Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२५, संसदेच्या पावसाळी अधिवेशन अपडेट, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचापुणे दौरा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुणे रेव्ह पार्टी प्रकरण अपडेट, लाडकी बहीण योजना अपेट राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

आरमोरी येथील हिरो कंपनी टू व्हीलर गाड्यांची शोरूम ची इमारत खचल्यामुळे. तीन लोकांच्या दुर्देवी मृत्यू झाला असून, पुन्हा काही लोके बिल्डिंग मध्ये अडकलेले आहेत. प्रशासनाच्या वतीने त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.

कराड जेलमध्ये गँग बाहेर सक्रिय, समर्थकांनी तरुणाला मागायला लावली माफी

वाल्मीक कराडच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही किंवा बोलणार नाही असे जबरदस्तीने बोलण्यास भाग पाडत एका तरुणाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

रायगडमध्ये नारळी पौर्णिमा साजरी

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज रायगडच्या समुद्र किनारी उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. कोळी बांधवांनी आज मानाच्या नारळाची मिरवणूक काढली. नटून थटून कोळी बांधव भगीनी पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत या मिरवणूकीत सहभागी झाले होते. समुद्राच्या किनारी नारळाची विधीवत पुजा करीत मच्छिमार बांधवांच्या सुरक्षेची आणि चांगली मच्छि मिळावी अशी प्रार्थना करीत हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला.

कोळी बांधवांना चांगले मासे मिळू दे! खासदार रवींद्र वायकर यांचं समुद्राला साकडं

मुंबईतील सर्व कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, अंधेरी पश्चिम वर्सोवा समुद्रकिनारी देखील कोळी बांधवांकडून आज नारळी पालखी मिरवणूक काढून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण केला, यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर हे देखील कोळी वेशभूषा परिधान करून उपस्थित होते. खासदार रवींद्र वायकर यांनी यावेळी नारळ समुद्रात अर्पण करून यावर्षी कोळी बांधवांना भरपूर मासे मिळू दे अशी प्रार्थना केली.

सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कोलगाव नाका येथे ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात स्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. हा अपघात नेमका कसा घडला याचा तपास सूरू असून या मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत करण्यात आली आहे.

वरळी कोळीवाड्यात शिंदे-ठाकरे आमनेसामने

मुंबई आग्रा महामार्गावर टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं

- मुंबई आग्रा महामार्गावर टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं

- चांदवड जवळच्या सोग्रसची धक्कादायक घटना

- अपघातात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती

- जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे दिल्लीवरून एकाच फ्लाईटमध्ये

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे दिल्लीवरून एकाच फ्लाईट येत आहे....

विमानात दोघांमध्ये विमानात चर्चा आणि गप्पा झाल्याच बोलल जात आहे...

वाल्मीक कराड वापरत असलेल्या मोबाईलचा सी डी आर जनतेसमूराना शिवराज बांगर यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड वापरत असलेल्या मोबाईलचा सी डी आर जनतेसमूराना शिवराज बांगर यांची मागणी.

आरोपी वाल्मीक कराड शासकीय मोबाईल वरून बाहेर फोन करत आहे शिवराज बांगर यांची साम टीव्ही ला माहिती.

जिल्हा कारागृहनिरीक्षक यांच्याकडे त्या फोनचा सीडीआर मिळावा यासाठी स्वतः पत्र देणार आहे. शिवराज बांगर.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी

पुण्यातील विधान भवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीची अजित पवार यांच्याकडून पाहणी

निवडणूक आयोगाने केलेल्या वोट चोरी घोटाळ्याच्या विरोधात आंदोलनाला बाबत काँग्रेस युवकचा बालगंधर्व चौकात आंदोलन

निवडणूक आयोगाने केलेल्या वोट चोरी घोटाळ्याच्या विरोधात आंदोलनाला बाबत काँग्रेस युवकचा बालगंधर्व चौकात आंदोलन

काल देशाचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून, भाजपा व निवडणूक आयोगाने मिळून देशातील व राज्यातील निवडणूकीत मतांची चोरी केली आहे आणि हा देशद्रोहच आहे

या विरोधात भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन

रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात रंगला अनोखा सोहळा

रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात अनोखा सोहळा रंगला. राजकीय नेते आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. पोलीस मुख्यालय येथे राज्यमंत्री पंकज भोयर यांना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राखी बांधली. तसेच तटकरे यांनी पोलिस अधिकारी यांना राखी बांधली आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मंत्री तटकरे यांना राखी बांधली.

देवेंद्र फडणवीस दंगली घडवेल - मनोज जरांगे पाटील

राजकारण बाजुला ठेवुन समाजासाठी एकत्र या..कदाचित देवेंद्र फडणवीस दंगली घडवेल ....मनोज जरांगे पाटील

29 ऑगस्टला कसा आरक्षण देत नाही तेच मी पाहतो.... मनोज जरांगे पाटील

शेतकरी नेते अजित नवले, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचे संयुक्त पत्रकार परिषद सुरू

मालेगाव पोलिसांची कारवाई! 1 लाख 40 हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिला अटकेत

वाशिमच्या मालेगाव पोलिसांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्या तिन महिलांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 11 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1 लाख 40 हजार आहे. ही कारवाई मालेगाव तालुक्यातील मेडशी–कोलदरा फाट्यावर केली.

नांदेडचे रामभक्त निघाले सायकलवर अयोध्येला

नांदेडचे काही रामभक्त प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला सायकलने निघाले आहेत. गोदावरीचं पवित्र जल घेऊन निघालेल्या या तीन सायकलस्वारांचा प्रवास सुमारे 1151 किलोमीटरचा असणार आहे. छत्रपती रायडर्स या सायकलपटूंच्या समूहातील हे सदस्य नांदेड ते अयोध्या हा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत. त्यांच्या या धाडसी प्रवासाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि शुभेच्छा दिल्या. या प्रवासाचा उद्देश श्रद्धा व्यक्त करणे हा आहेच पण सायकल वापरा, आरोग्य जपा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील आहे.

शरणु हांडे प्रकरणात सोलापूर कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

शरणु हांडे प्रकरणात चार ही आरोपीना पोलिसांनी न्यायालयात केलं हजर

प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली मागणी

पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील ऍड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला

आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली

या प्रकरणात सोलापूर कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित आरोपींना येत्या 12 तारखेला सोलापूर कोर्टात हजर केलं जाणार आहे.

नांदेडमध्ये विमानतळ पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगाराला घेतलं ताब्यात

नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी एकाच दिवशी दोन सोन्याच्या चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. या आरोपींकडून तब्बल 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महेश देवकते आणि सय्यद जाकेर अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यातील सय्यद जाकेर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि चैन चोरीसारखे 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यातील रस्त्यांची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे घोडबंदर रोड येथील कासारवडवली ते गायमुख येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या डागडुजी आणि दुरुस्ती कामाला अचानक भेट देऊन इथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

नंदुरबारमध्ये बोगस खत विक्रीचा गोरख धंद्याचा पर्दाफाश

बोगस खत विक्रीचा गोरख धंद्याचा पर्दाफाश....

तळोदा तालुक्यात तीन लाखांचा बोगस खत जप्त....

कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले 150 गोण्या बोगस खत...

गोदामात साठवून ठेवला होता बोगस खतांचा साठा...

बोगस कंपनी सह एका विरोधात गुन्हा दाखल...

मालाड-जोगेश्वरी-दादर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालाड, जोगेश्वरी, दादर आणि एमआयडीसी नवी मुंबई परिसरात एकाचवेळी केलेल्या चार वेगवेगळ्या कारवायांतून तब्बल ४.०३४ किलो ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे १०.०७ कोटी रुपये असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी एक नायजेरियन नागरिक आहे.

२८ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर, बांद्रा आणि वरळी युनिटच्या पथकांनी स्वतंत्र छापे टाकले. यात जोगेश्वरी पश्चिम, मालाड पूर्व व दादर पश्चिम परिसरातून एम.डी. अंमली पदार्थ जप्त झाला. तर एमआयडीसी, नवी मुंबईतून पाहिजे असलेल्या नायजेरियन आरोपीकडूनही मोठ्या प्रमाणात एम.डी. हस्तगत करण्यात आला.

नारळी पौर्णिमेनिमित्ताने रायगडच्या समुद्र किनारी नारळ फोडीच्या स्पर्धा

आज नारळी पौर्णिमा, या निमित्ताने रायगडच्या समुद्र किनारी नारळ फोडी स्पर्धांच आयोजन करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक स्पर्धक आपल्या वाडीतील नारळ दुसऱ्या स्पर्धकाच्या नारळावर आपटतो. ज्याचा नारळ फुटत नाही तो विजयी घोषित केला जातो. नारळ फोडीचा हा खेळ पहाण्यासाठी ग्रामस्थांसह नारळ व्यापारीदेखील उपस्थित असतात. वरकरणी हा खेळ वाटत असला तरी पूर्वी या खेळादरम्यान नारळाची गुणवत्ता, मजबुती आणि दर ठरत असे. आता नारळाच्या व्यापाराची पद्धत बदलली असली तरी समुद्र किनारचे रहिवाशी नारळ फोडीचा हा खेळ मोठ्या उत्साहाने खेळताना दिसतात .

ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

* ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद..

* जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात बैठकीतच वाद..

* विनायक पांडे यांनी घेतला बैठकीतून काढता पाय..

* विधानभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद..

* वादा दरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ देखील

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला भगिनींनी बांधली राखी

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला भगिनींनी बांधली राखी

सकल हिंदू समाजातील महिला प्रतिनिधींनी बांधली मुख्यमंत्री यांना राखी

राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून, जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते असा आरोप करण्यात आला

या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र व कठोर कायदा अत्यावश्यक असल्याचं मत महिलांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केलं

कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यावर अरेरावी

कृषी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री असलेल्या वाशिम जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्यावर अरेरावी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या शेतकऱ्याचा मोबाईलही त्या महिला अधिकाऱ्याने हिसकावून घेतलाय.

Yewala: येवला रेल्वे स्थानकाची भुजबळांनी केली पहाणी

नाशिकच्या येवला रेल्वे स्थानकाची आज मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.स्थानकाची सद्य स्थिती व प्रवाशांना भेडसावणा-या अडचणी लक्षात घेता लवकरच अमृत भारत योजनेतून रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याचे भुजबळांनी सांगत त्यांनी रेल्वे स्थानकाची बारकाईने पाहणी करत रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांशी चर्चा करुन रेल्वे स्थानकाचे अधुनिकरण,नव्या सुविधा,आगामी कुंभ मेळ्या निमित्त येणारे प्रवाशी तसेच येवल्यातील नागरीकांच्या मागणी नुसार रेल्वेना थांबा यासाठी पाठ पुरवठा सुरू असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

मंत्री प्रताप सरनाईक यांची अँटी करप्शन ब्युरो कडून चौकशी करा, रिक्षा संघटनेची मागणी

रॅपिडो व्हिडिओ कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप

रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे अँटी करप्शन ब्युरो कडे अर्ज करून चौकशीची केली मागणी

आर्थिक लाभ हा डायरेक्ट घेतल्याने तात्काळ त्यांच्या राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा रिक्षा संघटनेचा इशारा

मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मुलाच्या इव्हेंट कंपनीला आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा केला आरोप

Amravati: अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली

गेल्या 15 दिवसा नन्तर अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे .या मुसळधार पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या पिकांना संजीवनी मिळाली तर काही शेतकऱ्यांची पिके ही पाण्याखाली गेली आहे,हवामान अंदाजानुसार विदर्भात आज विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली होती, त्यानंतर अमरावती जिल्हात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे .15 दिवसांनी आलेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी तूर या पिकांना मात्र चांगल्या प्रमाणे फायदा होणार आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे . शेतकऱ्यांमध्ये कही खुशी काही गम असे चित्र पाहायला मिळत आहे.

Nashik: नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक सुरू

- ठाकरे गटाच्या नाशिकच्या कार्यालयात बैठकीच आयोजन

- बैठकीला ठाकरे गटाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसेचेही नेते पदाधिकारी उपस्थित

- आगामी महापालिका निवडणुकांसह शहरातील नागरी समस्यांवर बैठकीत होणार चर्चा

Sadabhau Khot: राज्यात गुंडागर्दीला खत पाणी रोहित पवार घालत आहेत; आमदार सदाभाऊ खोत

आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचे सोलापूर मधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडाने अमित सूर्यवशे यांनी अपहरण केले होते. कर्नाटक मध्ये मिळून आले निश्चितपणान सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचे अभिनंदन करतो. पण गुंडागर्दी कुठे चालते, अपहरण कशा पद्धतीने होतात, खून कशा पद्धतीने होतात, भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतात. याचं एक मोठं विश्वविद्यालय चे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आता रोहित पवार चालवत आहेत. आता रोहित पवार यांच्या तोंडावरती बोट आहेत का त्यांचे तोंड आता शिवलेलं आहे. का शब्द आता फुटू शकत नाही. हा कार्यकर्ता कुणाचा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता म्हणजे या राज्यांमध्ये गुंडागर्दीला खतपाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात.

मी राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक गुंडागर्दी महाराष्ट्रात चाललेली आहे त्याला ठेचून काढा..

कोल्हापूरमध्ये पिंक रिक्षा व रूपे कार्ड वितरण समारंभ

कोल्हापुरात आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांना पिंक रिक्षा आणि रुपे कार्ड वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते. महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना पिंक रिक्षाचं आणि रूपे कार्डचं वितरण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Rohit Pawar: शरनू हांडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

शरनू हांडे प्रकरणावर आमदार रोहित पवार यांच्यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले नंतर रोहित पवार पलटवार केला..कुठलाही व्यक्तींनी कायदा व सुवव्यस्था हातात घेतला असेल तर तो व्यक्ती आमचा कार्यकर्ता असेल तर त्याच समर्थन आम्ही त्या कृत्याच करतं नाही..मी कोणाशी व्हिडिओ कॉल करत नाही कोणाशी व्हिडिओ कॉल द्वारे बोलतं नाही,तुम्ही यावर एसआयटी मार्फत तपास करा तुमच्याकडे सरकार आहे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे,

मी सरकारच्या विरोधात बोलतो मंत्र्यांचे कारणाने समोर आणतो..त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो आहे असा आरोप देखील त्यांनी केला तर मी शांत बसणार नाही असंही पवार म्हणाले

कोल्हापूरच्या हुपरीत हॉटेलची तोडफोड, चौघे जखमी

कोल्हापूरच्या हुपरीत व्यावसायिक स्पर्धेतून सुरू असलेल्या वादातून तुफान राडा झालाय. हॉटेल चालकाच्या एका गटाने विरोधी गटाच्या वडा स्टॉल तसेच हॉटेलवर लाठ्या तसेच लोखंडी रॉडने जोरदार हल्ला केलाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात चौघेजण जखमी झाले. विश्वजित संताजी पाटील, संताजी पांडुरंग पाटील, महेश पांडुरंग पाटील व पृथ्वीराज धनाजी पाटील अशी जखमीची नावे आहेत. हल्लेखोरांनी हॉटेलमधील साहित्यांचीही नासधूस केली. ही घटना येथील हुपरीच्या चौपाटीजवळ घडली असून या घटनेची नोंद हुपरी पोलिसांनी झाली आहे.

अकोल्यात सकाळपासून पावसाची हजेरी

अकोल्यातल्या बार्शिटाकळी भागातल्या कोलेश्वर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे..... पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी लावली असून, अनेक रस्ते जलमय झाले आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील कोलेश्वर मंदिर रस्ता हा पूर्णतः बंद झालाय.. विद्रुपा नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे.. दरम्यान, अकोला जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे... बार्शिटाकळी तालुक्याला आज पावसाने चांगलंच झोडपून काढलं.

Nandurbar: नंदुरबारमध्ये राखी खरेदीसाठी बाजारात गर्दी

लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळताच बाजारात गर्दी....

रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींचा खात्यावर आले योजनेचे पैसे....

योजनेच्या पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची तुफान गर्दी....

रक्षाबंधन निमित्ताने पैसे खात्यात जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण....

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुणे पोलिसांच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन

पुणे शहरातील पोलिस ठाण्यांचे भूमिपूजन तसेच विविध कमांड अँड कंट्रोल सेंटर चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालय

मुलानेच जन्मदात्या आईचा केला खून, आणि स्वतः घेतला गळफास, लातूरच्या सांगवी येथील घटना

लातूरच्या रेनापुर तालुक्यातील सांगवी येथे जन्मदात्या मुलांनेच आपल्या 70 वर्षीय आईची हत्या करून उसाच्या शेतात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे., आईचा खून करून आरोपी मुलाने देखील गळफास घेत स्वतःला संपवले आहे. दरम्यान आई शेत विक्री करण्यास विरोध करत असल्याच्या रानातून मुलाने आईला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे .,दरम्यान या प्रकरणी लातूरचा रेनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत..

Beed: बीडच्या वडवणी माजलगाव तालुक्यात जोरदार पावसाचे हजेरी

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बीडच्या वडवणी,माजलगाव तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता..माजलगाव तालुक्यातील मोगरा गावातील गोदावरी नदीला पूर आला. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखवाला आहे.

Raju Shetty: राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी आणि अंबानी परिवार यांचे मानले आभार

कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळच नांदणी परिसरात हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल. लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढला काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे. राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Amravati: अमरावती जिल्ह्यात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने लावली हजेरी

अमरावती जिल्ह्यात तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अखेर हजेरी लावली आहे. दीर्घकाल पावसाअभावी सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके कोमेजून गेली होती, परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाईंदरच्या वरसावे येथील तलावात पडून एका तरुणाचा मृत्यू

भाईंदरच्या वरसावे येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. शंतनू शाम चरी ( २३ ) असे या तरुणाचे नाव आहे.

पहाटे सकाळी पाच वाजता दोन मैत्रिणी आणि एक मित्र असे तिघे तलावात पोहण्यासाठी गेले. यावेळी एका तरुणीला पाण्यात पोहता येत असल्यामुळे तरुणीने तलावात उडी मारून पोहोत होती.

आपल्या मैत्रिणीला बघून शंतनू शाम चरी यांनी देखील पोहण्यासाठी उडी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

दोन्ही मैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले तोपर्यंत त्याचा जीव गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शंतानू शाम चरी मिरारोडच्या कनकीया परिसरात राहणारा आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे.

Hingoli: हिंगोलीत ओढे नद्यांना आला पूर, सकाळी मुसळधार कोसळला पाऊस

हिंगोलीत मध्यरात्री व सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती तब्बल तीन तास कोसळलेल्या या पावसामुळे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव कापडसिंगी परिसरात अनेक ओढे नाले व नद्यांना पूर आला होता तर कापडसिंगी परिसरात पुलावरून पाणी जात असल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्था देखील थांबवण्यात आली होती दरम्यान या पावसामुळे शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते तर कयाधू नदीला देखील पूर आला होता.

रॅपिटो कंपनीला धमकावून एका इव्हेंटसाठी कोटींची स्पॉन्सरशिप घेतली, रोहित पवारांचे प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप

इव्हेंट करण्यास विरोध नाही, रॅपिटो कंपनीला तुम्ही पकडता, परवानगी नसताना महाराष्ट्रात काम करत होती. मीडिया कव्हरेज होतं तुम्ही फेमस होता,दोन,तीन महिन्यानंतर त्याच कंपनीला तुमच्या एका इव्हेंटला मोठी स्पॉन्सरशिप द्यायला लावली जाते. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा वापर करून कंपनीला धमकावलं, धमकावल्यानंतर त्या कंपनीशी वाटाघाटी केली. त्यानंतर काही कोटींची स्पॉन्सरशिप घेतली असा गंभीर आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर रोहित पवार यांनी केली.

Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक

- नाशिकच्या ठाकरे गटाच्या कार्यालयात बैठक

- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी संभाव्य युतीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर मनोमिलन

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र काम करण्यावर बैठकीत होणार चर्चा

- दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं आजची बैठक होत असल्याचं सांगितलं जातंय

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जातेय

-

Solapur: सोलापुरात झाड कोसळून कारचा जागीच झाला चुराडा

सोलापूर शहरातील लकी चौकात असणाऱ्या हॉटेल अजिंक्या समोर घडला प्रकार

वादळी वाऱ्यामुळे कोसळले आहे झाड

दरम्यान,सुदैवाने या कारमध्ये कोणीही नसल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये,मात्र कारचा चुराडा झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

Pune: पुण्यात चक्क सिलेंडरची चोरी

कर्वेनगर भागातील धक्कादायक प्रकार

दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने टेम्पोतून तीन भरलेले सिलेंडर नेले चोरून

चोरीची घटना सीसीटीवी मध्ये कैद

भारतगैस कंपनीच्या टेम्पोतून चोरले सिलेंडर

कात्रज प्राणी संग्रहालयातील हरण मृत्यू प्रकरणी अपडेट

कात्रज प्राणी संग्रहालयातील हरण मृत्यू प्रकरण

अहवाल सादर मात्र खुलाशात विचारलेले प्रश्न तकलादू?

चौकशी मृत्यू प्रकरणी चौकशीचा फार्स आहे का ?

गेल्या महिन्यात कात्रज प्राणी संग्रहालयात १६ हरणचा झाला होता मृत्यू

प्राणी संग्रहालयाचे अधीक्षक अशोक घोरपडे , संचालक राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती

मात्र या खुलाशात विचारलेले प्रश्नच तकलादू असल्याचं समोर ऐल आहे

Hingoli: सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस गावकऱ्यांचे दैनंदिन काम थांबले

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बन, बरडा, वझर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांचे दैनंदिन काम थांबले होते, सकाळी पाच वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल तीन तास कोसळल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते तर या पावसामुळे कयाधू नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं पाहायला मिळालं.

जन्म-मृत्यू रजिस्टर मध्ये खोडखाड,ग्रामसेवकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील गिगाव ग्रामपंचायत कार्यालयात जन्मृमृत्यू रजीस्टर मध्ये खोडखाड करणा-या ग्रामसेवकासह सहा जणांविरोधात तालूका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिगाव येथिल लक्ष्मण शत्रुघ्न पवार यांचे २०१० साली निधन झाले त्याची नोंद ग्रामपंचायतच्या जन्म-मत्यू रजिस्टर मध्ये नोंद सुध्दा असून डिसेंबर २०२३ मध्ये ग्रामसेवक निंबा माधव भदाणे यांनी एक ठराव करुन त्यात लक्ष्मण भिला पवार अशी नोंद करीत रजिस्टर मध्ये खाडाखोड करीत खोटे मृत्यूप्रमाण पत्र तयार करुन त्याला शपथ पत्र जोडून तहसिल कार्यालयातून जातीचा काढला या प्रकरणाला वाच्यता फुटताच ग्रामसेवक भदाणे यांच्यासह सहा जणां विरोधात मालेगाव तालूका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed: महादेव मुंडे हत्या प्रकरणातत भाऊ अशोक मुंडे व वडील दत्तात्रय मुंडे यांचा SIT ने नोंदवला जबाब

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला आता गती मिळत आहे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात एस आय टी चे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांच्या उपस्थितीमध्ये महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे व वडील दत्तात्रय मुंडे यांची आंबेजोगाई च्या उपविभागी कार्यालयात एसआयटी कडून दोन तास हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी झाली महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अशोक मुंडे आणि दत्तात्रय मुंडे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे हाच जबाब महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचू शकतो महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने भाऊ अशोक मुंडे वडील दत्तात्रय मुंडे यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे हा जबाब यासाठीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत पोलीस निरीक्षक संतोष सावळे पोलीस निरीक्षक भार्गवकर सपकाळ यांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आला आहे जवळपास दोन तास महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी झाली ही माहिती साम टीव्ही ला सूत्रांनी दिली आहे.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- मुख्य अप लाईनवर मालगाडीचा डबा रुळावरून घसरला...

- मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- नांदगाव रेल्वे स्थानक यार्डानजीक सकाळी ७ वाजता

घडली घटना...

- या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस, धुळे दादर मेमू गाड्या खोळंबल्या..

-

- रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर दाखल ; युद्ध पातळीवर काम सुरू..

-

- मनमाड वरून दुरुस्ती वाहन व तांत्रिक पथक निघाले..

-

Barshi: बार्शी शहरातील महावितरण कार्यालयासमोर पावसामुळे निर्माण झाले जलतळ्याचे दृश्य!

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बार्शी महावितरण कार्यालयासमोरील परिसरात पाणी साचून तळ्यासारखी अवस्था झाली आहे. यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असूनसुद्धा महावितरण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.यामुळे नागरिक त्रस्त असून ते संताप व्यक्त करत आहेत.

Maval: मावळातील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर,

मावळच्या वडगाव,कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटीस्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आबिटकर यांनी यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश दिले असून, संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सांगली महापालिका घरपट्टी वसुलीची धडक मोहीम..

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेने एक लाखापेक्षा जास्त घरपट्टी थकबाकी असलेल्या मालमत्तांच्यावर वसुलीची धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेचा फौज फाटा घेऊन मालमत्ता विभागाचे अधिकारी मालमत्ता सिल करून थकबाकी वसुली करण्याचे काम सुरू आहे. मिरज शहरातील एक लाखापेक्षा जास्त रक्कम थकबाकी असलेला खाजगी आणि महापालिका मालकीच्या जागेत 50 पेक्षा जास्त थकबाकीदार असून त्यांची यादी काढण्यात अली आहे. 15 दिवसापूर्वी त्यांना नोटीस बजावल्या असताना थकबाकी भरली नसल्याने अखेर आज या मालमत्ता सिल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सांगितले. ही धडक कारवाई सुरूच राहणार असून थकबाकी भरण्याचे आवाहन यावेळी महापलिका प्रशासनाने केली आहे.

Nashik: नाशिकमध्ये मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नाशिक -

- मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली, नांदगावजवळची घटना

- मालवाहू ट्रेनची बोगी रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- मनमाड, नांदगाव, चाळीसगाव दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती

- मागील एक ते दीड तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- घसरलेली बोगी हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू

Nashik : गँगस्टर अबू सालेमच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध

नाशिक -

- गँगस्टर अबू सालेमच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध

- 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या अबू सालेमची शिक्षेतून मुक्त करण्याची मागणी

- नाशिकच्या कारागृहात अबू सालेम भोगतोय शिक्षा

- पोर्तुगालमधून ताब्यात घेण्यात आलेल्या अबू सालेमला ठोठावण्यात आलीय जन्मठेपेची शिक्षा

- पोर्तुगालच्या नियमानुसार जास्तीतजास्त 25 वर्ष शिक्षा देण्याची अबू सालेमची मागणी

- इतर कैद्या प्रमाणेच भारतीय न्याय संहितेप्रमाणे अबू सालेमला शिक्षा भोगावी लागणार, सूत्रांची माहिती

- अबू सालेमची वर्तणूक आणि शिक्षेचा तपशील अहवाल सरकारला करण्यात आलाय सादर

Pune: उदय सामंत आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांची घेणार बैठक

पुणे -

उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांची घेणार बैठक

सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्याच्या स्वतंत्र बैठक घेणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखणार

कोल्हापूर येथे सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची बैठक होणार

तर संध्याकाळी पुण्यात पुणे जिल्हयाची आढावा बैठक घेणार

Pune: बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून पुण्यात आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन

पुणे -

पुण्यात आज माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून पुण्यात आज शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन

माजी खासदार राजू शेट्टी अजित नवले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील शेतकरी हक्क परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार

गेल्या काही दिवसापासून बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी व्हावी यासाठी या हक्क परिषदेच्या आयोजन करण्यात आलआहे

महायुतीने आपल्या निवडणूक आश्वासनामध्ये कर्जमाफी देण्याचा आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी संघटना आणि बच्चू कडू यांची आहे

माजी आमदार बच्चू कडू यांची प्रहार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना आणि अजित नवले यांची शेतकरी संघटना शेतकरी हक्क परिषद मध्ये सहभागी होणार

Pune: बारामतीची तुलना चाकणशी करू नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांची काढली समजूत 

पुणे -

अजित पवार-

चाकणला महानगर पालिका करायच चाललाय

बारामतीची तुलना चाकणशी करू नका

अजित पवारानी कार्यकर्त्याची समजूत काढली

उपाययोजना करण्यासाठी चाकण मध्ये महानगरपालिका आणण्याचे अजित पवार यांचे संकेत

चाकण येथे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आज अजित पवार चाकण मध्ये आले असताना कार्यकर्तासोबत बोलत होते

Pune: अजित पवरांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले

अजित पवार पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली.

त्यामुळं अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले.

ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये, सगळी वाहतूक सुरु करा.

Amravati: अमरावतीमध्ये दोन कामगारांचे मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन, थकलेले वेतन देण्याची मागणी

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे असलेल्या फिनले मिलमध्ये कामगारांची वेतन थकले

दोन कामगारांचे मिलमधील चिमणीवर चढून 12 तासांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू

मिलच्या प्रशासनाने बैठक घेऊन बोनस आणि वेतन देण्याचं दिलं होतं आश्वासन

मात्र बैठकीमध्ये प्रशासकीय कोणी हजर राहत नसल्याने कामगार त्रस्त

गेल्या तीन महिन्यापासून कामगारांचे वेतन थकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com