळ्या गळू लागल्या असून उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झालीये.
अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातील कृषीभूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी एक एकरात जवळपास चार हजार मोगऱ्याची रोपं लावली. त्यांना या रोपांपासून किमान दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मोगरा उत्पादन निम्म्याहून कमी झालय. दरवर्षी त्यांच्या बागेतील मोगरा दादर येथे विक्रीसाठी पाठवला जातो. यंदा मोगऱ्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम झालाय. त्यामुळे कृषी विभागाने मोगरा शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीय.
लोणावळा शहरातील वलवन धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मुलगा पाण्यामध्ये बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा शहरातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अथांम प्रयत्ना नंतर मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढन्यात यश आले आला. निलेश शिंदे कासारवाडी पुणे वय सतरा असे त्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याच्या दहा-बारा मित्रांबरोबर लोणावळ्यात पर्यटनासाठी आला होता. वरसोली इथून वलवन धरणाच्या मागील बाजूस ते गेले होते. त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये ते पोहण्यासाठी पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे यांचा पाण्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावरून आमदार म्हणून मिटकरींनी आता लक्ष्मण हाकेना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे?, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढतांना लक्ष्मण हाकेने एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आमदारअमोल मिटकरींनी केलाय.
रात्री च्या सुमारास मुंबई - नाशिक महामार्ग ओलांडताना एका अज्ञात वाहनाने साडे तीन वर्षाच्या नर बिबट्या ला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी वन परिक्षेतील मुंबई नाशिक महामार्गावर करंजपाडा जवळ रात्री च्या वेळी भक्षाच्या शोधात मुंबई नाशिक महामार्गा ओलांडत असताना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या बाबत खर्डी वन विभागाला माहिती मिळताच तात्काल घटनास्थळी पोहोचून सदर बिबट्या ला वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याचा पशुसंवर्धन अधिकारी मार्फत शवविच्छेदन करून अग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.
भंडाऱ्यातील तुमसर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या ११ वर्षांच्या निष्पाप मुलीवर दि. १६ मे रोजी अत्याचार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी समाजभिती आणि आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांमुळे तक्रार करण्याचे टाळले. मात्र आरोपी थेट पीडितेच्या घरी जाऊन तिच्या पालकांना धमकावू लागला. या प्रकारानंतर भयभीत कुटुंबियांनी अखेर धैर्य एकवटत तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यसह मावळ मध्येही विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. पंधरा दिवस उलटूनही अजूनही सरकार दरबारी मार्ग निघाला नाही. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मोजणीचे काम ठप्प झाले आहे.आम्हा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र स्तरावर सुधारित वेतन श्रेणी लागू करावी. वर्ग तीन आणि वर्ग चार भरती प्रक्रिया लवकरात लवकर लागू करावी, अशा अनेक राज्य स्तरावरच्या मागण्या आहे.. मात्र राज्य सरकारने आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल मंत्री अतिशय चांगले काम करत आहे मात्र आमच्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे हे त्यांना दिसत नाही का. आम्ही सर्व कर्मचारी शेतकरी कुटुंबातील आहे. मंत्री महोदय साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख मधील बंधू-भगिनींना तांत्रिक वेतनाचा सुधारित वेतन श्रेणी असो किंवा आकृतीबंध असो, वर्ग तीन आणि वर्ग चार ची भरती प्रक्रिया असो अशा प्रमुख मागण्या मान्य करून कर्मचारी बंधू भगिनींना न्याय द्यावा असं मत पुणे जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष सदानंद मोरडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे मात्र कर्मचाऱ्यांचा असाच संप सुरू राहिला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोजण्या लांबल्या आहेत. अनेक लोकांचे कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले
अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलंय.. थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता, त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.. सुनील कमालकरनं असं मारेकरी काकाचं नाव आहे.. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.. दरम्यान, कुणाल बेपत्ता असल्याची तक्रारी खदान पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वी दाखल होती. मात्र, त्यानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपास दरम्यान हा काकानेच पुतण्याची हत्या केल्याचं उघड झालंय.. या प्रकरणात खदान पोलिस अधिक तपास करतायत..
मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं केलं शेतकऱ्यांचं स्वप्न मातीमोल... शेतात डोलणाऱ्या ज्वारीच्या कणसांना फुटले कोंब.. काढणीचा खर्च निघणंही कठीण... काही कणसाला कोंब फुटले तर काहींची ज्वारी पडली काळी...
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातला ज्वारी उत्पादक शेतकरी मोठा चिंतेत आहेये.. कारण, मान्सूनपूर्व झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं स्वप्न मातीमोल केलंय.. उन्हाचा तडाखा सोसून शेतात डोलणाऱ्या ज्वारीच्या कणसांना आता कोंब फुटले आहे.. खर्च काढणही आता शेतकऱ्यांसाठी अवघड झालंय..
जोरदार पावसामूळ ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झालंये.. अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारी कणसाला कोंब फुटले तर काहींची ज्वारी काळी पडली आहे.. या कोंबाकडे पाहून शेतकऱ्याचे डोळ्यात अश्रू येतायेत.....
आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांतून होत आहे....याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी...
*चौपाल* हिंगणी गावातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसोबत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.