
पुलवामा येथील प्रिचू येथील फळ बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आमदार, मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. रायगड पालकमंत्रीपद, निधी वाटप, महामंडळ पद वाटप, आणि इतर राजकिय मुद्द्यावर एकनाथ शिंदे सहकारी आमदारांसोबत चर्चा करणार आहेत.
नणंद आणि तिच्या मुलांनी केलेल्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील धनकवडीत घडलीय. याप्रकरणी नंदेसह चौघाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..वर्षा तुकाराम रणदिवे वय 35 असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
माजलगाव तालुक्यातील नित्रूड परिसरात तेलगाव-माजलगाव रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. यात ४ जणांचा मृत्यू झालाय.
विपश्यना केंद्रातून परतल्यानंतर माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आले. मुंडे यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच विवाह समारंभाला हजेरी देखील लावलीय.
आजचे कोरोना रुग्ण - 00
एकूण रुग्ण - 12
रुग्णालयात दाखल रुग्ण - 05 (खाजगी रुग्णालय)
डिस्चार्ज- 03
मृत्यू - 02 (सहव्याधी)
गृह विलगीकरण - 02
रुग्ण (प्रकृती स्थिर)
ठाण्यात आज परत ४ नवीन कोरोना रुग्ण आढळले. यासह एकूण रुग्ण संख्या ११२ झालीय. गृह विलगीकरणात २७ रुग्ण आहेत. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३ आहे.
मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेचे वतीने त्यांचा जंगी सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिनची स्टाईल केली होती, मात्र भरत गोगावले यांनी नॅपकिन कशी मी वापरतो याची स्टाईल आपल्या भाषणातून रंगतदार सांगितली.
विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, तशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिल. येत्या ८ मे रोजी पाथरी येथे अजित पवारांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा सुरुवातीला शरद पवारांना सोडणार नसल्याचे जाहीर करून ते अजित पवार यांच्याबरोबर गेले होते. त्यानंतर लोकसभेचे निकाल आले आणि निकालानंतर संभाजीनगर येथे जाऊन त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष लढले. आता परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बॅनरबाजी
मुंबईची मातृभाषा हिंदी झाल्याचे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं होतं
त्यानंतर एका कवितेच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांच्यावर मनसे कडून टीका करण्यात आली आहे
मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येणारा तू तर दुतोंडी साप
मराठी भाषेचा अपमान करतोय कुठे फेडशील हे पाप
अशा अशा याचे बॅनर लावत मनसेकडून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.
शिरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील बोराडी गावात राहणारे सिंगा तुमड्डु पावरा या 70 वर्षीय वृद्धास स्वतःच्याच तीस वर्षीय मुलाने डोक्यात लाकडी दांडका मारून ठार केले आहे, सुनिल सिंगा पावरा असे मारेकरी मुलाचे नाव आहे, वडिलांनी आपल्या घरात राहू नये यावरून मुलाचे गेल्या दोन दिवसांपासून वडिलांशी भांडण सुरू होते, मुलगा बाहेरून घरी परतला असता वडील घरामध्ये झोपलेले बघून त्याचा राग अनावर झाला, आणि संतापलेल्या मुलाने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात मारले यामध्ये वृद्ध वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले आहे.
घाटकोपरच्या आरसिटी मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका व्यक्तीची आत्महत्या
दिपक जोशी असे आत्महत्या करणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीचे नाव
काही दिवसांपासून ही व्यक्ती मानसिक तणावत असल्याची पोलिसांनी दिली माहिती
ही व्यक्ती आरसिटी मॉल मध्ये आली आणि मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेत केली आत्महत्या
पार्कसाईट पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करून सुरू केला तपास
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनिल तटकरे यांना आव्हान दिल आहे. तटकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवाव अस आव्हानात्मक विधान दळवी यांनी केल आहे. रविवारी महाडमध्ये गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सभेतील विधांनांवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलेल्या वक्तव्याचा दळवी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
डिभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील पुल कोसळला..
महाळुंगे पडवळ ते गिरवली जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जात होता
सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही
मुसळधार पाऊस आणि पुल जिर्ण झाल्याने पुल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज
महाळुंगे पडवळ गावच्या परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला
पुलाची दुरुस्ती होईपर्यत पर्यायी व्यवस्था करण्याची ग्रामस्थांची मागणी
पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने कोयते उगारुन दगडफेक करत आम्हीच इथले भाई असे म्हणत दहशत माजविली. टोळक्याने केलेल्या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नर्सिंग कॉलेज विनयभंग प्रकरण. विध्यार्थी सह पालक आक्रमक...
प्राचार्य सह कॉलेजच संपूर्ण स्टाफ बदलण्याची मागणी....
सिक्किममध्ये भूस्खलन झालं आहे. या घटनेत ३ जवानांचा मृत्यू झाला आहे.
खासदार वर्षा गायकवाड CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे.
रणजीत कासले याला 13 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .
कोर्टात त्याने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या
महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा देखील घोषणा दिल्या
आयटी पार्क हिंजवडी येथील लक्ष्मी चौक या ठिकाणी आज दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली
आयटी पार्क मधील रस्त्यावर पडलेले खड्डे, बंद पडलेली सिंगल यंत्रणा आणि कमी असलेले वाहतूक पोलीस शिपाई या सगळ्यांमुळे लक्ष्मी चौकात वाहतूक कोंडी
आज दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक आणि आयटी अभियंते हवालदिल
तुषार वाजंत्री याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली
तो रोहा तालुक्यातील असून त्याची पत्नी गावची सरपंच आहे.
तो राज्यातील एका सत्ताधारी पक्षाची तो निगडीत असून. त्याचे फोटो एका बड्या नेत्यासोबत आहेत.
त्याने पुण्यास देशातील अनेक नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती घालून कोट्यवधी रुपये उकलले आहेत.
पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याला पुणे गुन्हे शाखेचे पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर अधिक तपासाठी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती
किडनी रॅकेट प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय
यासाठी अजय तावरे यांच्याकडे सखोल चौकशी आणि तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली
विदर्भची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अकोला जिल्ह्यात आगमन झाले.
आज अकोला जिल्ह्यातील पारस येथे पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. 3 जुन रोजी पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे 4 व 5 जुन असे दोन दिवस मुक्काम राहील.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतशिवारात एक वेगळीच घटना घडली आहे, नवख्या व्यक्तीने ट्रॅक्टर चालू केले आणि ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत कोसळण्याची घटना घडलीये. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने प्राणहानी टळली.
नगरमध्ये दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु तर दुसऱ्याला पुण्याला हलव्यात आले आहे. कोविड रुग्ण आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात 10 बेड ठेवण्यात आले राखीव
धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कलजवळ हृदयद्रावक घटना घडली आहे, वीज वितरण कंपनीचा एक कंत्राटी कर्मचारी विजेच्या खांबावर काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला, या धक्क्याने तो गंभीर जखमी झाला आणि काही काळ विजेच्या खांबावरच अडकून पडला होता,
घटनेची माहिती मिळताच तात्काळ विद्युत वितरण विभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानंतर, पोलीस आणि विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने त्याला सुखरूप खाली उतरवून तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जखमी कर्मचाऱ्यावर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कळताच शंभर फुटी रोड परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने
तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती ... रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे बुधवार ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार, ०४ जून रोजी स ९.०० ते रा. ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे.
धाराशिव तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर मध्ये एमआयडीसी मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन
विष प्राशन करून मरणाची परवानगी द्यावी अथवा जमिनीचा मोबदला द्यावा त्वरित द्यावा म्हणून आंदोलन सुरू
शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करून सुरू केले आंदोलन
औद्योगिक विकास महामंडळाने 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू
वडगाव गावातील 27 शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने प्रशासनाच्या विरोधात सुरू आहे आंदोलन
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गावरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने
तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती ... रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू
तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला? याचा शोध म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जात आहे. येळवंडे यांच्याकडून जप्त करणारे अन ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता, त्या मालकाकडे ही आता संशयाची सुई आहे. उद्या शशांक आणि लता हगवणेंना अटक केल्यावर होणाऱ्या चौकशीत याचा खुलासा होऊ शकतो अशी माहिती महाळुंगे पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झाले आहेत. कांदा लिलाव बंद पाडत सुरू करून ठिय्या आंदोलन केले. गेल्या दीड तासांपासून लिलाव बंद पाडले. सात महिन्यापासून टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने तणाव निर्माण झाला.
बनेश्वर परिसरातील एका घराजवळ गाडीच्या कॅपमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र विलास घोंगडे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एक अति दुर्मिळ प्रजातीचा साप म्हणजेच बेडडोम मांजर्या साप याला पकडला आहे... रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो. सर्पमित्रांनी अत्यंत शिताफिने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वन उद्यानाच्या मागील बाजूस नैसर्गिक अधिवासात सोडून दिले
सोलापूर जिल्ह्यातील में महिन्यात झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे हिप्परगा तलाव 90% पर्यंत भरलाय
सोलापूर शहरासह आजूबाजूची 14 गाव आणि अक्कलकोट तालुक्याला या धारणातून होतो पाणीपुरवठा
या हिप्परगा तलावाची साधारण 3 टीएमसी आहे साठवण क्षमता
या तलावतील पाण्याचा पिण्यासाठी आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो उपयोग
मात्र तलावाच्या बांधा शेजारील झाडांची तोडणी अद्याप करण्यात आली नसल्याने तलावा शेजारील गावांना निर्माण झाला आहे धोका
त्यामुळे तलावाचा बांध भूसभुशीत होऊन बांध फुटण्याची निर्माण झाली आहे शक्यता
पुणे येथील हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर गाडी चर्चेत आली आहे.
एखादा व्यक्ती या गाडीतून उतरला की लोक संशयाने पाहू लागले आहेत.
याचा अनुभव करमाळ्याच्या अतुल खुपसे यांना आल्या नंतर त्यांनी स्वतःच्या फोरच्यूनर गाडीवर एक आगळा वेगळा मजकूर लिहिलाय.
गाडीवरील मजकूर आणि त्यांची ही गाडी सोशल मिडिया चर्चेत आली आहे.
यापूर्वी याच गावामधून कुख्यात साकिब नाचण त्याचा मुलगा व इसीस मधील दहशतवादी कृत्यात सहभागी 16 जणांना तर पुणे येथील प्रकरणात चार जणांना घेतले होते ताब्यात.
सध्या किती जणांना ताब्यात घेतले आहे या बाबत कोणीही माहिती देत नाही
तुमसर वरून भंडारा कडे जात असताना महामार्गावरील मोहाडी येथे बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला असून हा अनुभव महामार्गावरील प्रवासी तथा नागरिकांनी अनुभवला आहे.गावकऱ्यांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले ,ट्रकमध्ये रद्दी कागद असल्याची माहिती मिळाली आहे.आगीचे कारण अद्याप कडू शकले नाही,यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या मे महिन्यात मान्सून पूर्व झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकांवर करपा, डाउनी आणि बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, यातच जमीन ओली असल्याने ट्रॅक्टर द्वारे फवारणी करणे अवघड झाल्याने आता शेतकरी ड्रोनच्या साह्याने द्राक्ष पिकांवर औषधाची फवारणी करत असल्याचे दृश्य निफाड तालुक्यात दिसत आहे
मध्यरात्री अज्ञात लोकांनी केली हत्या संजय सासे या व्यक्तीची हत्या
- संजय सासे ही व्यक्ती बाबागिरी करत असल्याची स्थानिकांची माहिती
- पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिक तपास सुरू...
इंडक्शन खवा मशीन वरती खवा उत्पादन करण्यासाठी टेरीफ मध्ये वीज कनेक्शन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय.
त्यामुळे आता खवा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
धाराशिव च्या भूम परिसरामध्ये दिवसाकाठी 40 ते 50 टन खव्याची निर्मिती केली जाते
या परिसरातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून खवा बणवण्याचा व्यवसाय करतात.
शासनाच्या या निर्णयामुळे खवा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे.
कृषी विभागाची बनावट बियाणं संदर्भात मोठी कारवाई धुळ्यात उघडकीस आली आहे,
जवळपास 30 लाखांपर्यंत बनावट बियाणे व मुद्देमाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत,
गुजरात कडून महाराष्ट्रामध्ये ही बनावट बियाणे आणण्यात येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे,
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावंगी गावाजवळ अनाधिकृत खताने भरलेला ट्रक पुसद कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांनी अधिकृतपणे ट्रक मधील खत व ट्रक ताब्यामध्ये घेतला या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित असून अनाधिकृतपणे खताने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. सध्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे बोगस बियाणे व अनाधिकृत खते परिसरामध्ये येत असल्याची कृषी विभागाला माहिती मिळाल्यावरुन संबंधित ट्रक मधील खताची तपासणी करण्यात येत असून पुढील तपास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिव्यांगांसाठी संधी निर्माण केली तरच त्यांच्या विकासाचा खरा अर्थ साधता येईल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरणाचा कार्यक्रम नगर परिषद तळेगाव दाभाडे कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला दिव्यांग महिलासह नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता..
सदरच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती....
व्यक्ती कोण आहे, गळफास नेमका का घेतलाय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत...
गळफास घेणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची पोलिसांची माहिती....
मान्सून कालावधीत उद्भवणान्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अमरावती जिल्हा शोध व बचाव पथक तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे शहरातील छत्री तलाव येथे मॉकड्रिल करण्यात आले.
शहरासह ग्रामीण भागात अचानक पूरपरिस्थिती आल्यास पाण्यापासून बचावाकरिता कुठलेही साहित्य वापरता येईल याचे प्रात्यक्षिकदेशील यावेळी करून दाखविले.
यावेळी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी बचाव पथकांकडून माहिती जाणून घेतली.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अरविंद सचिन गायकवाड ४ वर्षे, नागेश्वर कॉलनी या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना नागेश्वर कॉलनीत घडली. अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला.
मजुरी काम करणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद हा अंगणात खेळत होता.
त्यावेळी कुत्र्याने हल्ला करत बालकाच्या खोलवर जखमा केल्या. लचके तोडल्याने बालक रक्तबंबाळ झाले.
पुणे महानगरपालिका मध्ये भ्रस्टाचारी ठेकेदारानि ठेके भरले आहेत कीकाय असा प्रश्न पडला आहे.
आळंदी रोड येथील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर Brt बस्टॉप चौकात ठेकेदारने वाहतूक विभागाची परवानगी न घेता, ड्रेनेज चे काम तर केले.
पण ते काम अक्षरशः आधी जसे नादुरुस्त होते तसेच त्यांनी केले आहे.
त्यात काहीच बदल केला नाही. खड्डा तसाचं राहिला आहे.
ड्रेनेज त्यात खाली गेले आहे.
या वेळी काँग्रेस चे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी त्या तुटलेले ड्रेनेज वर बसून प्रतिकात्मक भ्रष्टाचाराचे मासे पकडून वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
व ते ड्रेनेज पुन्हा दुरुस्त करा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू.
इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थी नोंदणीचा १० लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे
त्यात पुणे विभागातील १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे
पुणे विभागातील १ लाख ६४ हजार ९८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे
त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९४ हजार २४३ विद्यार्थी असून, त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यातील ३९ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी भरला अर्ज
आजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.
शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात झाला.
जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अद्यात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष यांनी अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाल्याने व डोक्यावर 10 लाख रुपये कर्ज असल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची वेळ पाहणार आहे असा सवाल जनतेतुन विचारला आहे.
सीबीएसई संलग्न शाळांचा ५ जूनऐवजी ११ व १६ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय
सीबीएसईशी संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरविला आहे
एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत
काही शाळांनी त्यांचा निर्णय बदलला असून, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
यापूर्वी पुणे विमानतळावरून दिवसाला 220 विमानांची ये जा होत होती
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र लिहिले होते
या नंतर आता हवाई दलाकडून आता आणखी पंधरा विमानांना उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली आहे
पुणेकरांच्या जलद आणि सुलभ प्रवासासाठी आम्ही निश्चितच कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली
मागील वर्षभरापासून सोयाबीनचे दर निच्चांकी पातळीवर होते. मात्र आता खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या बियाण्याची मागणी वाढल्यानं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला ४४२० ते ५९०० रुपयांचे उच्चांकी दर मिळालेत. त्यामुळं उच्च प्रतीचं सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतांना दिसतोय.
कुणाल बंडू पवार वय 20 वर्ष असे गोळीबार झालेल्या तरुणाच नाव
शहरातील विंचरणा नदीजवळ रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली घटना, अज्ञात व्यक्तींनी केला गोळीबार
जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींन विरोधात गुन्हा दाखल
या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं
मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सभेदरम्यान भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी खा. सुनिल तटकरे यांच नव न घेता मिश्किल टिका केली.
गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सभेचा उल्लेख नॅपकिन सभा असा करीत दरेकर यांनी नॅपकिन महत्वाचा किती असतो याची अठवण करून दिली.
अंगावर आल तर शिंगावर घ्यायची शिकवण या रायगडच्या मातीने दिल्याचे देखील दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादी नसेल तरी भाजप शिवसेना आणि गोगावले यांच्या पाठिशी राहिल अस सुचक विधान करत असताना शिवसैनिक आणि गोगावले यांची अपूर्ण इच्छा पुर्ण होईल अशा शुभेच्छा दरेकर यांनी दिल्या.
दोन हजारांवर शाळातून गोरगरिबांच्या शिक्षणाचा जिम्मा सांभाळणाऱ्या यवतमाळ जिल्हा परिषदेला शिक्षक भरतीत यश शेतांना दिसत नाही सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याला डच्चू मिळाला आहे आधीच प्राथमिक शिक्षकांच्या सातशे जागा रिक्त असताना आता 317 शिक्षक निवृत्त होत आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा टिकवण्याची अहमहमिका सुरू असताना प्रत्यक्षात खेळखंडोबा होण्याची भीती आहे.
मुंबई पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ
राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण
65 रुग्णांपैकी सर्वाधिक पंचवीस रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती
एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवड मध्ये 6, कोल्हापूर मध्ये 2 तर नागपूर मध्ये एक अशी संख्या आहे
तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पुजेचे साहीत्य विक्री करताना 21 पुजेचे ताट व फळांचे कॅरेट जप्त केले आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या श्रध्देचा फायदा घेत काही अनाधिकृत विक्रेते मंदिर परीसरात नियमबाह्य पध्दतीने पुजेसाठी लागणारे ओटीचे साहीत्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केलीय.
मंदिर संस्थानच्या वतीने अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदिरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांना घरबसल्या ही परीक्षा ऑनलाइन देता येणार आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेण्यात येणार
नकारात्मक गुण पद्धतीची ही परीक्षा 100 गुणांची आहे
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार
उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार
पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे.
श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जपकरीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते.
* प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटे जप्त..
* पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी व गोडाऊनवर छापा टाकून धडक कारवाई...
* उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाची कारवाई...
* या कारवाईत १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
* या प्रकरणी येवदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..
अकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते..
सुरुवातीला अधिकारी चर्चेस तयार नव्हते, मात्र आंदोलन केल्याने चर्चा केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा प्रमाणपत्र मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तातडीने तोडगा निघून प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा एमआयएमने दिला.
दरम्यान, भारतात बांगलादेशी घुसखोर बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरीत्या वास्तव्यास असल्याचे भाजप नेत्यांनी आरोप केला होता..
त्यानंतर जन्म व मृत्यू प्रमाण वितरण करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करू नये असे, असे आदेश प्रशासनाचे आहेत.. त्यामुळेच एमआयएम आक्रमक झाली होती..
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ विभागामध्ये सध्या जोरदार उधळपट्टी सुरू आहे अनेक ठिकाणी गरज नसताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेकडून काम काढली जात आहेत तसेच काम करत असताना अनेक प्रकारे झाडांची तोडणी केली जाते तर काही ठिकाणी टेंडर न काढता थेट ठेकेदारांना काम दिली जात आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या मंगला घरत यांनी व्हिडिओतून महापालिकेचा कामाबाबत आवाज उठवला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.