Ajanta Caves Waterfall : सप्तकुंड धबधब्याने पालटलं अजिंठा लेणीचं रुपडं; मनमोहक निसर्ग सौंदर्याचा VIDEO पाहाच

Ajanta Leni Waterfall Video : मुसळधार पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.
 Ajanta and Ellora caves beautiful waterfalls Video
Ajanta and Ellora caves beautiful waterfalls VideoSaam TV

गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी (ता. ३०) राज्यात दमदार हजेरी लावली. मराठवाड्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. या पावसाने प्रथमच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून सुखद चित्र निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील डोंगर दऱ्यांनी जणू हिरवा शालूच नेसला आहे. अजिंठा डोंगररांगामधून वाहणाऱ्या छोट्या-मोठ्या नद्या-नाले प्रवाहीत झाले आहेत. ते फेसाळत, खळखळून वाहू लागले आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. या मनमोहक दृश्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील या धबधब्यात नैसर्गिक पद्धतीने सात कुंडांसारखी रचना तयार झाल्याने याला सप्तकुंड धबधबा असे नाव पडले आहे. अजिंठ्याच्या डोंगर रांगातील हा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरलाय. पाऊस पडू लागला की पर्यटन राजधानी असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाला वेगळाच साज चढतो.

 Ajanta and Ellora caves beautiful waterfalls Video
Weather Forecast : राज्यात पुढील ७२ तास मुसळधार पावसाचे; कोणकोणत्या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणीच्या डोंगररांगा हिरव्यागार शालूने खुलून दिसतात तर डोंगरातून खळखळून वाहणारे धबधबे डोळ्याचं पारणे फेडतात. तेच दृश्य यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच मोठ्या पावसात दिसून आलंय. अजिंठा लेणीतील सहस्त्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहत होता. अजिंठा लेणीच्या डोंगररांगात असे अनेक धबधबे आहेत.

या पावसाळ्यात हे धबधबे पर्यकांच्या मनाला सुखाचा गारवा देतात. त्यामुळे इथे नेहमीच वर्दळ असते. सध्या अजिंठा, वेरूळ, दौलताबाद डोंगररांगानी हिरवागार शालू पांघरल्या आहेत. तर दुसरीकडे वेरूळ, म्हैसमाळ परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने लेणी परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले लेणीकडे वळू लागली आहेत. वेरूळ लेणी परिसरात असणारा सीता नहानी हा धबधबा पावसाळ्यातली खास आकर्षण असते.

 Ajanta and Ellora caves beautiful waterfalls Video
LPG Cylinder Price Cut : खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com