Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२५, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

जालन्यातील नालेवाडी परिसरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस,

जालन्यातील अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे गावात शेजारील वाहणाऱ्या मांगणी नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या टेकडीवर राहणार एक आदिवासी कुटुंब या पुराच्या पाण्यामध्ये अडकल आहे. नालेवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे शेतांना अक्षरशः तलावाचा स्वरूपाला असून नद्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान या आदिवासी कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती अंबडच्या तहसीलदारांनी दिली आहे

अंबड तालुक्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस, जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चारीचे पाणी गावात शिरले...

जालन्यातील अंबड तालुक्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडलाय. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव गावाशेजारील असलेल्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चारीचे पाणी गावात शिरले होते.चारीचे पाणी गावात शिरल्याने गावातील किराणा दुकानाचे नुकसान झालं आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव, गोंदी ,करंजाळा ,हसनापूर यासह परिसरामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे परिसरातील ओढ्यांना नाल्यांना पूर आला आहे...

मराठा आंदोलनाची बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारीत करणाऱ्या सपना माळी या महीलेवर गुन्हा दाखल करा

मराठा आंदोलनाची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सपना माळी नावाच्या महीलेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी धाराशिवच्या कळंब मधील सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब पोलिसात केली आहे.आंदोलनाशी संबधीत एक व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने एडीट करून त्यामध्ये महीलांचे अश्लील नृत्य दाखवुन समाज व आंदोलनाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप मराठा समाजाने केला असुन सदरील व्हिडिओची सत्यता तपासुन माहीती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी व येरमाळा परीसरात मुसळधार पाऊस,सोयाबीन पिकाचं मोठ नुकसान

धाराशिव तालुक्यातील ढोकी व कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळात शनिवारी सायंकाळी 6 ते राञी 9 च्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली.काही तासांत झालेल्या पावसामुळे शेलगाव गावातील रस्ते पाण्याखाली गेले होते.गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने गहु,तांदुळ व इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाल आहे. तसेच परतीच्या या पावसामुळे सोयाबीन पिकाच देखील मोठ नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना

 भारत पाकिस्तान हा आशिया चषकातील बहुप्रतिक्षित सामना आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. खेळाडूंच्या कौशल्याचीच नव्हे तर त्यांच्या मानसिक कणखरपणाचीही कसोटी आजच्या टी-२० सामन्यात चाहते अनुभवतील. 

Maharashtra Rain: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. अनेक ठिकाणी पारा तिशीपार असून, शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎‎‎ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे १६० मिलिमीटर आणि पालम येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड.

जोरदार वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

पानिपत'कारांच्या गळ्यात माळ ? मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद अन् तारखा आज ठरणार

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार असून, संमेलनाच्या तारखा व रूपरेषाही जाहीर होणार आहे. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याचा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार करणार हडपसर मधील विकास कामांची करण्यासाठी पोहचले

खराडी केशेवनगर पूल पाहणी करणार,मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ वाहतूक कोंडी पाहणी करणार

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार मिलन अभियाना सुरुवात करणार

मुंढवा पूल पाहणी करण्यासाठी अजित पवार पोहचले..

रेकॉर्डवरील आरोपीला कोयतासह पोलिसांनी केली अटक

गुन्हे शाखेच्या तीन युनिटने केली कारवाई

महेश पांडुरंग भगत याला कोयत्यासह वारजे पुलाखाली शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले

बेकायदेशीरपणे कोयता बाळगत असल्याचं पोलिसांच्या आलं होतं निदर्शनास…

एकीकडे कोयता गैंगचा उद्रेक सुरू असताना पोलिसांनी केली कारवाई

विद्यार्थी काढताय चिखलातून वाट

यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द या गावा मध्ये पावसाळ्यात रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली. या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी चिखल तुडवत मोठी कसरत करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र गावातील रस्त्यांच्या दुरस्वथेबाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने गावातील सर्व विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com