
पुण्यात कोथरूड पोलीस ठाणे शेजारील विद्युत डीपीचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना.
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल, कोणतीही जीवित हानी नाही
डोंबिवली कचोरे येथील आरएसएस च्या शाखेवर दगडफेक प्रकरणानंतर भाजपसह आरएसएस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेचा भाजप आरएसएस कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवला जातोय.
आज कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर परिसरात शेकडो आर एस एस चे कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार ,माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या दगडफेकीच्या घटनेचा हातात निषेधाचा फलक घेऊन घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
यावेळी माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की ,"शाखेमध्ये देशावरचे प्रेम आणि धर्म जागरण बाबत कार्यक्रम राबवले जातात त्या ठिकाणी दगडफेक करणे हे खऱ्या अर्थाने धर्मांधपणाचे लक्षण आहे . प्रत्येकाला आपापल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे मात्र दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणे हा अधिकार या देशात कोणालाही मिळालेला नाही .
संघाच्या शाखेवर दगडफेक करणारा धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र या प्रकरणामागे नेमके कोणते शक्ती काम करतेय याचा तपास पोलिसांनी करावा, पोलीस या प्रकरणामागे असलेल्या शक्तींना योग्य शिक्षा देतील असा विश्वास वाटतो असे सांगितले
नाशिकच्या येवला शहरात नगर-मनमाड मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी असलेल्या व्यावसायिक गाळ्या मध्ये साईप्रसाद इरिगेशन या हार्डवेअरच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली दुकान बंद असताना ही आग लागल्याने आत मध्ये असलेले प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले दरम्यान येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे व्यवसायिकाचे लाखोंच्या नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
पनवेलमधील माळढुंगे गावाजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात झालाय.
माळढुंगे गावाजवळील रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झालेत.
चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वारावर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अमरावती MIDC मधील कापसाच्या गाठी असलेल्या अग्रवाल यांच्या गोडाऊनला भीषण आग...
शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती...
आगीमध्ये कापसाच्या गाठी मोठ्या प्रमाणात जळून खाक...
घटनास्थळी अग्निशमन विभागाचे पथक दाखल, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू
चंद्रपूर - मूल महामार्गावर लोहारा ते घंटाचौकी यादरम्यान ही आग लागली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी जंगलाचे मोठे क्षेत्र सापडले असून, पालापाचोळा सुकलेला असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. आगीची माहिती मिळताच वन विभागाची वणवा नियंत्रण पथक घटनास्थळी पोचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
औरंगजेब याचा उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक
पुण्यातील लाल महल बाहेर जोरदार घोषणाबाजी
अबू आझमी विरोधात सुद्धा घोषणाबाजी
भाजपा आमदार सुरेश धस हे आज शिरूरच्या दौऱ्यावरती असून ते सतीश उर्फ खोक्या भोसले च्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत तीन दिवसापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले तर ग्लास हाऊस वनविभागाकडून पाडण्यात आले होते.
सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आला आहे.पाच लाख रुपयांचा पहिलं बक्षीस,बैलगाडी शर्यतीच्या मैदानासाठी ठेवण्यात आले असून यामध्ये मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडी चालक सहभागी झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहिगडे फाउंडेशनच्यावतीने या भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कारनं शहापूर तालुक्यातील लाहे गावाजवळ पेट घेतलाय. कारला आग लागल्यानंतर कारमधील प्रवासी क्षणात बाहेर पडली. प्रवासी सुखरूप आहेत. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली असून, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक.
खासदार सुप्रिया सुळे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी शशिकांत शिंदे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार बैठक.
पुणे शहर,पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
आढावा बैठकीला आजी-माजी आमदार माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
नगर जामखेड रोडवरील सारोळाबद्दी या गावाजवळील प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागलीय. अहिल्यानगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तसेच एमआयडीसी आणि पाणी पुरवठा योजनेचे पाण्याचे टँकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेत. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि सुतळीचे बारदान असल्यामुळे ही आग आटोक्यात येत नाहीय. अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील साकारला येथील दुर्वाश डोये या दीड वर्षीय चीमुकलचा अंगणात खेळत असताना आंधळगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव टाटा सुमने दीड वर्षीय दुर्वाश ला धडक दिली यात दुर्वाश डोये या चिमुकलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सकरला गावात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याने आईने एकच टाहो फोटला. घटनेनंतर सर्वांचंच काळीज पिळवटून जात होतं.अपघातानंतर चिमुकलीच्या वडिलांचा फिर्यादीवरून चालकचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आंधळगाव पोलीस करत आहेत.
- झेड पी चे सीईओ कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची केली कारवाई.
- टीईटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई.
- 2024 साली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती कागदपत्र पडताळणीसाठी पाच शिक्षकांनी लावली होती हजेरी
- त्या कागदपत्रात स्वयंघोषणापत्र देत कागदपत्र खरी असल्याचा दिला होता दाखला.
- 2024 साली पाच शिक्षकांची शिक्षण सेवक पदी करण्यात आली होती नियुक्ती.
- झेडपी कडून कागदपत्रांची तपासणी, पडताळणी दरम्यान पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित पाच शिक्षक सेवकांचा समावेश असल्याचं झालं उघड.
- सोलापूर झेडपीला खोटी आणि बनावट कागदपत्र सादर करून शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळवल्याचा ठेवण्यात आला ठपका.
- जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, सांगोला तालुक्यात प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून पाच शिक्षक करत होते काम
जुना राजवाडा पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात
परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार असे बंटी बबली जोडीचे नाव
कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहत परिसरात असणाऱ्या एका लोकल मॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी झाली होती चोरी
चोरी प्रकरणी लोकल मार्टचे मॅनेजर केतन पाटील यांच्याकडून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात दाखल होता गुन्हा
जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मॉलमध्ये फिरून किमती वस्तूची चोरी करणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार या पती-पत्नींना घेतलं ताब्यात
राजकारण गेले चुलीत,देशाचा जो अजेंडा आहे,त्याकडे सगळ्यांना जावंचं लागेल..
त्यामुळे रोहित पवार प्रयागराजला डुबकी मारायला गेले,
धर्म हा उपासनेशी जोडलेला नाही धर्म हा संस्कृतीशी जोडला गेला आहे.
त्यामुळे हिंदू धर्म जगामध्ये आयडियल झाला,
सर्वधर्मांना समान न्याय दिला.
शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मशिदी बांधायला जागा दिल्या आणि अटल बिहारी वाजपेयी मदरशाला कॉम्प्युटर दिले.
त्यामुळे हिंदू विचार देशातील अन्य विचारयांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावे लागेल..
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फोनवर जय शिवराय बोलण्याच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया..
अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांची भाजप सोबत येण्याची ऑफर..
खासदार विशाल पाटलांच्या उपस्थितीत मंत्री चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना दिली भाजपमध्ये सोबत येण्याची जाहीर ऑफर..
राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं,
वर्तमान मध्ये विशाल पाटलांकडे चार वर्षे चार महिने आहेत.
जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी याचा विचार करावा..
मात्र विशाल पाटलांनी यावर भाष्य करणे टाळत,पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे केले स्पष्ट.
- अक्कलकोट मध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच
- औरंगजेबचे स्टेटस ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपींचा आकडा 14 वरून 21 वर...
- धाराशिव जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून 18 वर्षीय युवकाला झाली होती बेदम मारहाण
- मृत्यूशी झुंज देणाऱ्या 18 वर्षीय माऊली गिरी याने अखेर उपचारादरम्यान मृत्यू
- गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील खाजगी रुग्णालयात युवकावर 14 दिवस सुरू होते उपचार
- बेदम मारहाण झाल्यापासून युवक शुद्धीवर नव्हता अशी आई-वडिलांची माहिती
- संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या,मृत युवकाच्या आई-वडिलांची मागणी
- सदर प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यातील आंबे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती नोंद
- सोलापुरातील खाजगी हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांनी केली होती गर्दी.
अहिल्यानगर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे दाखल...
शरद पवारांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे होणार उद्घाटन..
कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे, भाजपचे माजी आमदार बबनराव पाचपुते उपस्थित...
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रथमच खा.शरद पवार नगर जिल्ह्यात...
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.निलेश लंके मात्र कार्यक्रमाला अनुपस्थिती..
शरद पवार आज भाषणात काय बोलणारव याकडेच सर्वांचे लक्ष
बिबट्यांकडून चक्क कचरा डेपोत अन्नाचा शोध सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हा व्हिडीओ आहे.. कोतुळ गावातील कचरा कुड्यांजवळ रात्रीच्या वेळी बिबटे येऊन प्लास्टिक पिशव्यांमध्ये फेकलेले चिकन मटण शोधून खात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.. अकोले शहरात देखील रात्रीच्यावेळी कचरा डेपोत येऊन बिबटे अन्नाचा शोध घेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.. अनेकदा भटकी कुत्री कचरा कुड्यांमध्ये अन्नाचा शोध घेत असतात मात्र आता बिबटे देखील कचरा डेपो आणि कचरा कुड्यांमध्ये अन्नाचा शोध घेत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय...
संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजे निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहुकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका आणि अभंगाच्या हस्तलिखिताची वही असा 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केलाय. यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिरे भाविकांना पाहायला मिळत आहेत.
भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली आयएनएस 'गुलदार' ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) सुपुर्द करण्यात आली आहे. ही नौका वेंगुर्ले 'निवती रॉक' जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालयात रूपांतरित करण्यात येणार आहे.
सध्या ही नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली आहे. पाण्याखालील संग्रहालय होणारा भारतातील हा पहिला उपक्रम आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गाची ओळख आता पाण्याखालील पर्यटनस्थळ म्हणून होणार आहे.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. सेवेतून निवृत्त झालेल्या नौकांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण व पर्यटनासाठी याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अभ्यास करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा सुरू आहे. दरम्यान संबंधित डंपर चालकावर कारवाई करण्यात यावी या मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याचा तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी असलेला 37 अंश सेल्सिअस तापमान अचानक 40°c पर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यात नागरिक उन्हापासून त्रस्त झालेले आहेत सातत्याने नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पार हा वाढत असून त्याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना होताना पाहायला मिळत आहेत...
या महाराष्ट्रात संतांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येणार आहेत.. वन विभागाने कारवाई करत खोक्याचे घर पाडले होते तर त्याच दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ आणि मारण्याची घटना घडली होती.. या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस आज भोसले कुटुंबाची भेट घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता भेट घेण्यासाठी शिरूर कासार येथील झापेवाडी येथे जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.