Beed Politics : धनजंय मुंडेंचा वाल्मिक कराडला धक्का? कार्यालयाची सूत्रे अजय मुंडेंच्या हाती

Beed Political News : जगमित्र कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती देण्यात आलं आहे. यामुळे धनजंय मुंडे यांनी वाल्मिक कराडला मोठा धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
ajay munde news
Beed Politicssaam tv
Published On

बीड : संतोष देशमुख प्रकरणामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. याच वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांनी धक्का दिल्याची चर्चा आहे. परळीतील जगमित्र कार्यालयाचे सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

परळीतील जगमित्र कार्यालाची सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती देण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सूत्रे अजय मुंडे यांच्या हाती देण्यात आली आहे. याच कार्यालयातून वाल्मिक कराड हा नागरिकांचे प्रश्न सोडवता होता. आता कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे बसणार आहेत. जगमित्र कार्यालयाची सर्व सूत्रे अजय मुंडे सांभाळणार आहेत.

ajay munde news
Walmik Karad News : वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास की तुरुंगवारी टाळण्याचा प्लान; पाहा स्पेशल रिपोर्ट

अजय मुंडे कोण आहेत?

अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. तसेच मुंडे हे गटनेते देखील आहेत. अजय मुंडे हे पिंपरी जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते. तर धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत ते मतदारसंघात सक्रिय होते. आता जगमित्र कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे.

धनंजय मुंडे राज्याचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर होता. मात्र मागील दीड महिन्यांपासून जगमित्र कार्यालय ओस पडले होते. आता अखेर याच कार्यालयाची सूत्रे अजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

ajay munde news
Walmik Karad : कराडचं टेंशन वाढणार! महादेव मुंडे हत्येचं सुशील कराड कनेक्शन? VIDEO
ajay munde news
Walmik Karad: पुणे, बीड नंतर लातूर, आता महाराष्ट्रातलं नवं शहर कुठलं? वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे आणखी प्रॉपर्टी

कराडची संपत्ती जप्त होणार?

संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली आहे. कराडच्या विरोधात एसआयटी पथकाने कारवाईसाठी हालचाली सुरु केली आहे. त्यांनी कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी एसआयटी पथकाने कोर्टात अर्ज केला आहे. तर फक्त कराडची संपत्ती नाही, तर त्याने ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com