Maharashtra News Live Updates: नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णात वाढ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 28 May 2025: आज , बुधवार दिनांक २८ मे २०२५, महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन, पावसाची धुवांधार हजेरी, राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Corona : नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णात वाढ

नवी मुंबईत कोरोनाची संख्या वाढत चालली आहे.

आज कोरोना रुग्णांची संख्या चार वर पोहोचली आहे.

नवी मुंबईत एकूण १९ संख्या कोरोनाची झाली आहे

Dapoli : दापोली तालुक्यातील पाडले गावाला वादळाचा दणका

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील पाडले गावाला वादळाचा दणका बसलाय.

सायंकाळी अचानक आलं वादळ

अचानक आलेल्या वादळाने अनेक घरांचे पत्रे आणि कौले उडाली

गावामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

अचानक आलेल्या वादळामुळे आणि झालेल्या नुकसानीमुळे पाडलेवासियांची तारांबळ

Yavatmal News : वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंटर बाबा दर्ग्याजवळील घटना घडली.

नांदेडकडून यवतमाळकडे जाणाऱ्या लेनवरून अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवलं. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार

राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याला बघणसाठी गर्दी,वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून नागरिकांनी दिली माहिती

बिबट चार ते पाच महिन्याचा असल्याचा अंदाज

पुण्यात झाड पडून आणखी एकाचा मृत्यू

गेल्या तीन दिवसातील पुणे शहरातील दुसरी धक्कादायक घटना घडलीय.पुणे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह होत असते. मे महिना संपत आला तरी सुद्धा धोकादायक झाडे काढायला पालिकेला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पुण्यातील निलायम टॉकीजच्या समोर रस्त्यावर झाड पडल्यामुळे रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झालाय.

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यात सर्वत्रच सकाळपासून अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले. तर निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने गोळे-गोंदेगाव परिसरातील गोई नदीला पूर येऊन तिच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेत शिवारात पाणीच पाणी साचले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दल (टकसाली) चे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

शहरातील अनेक भागांमध्ये काळोख दाटत पावसाला सुरुवात झालीय. हवामान विभागाकडून आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.नागपुरात साडेपाच वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. आज विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्यात ऑरेंज आल्यावर देण्यात आला होता. तर पूर्व आणि पश्चिम विदर्भात नागपूरसह अनेक भागांमध्ये येलो अलर्ट दिला होता.

तुकाईनगर गाडी तोडफोड प्रकरणात बार मालकांना अटक

तीन दिवसांपूर्वी तुकाई नगर परिसरामध्ये 20 ते 22 गाड्यांची तोडफोड झाली होती.

चार आरोपींना सिंहगड पोलिसांनी अटक केली होती. तोडफोड करण्यापूर्वी आरोपी बारमध्ये जाऊन दारू प्यायले होते. दोन आरोपी अल्पवयीन आहेत. बार मालकांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांना पोलिसांनी नोटीस बजावलीय.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील 20 मिनिटांपासून जोरदार पाऊस

पावसात अंधेरी पूर्वेकडील पानिपत चौकात एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षा चालक जखमी झाला असून त्याला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. झाड कोसळल्यामुळे अंधेरी सबवे परिसरातून जोगेश्वरी पूर्वेकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून झाड बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सीना नदी ओव्हरफ्लो

सोलापूर जिल्ह्यातील मागच्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागलीय.

धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस

मोहोळ तालुक्यासह दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूरची वरदायिनी म्हणून आहे सीना नदीची ओळख आहे.

सध्या सीना नदीची पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

छत्रपती संभाजीनगर शहरातील हडकोमध्ये भरधाव कार आणि स्कुटीचा अपघात

छत्रपती संभाजीनगर शहरातील हडकोमध्ये भरधाव कारने स्कुटीस्वाराला उडवल्याची घटना घडलीय. शहरातील हडको एन-12 भागातील ही घटना आहे. एक कार ही भरधाव वेगाने आली आणि स्कुटीस्वाराला जोरदार उडवली. त्यानंतर स्कुटी ही इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली आणि मोठा स्फोट होऊन स्कूटीला आग लागली आणि त्यात स्कूटर जळून खाक झाली आहे. या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून कार घेऊन पसार झाला आहे.

हिऱ्याची अंगठी चोरणाऱ्या मोलकरणीला पश्चिम बंगालमधून अटक

नागपूरतील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत विनायक नगर येथे नुपूर अग्रवाल यांच्या घरी मर्याही नोकरानी म्हणून काम करायची.

- 18 मे रोजी अग्रवाल या घरी एकटाच होत्या त्यावेळी त्यांनी ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवल्या. संधीचं फायदा घेतल्या हिऱ्याच्या दोन्ही अंगठ्या चोरून नेल्यात.. दिसत नाही असं माहित पडल्यानंतर हेच दुसरीकडे मरिया नुपूर यांना पन्नास हजार मागितले होती.. आणि ती कामावर सुद्धा आली नव्हती.

वैष्णवीचे न्यायालयात चारित्र्यहनन करण्याचा हगवणेंच्या वकिलाचा प्रयत्न

लता, शशांक, करिष्मा यांना १ दिवसांची पोलीस कोठडी

राजेंद्र आणि सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी

अंधेरी सबवेमध्ये पाणी भरायला सुरुवात

पुण्यात हिंदुत्ववादी संघटनाचा रस्ता रोको आंदोलन

पुण्यात हिंदुत्ववादी संघटनाचा रस्ता रोको आंदोलन

पुणे महानगरपालिका गुरुवार पेठ येथील अवैध अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणीसाठी रस्ता रोको

दफडगेट पोलीस चौकी चौकात रास्ता रोको करणार, पोलिसाचा मोठा बंदोबस्त

ससून रुग्णालयात पावसाच पाणी, रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर १३ मधील वेटिंग हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथे बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पत्र्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे वेटिंग हॉलचा भाग पाण्याने भरला आहे, ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीच्या परिस्थितीत बसावे लागते.

या समस्येमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे लगेच या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. "आम्ही रुग्णांची सेवा करण्यासाठी इथे बसतो, पण पावसाचे पाणी आत येऊन आमच्यासाठी अडचण निर्माण होते. रुग्णालयाने ही समस्या लगेच सोडवावी," अशी तक्रार एका नातेवाईकाने केली.

कल्याण डोंबिवलीत कोविडमुळे दुसरा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत कोविड पॉझिटिव्ह पाच रुग्ण आढळून आले आहेत . त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्टेडियमचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे

वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी बहुजन भिमसेना संघटनेच्या वतीने कोर्टाच्या बाहेर आंदोलन

वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळावा यासाठी बहुजन भिमसेना संघटनेच्या वतीने कोर्टाच्या बाहेर आंदोलन

हगवणे विरोधात महिला आक्रमक

हातामध्ये बांगड्या घेऊन जोरदार निदर्शन

दिपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टाच्या गेटवर आंदोलन सुरू

हगवणे कुटुंबीयांवरती बांगड्या फेकणार

तासाभरापासून कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी

कल्याण डोंबिवली सकाळपासून ढगाळ वातावरण

तासाभरापासून कल्याण डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी

कोकणाला रेड अलर्ट, मुंबईत पावसाला जोरदार सुरुवात

धाराशिवच्या भुम तालुक्यात पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू

भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्पात महिला, वृद्ध, लहान मुलांचे जलसमाधी आंदोलन

आरसोली येथील तलावातून भूम आणि वाशी शहरासाठी प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेविरोधात गावकरी आक्रमक

पहिल्या योजना आणि पर्यायी सोय असताना सरकारी निधी लाटण्यासाठी योजना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप

आंदोलनात आरसोली,वंजारवाडी, हिवरा,दिंडोरी व हाडोंग्री गावातील हजारो गावकरी सहभागी

आंदोलन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त,उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही दिली भेट

या तलावात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी

उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात

मागच्या पाच दिवसांपासुन खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरुर तालुक्यात पाऊसाने हाहाकार केलाय त्यातच सकाळपासुन पाऊसाने उघडीप दिल्याने दिलासा मिळेल असं असताना दुपारपासून मुसळधार पाऊसाला सुरुवात झालीय

मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई

मुंबईत मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते कुलाबा वेधशाळे कडून मुंबईसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देखील दिला होता शिवाय समुद्रकिनारी भागात आज दुपारी 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाजही कुलाबा वेधशाळेकडून वर्तविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेकडून समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई देखील करण्यात आली.

जालन्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक गावातील गौतमी नदीला आला पूर

जालन्यातील परतुर तालुक्यात काल मुसळधार पाऊस पडला . या पावसामुळे तालुक्यातील ओढ्याला आणि नद्यांना पूर आला आहे.परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक ते आष्टी रोडवरील पुलाचे काम सुरू आहे, काल झालेल्या पावसामुळे सावरगाव बुद्रुक गावातील गौतमी नदीला पुर आला असून या पुरातूनच गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान गावकऱ्यांना आष्टी आणि परतुरकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने गावकरी याच मार्गावरून धोकादायक आणि जीवघेणा प्रवास करत आहे

सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्रपरवाना देताना खोटे शपथपत्र दिल्याचं उघड

सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्रपरवाना देताना खोटे शपथपत्र दिल्याचं उघड झालं असून पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

खोटा भाडेकरार करून परवाना मिळवल्याच देखील प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. कायम स्वरूपी घर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असताना ग्रामीण पोलिसांनी परवाने नाकरल्यानंतर पुण्यातील घरच्या भाडेकरारावर राहत असल्याचं दाखवून परवाना मिळवला असल्याचं समोर आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उद्या परभणी दौऱ्यावर भाजपाकडून सभेची जय्यत तयारी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी विकास परिषदेच्या बैठकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे . त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन देखील त्याच ठिकाणाहून करणार आहेत हा कार्यक्रम संपल्यानंतर परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर भाजपाच्या वतीने आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे कारण परभणी जिल्ह्याला भाजप आणि मंत्रीपद खूप दिवसानंतर दिलेला आहे आणि पालकमंत्री पद देखील मेघना बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या सभेची जयत तयारी भाजपाकडून केली जात आहे

Maharashtra Rain Update: मॉन्सून ब्रेक! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची विश्रांती

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेला सरकल्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस पाऊस विश्रांती घेईल अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या ३ दिवसांपासून पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने बॅटिंग केली होती.

२६ मे रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आता तो राज्यातील सर्वच भागात पसरला आहे.

पुण्यासह कोकण विभागात आज तुरळक पाऊस पडण्याची शक्यता जरी असली तरी उद्यापासून पाऊस पुढील काही दिवस ब्रेक घेणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

पुढील काही दिवसाचा पावसाचा अनुमान काय असणार आहे

करुळ घाटात डोझर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने घेतला पेट

वैभववाडी करूळ घाटात कोल्हापूरच्या दिशेने डोझर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरने अचानक पेट घेतला. या आगीत कंटेनर आणि त्यातील डोझर मशीन पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सुदैवाने दुर्घटनेत कंटेनर चालक थोडक्यात बचावला मात्र कंटेनर आणि त्यातील डोझर मशीनचे जळून मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथील जुंदरे मळ्यातील शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे वाहून गेल्याने गाई ,म्हशी ,शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर अनेक जनावरे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. कांदा लसूण तसेच घरात साठवून ठेवलेल्या गव्हाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तसेच घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य उघड्यावर आले आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.वाळूंबा नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावातील पूल वाहून गेल्याने गावातील संपर्क तुटला आहे तसेच गावातील 40 हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांमधील मालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

हगवणे कुटुंबीयांना भावदान पोलिस स्टेशनमध्ये आणलं

हगवणे कुटुंबीयांची आज पोलीस कुठली संपत असल्याने बावधन पोलीस आज त्यांना करा न्यायालयासमोर हजर

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हगवणे कुटुंबीयातील पाचही आरोपी एकाच दिवशी आणि एकाच वेळी न्यायालयासमोर पोलीस करणार हजर

हगवणे कुटुंबातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी आणखी वाढवून मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागून

जालना जिल्ह्यात 44.5 मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाची आकडेवारी समोर

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात 44.5 मिमी एवढा पाऊस पडलाय. जिल्ह्यातील 49 मंडळापैकी 17 मंडळात अतिवृष्टी झाली असून परतुर आणि श्रेष्ठी मंडळात सर्वाधिक 103 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाची आकडेवारी समोर आली आहे. काल जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला आहे.या पावसाचा जिल्ह्यातील कांदा पीकासह फळबागांना आणि द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने उघड दिली असली तरी काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आज प्रवाहित झाल्या आहे.

Maharashtra News Live : राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या ५ जणांना जामीन मंजू

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयाने काल सुनावली होती न्यायालयीन कोठडी

माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसे गाव येथील राहुल जाधव,अमोल जाधव,तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडी ची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती

या सर्वांचा आता २५ हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन झाला आहे

Nanded: दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी मागील काही दिवसांपासून सक्रिय होती. त्यापैकी काही चोरटे शहरातील कॅनॉल रोड परिसरात चोरीच्या दुचाकीसह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत दुचाकी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीकडून 18 लाख 20 हजार रुपयांच्या मुद्देमालसह 26 दुचाकीही जप्त केल्या आहेत.या दुचाकी चोरी टोळीने नांदेड, परभणी, हिंगोली यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्या आहेत. दरम्यान 24 मे रोजी देखील नांदेड शहरातील लोकमित्रनगरमधून एकाची दुचाकी चोरीला गेली होती. भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासाची चक्री फिरवताच दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली. पुढील तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत.

लोहा शहरातील चक्क एटीएम मशीन चोरट्याने पळवली

नांदेडच्या लोहा शहरातील एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडलीय.लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवण्यात आलेल्या "इंडिया कॅश बँक प्रायव्हेट" या कंपनीचे हे एटीएम मशीन होते. एटीएम मशीन मध्ये किती पैसे होते याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. परंतु वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम मशीन पळून नेल्याच्या घटनेमुळे लोहा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान लोहा पोलीस एटीएम मशीन चोरट्यांचा तपास करीत आहेत.

Nashik News: नाशिक शिवाजी नगर खुनाच्या गुन्ह्यातील तिघे आरोपी जेरबंद

- नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी केली कारवाई, सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा लागला शोध...

- गंगापूर पोलिसांच्या पथकाने सिन्नर फाटा ते सायखेडा दरम्यान पाठलाग करून तिघांना केली अटक...

- आदित्य वाघमारे, वैभव भुसारे आणि विशाल तिवारी हे अटक केलेल्यांची नावे...

- नसीम शाह या युवकाची काल नाशिकच्या शिवाजीनगर परिसरात करण्यात आली होती हत्या...

डी आर एम रेल्वे ऑफिससमोर शिवसेना आंदोलन सुरू

आज आंदोलन केलं आहे

प्रवाशाच्या सुरक्षा बाबत काही निर्णय नाही घेतला तर उद्या घेराव घालू

यापेक्षा तीव्र आंदोलन करू

गेले दोन वर्षापासून रेल्वे चे दुर्लक्ष आहे

मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच विदर्भाच काश्मीर असलेल्या चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी होण्यास सुरवात

आज सकाळ पासूनच पर्यटक चिखलदरा मध्ये दाखल..

चिखलदरा मध्ये मागील काही दिवसांपासुन सुरू आहे संततधार पाऊस..

पावसात भीमकुंड पॉईंट पर्यटकाची गर्दी..

मे महिण्यात सतत पावसामुळे सगळीकडे पसरली हिरवळ

सावरकरांच्या जयंतीनिमित्त पुणेकरांकडून सावरकरांच्या खोलीत जात अभिवादन

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महविद्यालयीन शिक्षण घेतलंय. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे या निमित्ताने त्यांनी वास्तव्य केलेली फर्ग्युसन महाविद्यालयातील १७ नंबरची खोली आज पुणेकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. अनेक पुणेकर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आज या खोलीला भेट देत आहेत..

Maharashtra Politics: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेच आंदोलन

वारंवार निवेदन देउन,घेराव घालून रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही. रेल्वे मंत्री आले कि तेवढी धावपळ दिसते.पण प्रवाशांचे हाल आहेत.

मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी शंभर कोटी देऊन सुद्धा अजून पर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत

यामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार

शिवसेना पुणे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात येतंय

चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान

पत्रे उडाले,भिंती कोसळल्या पूर्व भागातील सुमारे 200 ते 250 घरांचे नुकसान....

सोनवल गावात पत्रा लागल्याने पती पत्नी जखमी....

जवखेडा, मंदाना, सुलवाडे , सोनवल, कवळीथ, खेडगीर गावात केळी पिकांचे प्रचंड नुकसान....

साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर...

सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कानवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी....

Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले धरण ओव्हरफ्लो

गेल्या आठ दिवसांपासून अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे.. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस भरणारे आंबित धरण यंदा मात्र मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले आहे.. अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांपैकी ओव्हरफ्लो होणारे आंबित हे पहिले धरण ठरले आहे..

काल बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये झाला ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना जिल्ह्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस पडलाय.

बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय.

यामुळे बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला असून नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.

गोलापांगरी शिवारातून वाहणाऱ्या नदीला मे महिन्यात पहिल्यांदाच पूर आल्याच ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

तर आज सकाळपासून जालना जिल्ह्यात पावसाने उघाड दिली असली तरी जिल्ह्यातील नद्या मात्र प्रवाहित झालेल्या पाहायला मिळत आहे

Dharashiv Unseasonal Rain: अवकाळी पावसाने धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान

धाराशिव-गेली दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नावर अक्षरशा:पाणी फिरवले आहे.

सलग सुरू असलेल्या पावसामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालय.

शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केलीय.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडूनच, 3 दिवसांपासून व्यापारी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले दिसून येते मुसलदार पावसामुळे मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक आणि पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 गाड्यांचे आज आवक झालेली आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना माल फेकून देण्याची वेळ आलेली आहे

केमिकल माफिया विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल माफियांवर अखेर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मागील आठवड्यात रहिवासी परिसरात कोणतीही प्रक्रिया न करताच घातक रासायनिक केमिकल खुलेआम नाल्यांमध्ये सोडल्या प्रकरणात पोलिसांनी काही टँकर ताब्यात घेतले होते .

या प्रकरणात अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला उशिरा शहाणपण सुचलं असून काल रात्री उशिरा मानवी जीविकास धोका निर्माण केला म्हणून बोईसर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

विवेक वडे, शुभम दुबे आणि नील राऊळ या तिघां विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे

शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६० ते २५० रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसणार आहे.खरीप हंगामात प्रामुख्याने मका,सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, बाजरी व मूग या पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले असून काही कंपन्यांचे मका बियाणे हे १०० ते २०० रुपयांनी महागले आहे मकाचे ४ किलो बियाणे पाकीट ८०० ते २२५० रुपयांपर्यंत आहेत तर कपाशीचे बियाणे पाकीट ४० रुपयांनी महाग झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत डीएपी खत वगळता अन्य खतांच्या बॅगमध्ये १८० ते २८० रुपयांची वाढ झाली आहे यामध्ये १२:३२:१६ या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. १०:२६:२६, १५:१५:१५, ल२०:२०:०:१३,या खतांच्या किमती वाढल्या आहे,यामुळे खरिप पेरणीचे बजेट वाढणार आहे.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार

आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात करणार हजर

अटक झाल्यानंतर कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने सुनावली होती दोन्ही आरोपींना 28 मे पर्यंतची पोलीस कोठडी

आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार

याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली आहे अटक

शेतात रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वृद्धाचे उपोषण सुरू

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर गावातील दोन शेतकरी कुटुंबाने शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अवकाळी पावसात हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे अपंग पत्नीला सोबत घेत आमरण उपोषण सुरू केल आहे, दत्ता गिरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे ,कहाकर

गावातील काही शेतकऱ्यांनी या अल्पभूधारक शेतकऱ्याचा रस्ता अडवल्याने मागील अनेक महिन्यांपासून या शेतकरी कुटुंबाचे शेतात जाणे बंद झाले आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांनीच आपल्या प्रकरणात लक्ष घालून शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे या शेतकरी कुटुंबाने केली आहे.

सिंधुदुर्गात पावसाने घेतली उसंत,  ढगाळ वातावरण 

गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज पहाटेपासून बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये आजही वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 102 मिलिमीटर झाला आहे. तर सर्वात कमी दोडामार्ग तालुक्यात 11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून संपुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर पावसाचा जोर मात्र बऱ्यापैकी ओसरलेला आहे.

Maharashtra News Live Updates: सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त ठरला ; अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमान

सोलापूरकरआतुरतेने ज्या दिवसाची प्रतीक्षा करीत होते, अखेर तो दिवस जवळ आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली. येत्या ९ जूनपासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र,ही सेवा उडान योजनेंतर्गत नसणार आहे.त्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे.

सोलापूरकरांना उडान योनजेचे आश्वासन दिले गेले होते.आता या योजनेचे काय झाले,अशी विचारणा सोलापूरकरांकडून होत आहे.सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचे तिकीट दर कमीत कमी ३,४९१ रुपये, तसेच जास्तीत जास्त ५ हजार ६०० रुपये (यात ५ टक्के जीएसटीचा समावेश आहे) इतके असणार आहे.तेच उडान योजनेतंर्गत तिकिटाचे दर दोन ते अडीच हजार रुपये असणार होते.मंगळवार दुपारपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून,तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाइटला भेट दिली.त्यामुळे सायंकाळी फ्लाय ९१ ची वेबसाइट हॅक झाली.

भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचं स्वप्न भंगलं

भंडाऱ्यात मागील चार दिवसात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यातं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं भातपीक सापडलं. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेला भातपीक मळणीसाठी शेतात ठेवला होता, तो पाण्याखाली आला. तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात भात पीक कापणीला आलेला असताना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसात भातपीक अक्षरश: शेतात भुईसपाट झाला. तर, अनेक शेतकऱ्यांचं मळणी केलेलं भातपीक अचानक आलेल्या बेमोसमी पावसात ओलचिंब झालं. काहींचं भातपीक पाण्याखाली सडायला आलं आहे.कर्ज आणि सोनं गहाण ठेवून शेती पिकविण्याचा खटाटोप करणाऱ्या शेतकऱ्यांवर या मान्सूनपूर्व पावसानं मोठं आर्थिक संकट उभ केलं आहे.

भंडाऱ्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात काल दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर, अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खांबडी शेतशिवारात घडली. मृतकात एका महिलेसह हार्वेस्टर चालकाचा समावेश आहे. तर, दोन्ही जखमी है शेतमजूर आणि हार्वेस्टर वरील कामगार बसून दोघांवर सध्या अड्याळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कांता जीभकाटे (५५) आणि विजय सिंग (४०) असं मृतकांचं नावं आहे. तर, संजय गाडेकर (४७) आणि महेश तेजासिंग (३०) असं गंभीर जखमी असलेल्यांची नावं आहेत.

वैद्यकीय निष्काळजीपणातही न्‍यायाला विलंब, ससूनमध्‍ये प्रकरणे प्रलंबित

डॉक्‍टरांच्‍या हलगर्जीपणामुळे मृत्‍यू किंवा अपंगत्‍व, चुकीचे उपचार, उपचारांत हलगर्जीपणा याबाबतच्‍या आलेल्‍या तक्रारींवर ससूनमधील वैद्यकीय तज्‍ज्ञांची समिती (मेडिकल बोर्ड) बैठक घेउन हलगर्जीपणा झाला किंवा नाही त्‍याचा अहवाल पोलिसांना देते. त्‍यानुसार संबंधित रुग्‍णालय, डॉक्‍टरांवर कारवाईची शिफारस करण्‍यात येते. मात्र, ससून रुग्‍णालयात विविध कारणांमुळे २०१९ पासून २२८ असे प्रकरणे प्रलंबित असून ते न्‍यायाच्‍या प्रतीक्षेत आहेत.

११२ प्रकरणांमध्‍ये न्‍याय होणे बाकी आहे. ही प्रकरणे पुणे शहर, जिल्‍हा, पिंपरी चिंचवड व सहा प्रकरणे इतर जिल्ह्यांतील आहेत. सातारा, सांगली, अहिल्‍यानगर अशा काही जिल्ह्यांतील प्रकरणेही ससूनमध्ये वर्ग करण्यात आली आहेत.

नालासोपाऱ्यात २४० ग्राम वजनाचे मॅफोड्रीन ड्रग्स जप्त

नालासोपाराच्या प्रगती नगरातून २४० ग्राम वजनाचा एम, डि, मॅफोड्रीन नावाचा ड्रग नायझेरिअन नागरिकांकडून जप्त करण्यात आला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. बेन जोसेफ औनुमेरे एज़ीवगो (46) जॉन ओकाफोर (31) फेवर फ़िबी यूसुफ (36) असे या आरोपींची नावे आहेत

त्यांच्याकडून तब्बल ४८ लाख २४ हजाराचा मॅफोड्रीन ड्रग तुळींज पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यांच्याकडे भारत देशात वास्तव्य करण्याकरिता आवश्यक असलेलं पारपत्र व व्हिसा आढळून आले नाही.

ते नालासोपाराच्या अंशित प्लाझा घर क्रमांक 203 या इमारतीमध्ये राहत होते. त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घर मालकावर तसेच घर दाखवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकांच्या सुट्टीला ब्रेक ,दोन जूनपासून प्रशिक्षण सुरू

पुणे जिल्ह्यातून दोन हजारांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण

वरिष्ठ वेतन श्रेणी अन् निवड वेतनश्रेणीसाठी राज्यभर एकाच वेळी असणार प्रशिक्षण

शिक्षकांची उन्हाळी सुट्टी झाली यंदा कमी

राlज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख, मूल्यांकन, स्कॉफ अशा विविध वीस विषयांची ओळख करुन देण्यासाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठीचे प्रशिक्षण २ जूनपासून सुरू होणार आहे.

त्यासाठी पुणे जिल्ह्यातून वरिष्ठ वेतनश्रेणीस १४३३ आणि निवड वेतनश्रेणीसाठी १०६१ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे

प्रत्येक वर्गात ४० ते ६० शिक्षकांचा समावेश असणार

पुण्यात टँकरची संख्या १५ टक्क्यांनी घटली

पुणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येत घट

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा

शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता

त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती

महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या

मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाची माहिती

मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती, आता ही मागणी १५ टक्के कमी झाल्याची माहिती

बालाघाटच्या पर्वतरांगेतील येडशी येथील रामलिंग धबधबा प्रवाहित

धाराशिव- गेल्या काही दिवसात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग धबधबा इतिहास पहील्यांदाच मे महीन्यातच प्रवाहित झालाय.त्यामुळे पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.बालाघाटच्या पर्वत रांगेत रांगेतील रामलिंग हा धबधबा ऐतिहासिक मानला जातो.रामायणात रावण आणि जटायू या दोघांचं या ठिकाणी युद्ध झालं होतं,या युद्धात रावनाने जटायू चा वध केला होता.चटायूला पाणी पाजण्यासाठी प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारून पाण्याचा स्तोत्र निर्माण केला होता तेव्हापासून हा धबधबा प्रवाहित अशी आख्यायिका रामायणात सांगितली जाते.या ठिकाणी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना केली असून जटायूची समाधी देखील आहे.हे ठिकाण रामलिंग या नावाने प्रसिद्ध आहे.त्यामुळे इथे महाराष्ट्र सह परिराज्यातील भाविक व पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात.रामलिंग चा धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.

जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा धुमाकूळ, नद्या नाल्यांना पूर, पुढील तीन दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट

जालना जिल्ह्यात सर्व दूर पावसाने धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला असून बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव आणि वाकुनी गावामध्ये ओढ्याचे पाणी शिरले, त्यामुळे नेहमी जून महिन्यात प्रवाहित होणाऱ्या नद्या यावर्षी मे महिन्यातच प्रवाहित झाल्या आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सुकना नदीला पूर आला असून घनसांवगी तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर जाफराबाद तालुक्यातील देखील नद्या दुथडी भरून वाहत आहे. काल जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची दोन जनावरे अंगावर विज पडून दगावली आहे. दरम्यान जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे..

उल्हासनगर मधील रोडवर कचऱ्याचे साम्राज्य

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील पूनम हॉटेल समोरील रोडवर रोज असाच कचरा पडलेला दिसून येत असून.नेहमीच असा हा कचऱ्याचा ढीग असतो. कचऱ्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य झाले आहे व सर्वीकडे दुर्गंधी पसरली आहे.येथून चालणे सुद्धा मुश्किल होत आहे, स्थानिक नागरिकांना या घाणीतून नाक दावून ये जा करावी लागत आहे,अशामुळे साथींच्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही.उल्हासनगर महानगरपालिकेने शून्य कचरा या संकल्पनेनुसार करोडो रुपयांचा ठेका कोणार्क कंपनी ला दिला आहे. पण ह्या ठेक्याचा फायदा नक्की कुणाला होत आहे. उल्हासनगर शहरातील जनतेला, प्रशासनाला की कंपनीला असा प्रश्न उपस्थित होत आहे,

दिलीप दिसले यांच्या परिवाराला पाच लाखाची आसाम सरकारकडून मदत

आसाम सरकारने सुद्धा पहलगाम हल्ल्यातील पनवेल येथील दिलीप दिसले दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार झाले होते त्यामुळे असं सरकारने आसाम सरकारचे पर्यावरण हवामान कायदामंत्री चंद्रमोहन पटावरी यांनी पनवेल इथे दिसले कुटुंबांची भेट घेत त्यांना आसाम सरकारकडून पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे

तसेच राज्य सरकारने सुद्धा 50 लाख रुपयांची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार दिसले कुटुंबांना सुद्धा राज्य सरकारने धनादेश अदा करण्यात आला आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून हे धनादेश मंजूर करण्यात आले आहेत

पुण्यातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष, स्पीकर उभारू नका, पालखी सोहळा प्रमुखांची मागणी

जून महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी च्या वतीने प्रशासनाला पुणे शहरातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष आणि स्पीकर ची उभारणी नको अशी मागणी करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान पुणे शहरात जागोजागी सार्वजनिक मंडळे, संस्था संघटनांकडून स्वागत कक्ष रस्त्यावरच उभारलेले जातात. हे स्वागत कक्ष पालखी रथ तसेच दिंडी प्रमुखांचे सत्कार करण्यात अग्रेसर असतात. अशावेळी प्रत्येक ठिकाणी रथ थांबला तरी, किमान दहा मिनिटे जात असल्याने पालखीला मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास मोठा उशीर होतो. त्यामुळे हे स्वागत कक्ष रस्त्यावर असू नये, अशी मागणी आता करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावाचे तात्काळ पंचनामे करा , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश

महसूल ,कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष सूचना

सर्व विभागाकडून आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना

जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि घडलेल्या घटनांबाबत तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असून, त्याचा हेल्पलाईन क्रमांक ०२०- २६१२३३७१, २६१३३५२२ आणि मोफत दूरध्वनी क्रमांक १०७७ आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com