Marathi News Live Updates: विनेश फोगाटबाबतचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलला, आता 16 ऑगस्टला होणार घोषणा

Maharashtra Breaking News Live Updates : आज मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Vinesh Phogat: विनेश फोगाटबाबतचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलला, आता 16 ऑगस्टला होणार घोषणा

पॅरिसमधील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपीलवर निर्णय अजून दिला नाहीय. विनेशला पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे रौप्य पदक मिळेल की नाही याचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलाय.

 Chhatrapati Sambhaji nagar  : संभाजीनगरमधील स्मार्ट बस चालक आणि कंडक्टरला प्रवाशाकडून मारहाण

संभाजीनगर महापालिकेच्या बिडकिन ते फुलंब्री दरम्यानच्या स्मार्ट बस चालक आणि वाहकास प्रवाशा ने मारहाण केल्याची घटना बिडकिन मध्ये घडलीय. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. बिडकिन ते फुलंब्री साठी संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट बस सुरू आहेत. ही बस बिडकिन नवीन बसस्थानक परिसरातुन प्रवासी वाहतूक करण्यासाठी निघाली असता बसमधील वाहक यांनी दोन प्रवाशांना बस टिकीट भाड्याचे पैसे मागितले असता दारूच्या नशेत तर्र असलेल्या प्रवाशांनी बस मधील वाहक यांना मारहाण केली तर चालकाला शिवीगाळ केली. यामधील वाहक रंजित वाघ यांना मारहाण करण्यात आली. यावरून बिडकिन पोलिस ठाणे येथे दोन प्रवाशांविरुद्धात गुन्हा दाखल झाला आहे.

Pune : चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शनासाठी बंद

श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. देवीची उत्सव मूर्ती या कालावधीत पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध असेल. भाविकांनी या कामासाठी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून  होणार सुरू

खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा. नागपूर आणि गोवा मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत.प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आहे. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करणार आहे.

Sangli :  जिल्ह्यातील पलूसमध्ये नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा

सांगलीच्या पलूस मध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे आयोजन शिवशक्ती भीमशक्ती, सखल हिंदू दलित समाज पलूस यांनी केले आहे. या मोर्चासाठी नितेश राणे, खासदार अमर साबळे, हर्षा ताई ठाकूर आदी उपस्थित आहेत. पलूसच्या साठे नगर मधून या मोर्चाला सुरवात झाली आहे. पलूसच्या मुख्य चौकातून प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जुन्या एस टी स्टँड जवळ शिवतीर्थ जवळ सभेत रुपातर होणार आहे. यावेळी जय श्रीराम, हर हर महादेव अश्या घोषणा देण्यात येत आहेत.

Jalgaon :मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, पोलिसांची ४ वाहने एकमेकांना आदळली

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडलीय. एक्स कॉटमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांना आदळली.जळगाव विमानतळावरून मेळाव्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच पोलिसांची चार वाहने एकमेकांना आदळली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी किंवा गंभीर जखमी नाही

Beed : बीडमध्ये अनुदान टप्पा वाढीसाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आक्रोश आंदोलन

संचमान्यतेनुसार पुढील टप्पा वाढ लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब महाआक्रोश आंदोलन केले आहे.. यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी संबळ वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 1 जानेवारीपासून विनाअट संच मान्यतेनुसार पुढील टप्पा लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले.

Agriculture Market Committee: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती १५ ऑगस्ट रोजी बंद राहणार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी माल आणू नये असा अवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केलंय.

JPC समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

वक्फ बोर्ड विधेयकासाठी नेमलेल्या JPC समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती करण्यात आलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केलीय. राज्यसभेतील सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

 राज्यात महिला सबलीकरण योजना सुरू

जळगावात मुख्यमंत्री शिंदेंनी केलं योजनचं उद्घाटन केलं. जळगावात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महिला भगिनींनी राख्या बांधल्या. याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंनी बाल कवी ठोंबरे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केलं.

Yavatmal News : यवतमाळमध्ये मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचा संप

कोलकता येथे शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळच्या शासकीय वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमधील मार्ड संघटनेचे डॉक्टर संपावर गेले आहेत. या संपात 140 डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. संपाच्या काळात रुग्णालयातील फक्त अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरू राहणार आहे. संपकरी डॉक्टरांनी कोलकाता घटनेचं निषेध करत कँडल मोर्चा काढला. यावेळी निष्पक्ष चौकशीची करण्याची मागणी डॉक्टरांनी केली.

Pune News :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी माल आणू नये असा आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीने केला आहे. 16 तारखेला मार्केट सुरू राहील.

Ravi Rana : आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत

आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत. यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रीमंडळ बैठकीत सर्वांना सूचना

Nashik News : नाशिकच्या सिन्नर येथे मनोज जरांगे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

- नाशिकच्या सिन्नर येथे मनोज जरांगे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

- समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न

- महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- सिन्नर येथून नाशिक कडे येत असताना अडवण्याचा प्रयत्न

Pravin Darekar News : प्रवीण दरेकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

सहकार प्रकोस्ट बैठकीनंतर घेतली भेट

सहकाराच्या मुद्यावर अमित शहा यांच्यासोबत केली चर्चा

Congress : देशभरात काँग्रेसच आंदोलन करणार

22 ऑगस्ट रोजी देशभरात काँग्रेसच आंदोलन

अदानी आणि सेबी मुद्यावर काँग्रेस आक्रमक

भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

काँग्रेसचे प्रमुख नेते आंदोलनात सहभागी होणार

Latur Accident : लातूरमध्ये बेधुंद जेसीबी चालकाचा थरार, 10 ते 12 जणांना उडवले

लातूर शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्तावरील 10ते12 जणांना उडवले आहे. यात जालिंदर मुळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लवकरच विदर्भ दौरा

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा

22 ऑगस्ट 29 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

22 ऑगस्ट ला विदर्भ एक्सप्रेस ने राज ठाकरे गोंदिया कडे रवाना होणार

Manoj Jarange Patil : नाशिकमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरवात

नाशिकमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरवात झालीय. नाशिक मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली तपोवन पासून सुरू झालीय. शांतता रॅलीत छगन भुजबळ यांच्या नावाने घोषणाबाजी होतेय.

Maharashtra Politics :  राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. 22 ऑगस्ट 29 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. 22 ऑगस्ट रोजी विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे गोंदियाकडे रवाना होणार आहेत.

Mumbai News : विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती

मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्याने पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सदरच्या प्रकल्पाला १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिली.

Beed News : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 12 व्यक्तींच्या कुटुंबांना मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक सहकार्य

मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यासह राज्यातील 12 कुटुंबांना राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने प्रत्येकी 2 लाखाचे सहकार्य करण्यात आले आहे. बीडच्या परळी वैजनाथ येथे श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना, परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले आहेत.

Nashik news : खरीप कांदा लागवडीला सुरुवात

कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणा-या खरीपाच्या कांदा लागवडीला आता सुरुवात झाली आहे. पाऊस जोरदार नसला तरी जेमतेम पावसावर कांदा रोपे(ऊळे) शेतक-यांना तयार केली. नागपंचमीनंतर सर्वत्र आता खरीपाच्या कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे यांच्या शांतता समारोप रॅलीला सुरुवात

नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता समारोप रॅलीला सुरुवात होते आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून हजारो मराठा बांधव आता तपोवन परिसरात एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील रॅलीमध्ये असणार आहे. सरकार आरक्षण द्यायला चालढकल करतय, मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी मराठा समाज बांधवांची भूमिका आहे.

Supreme Court : सुप्रीम कोर्टात पुढील 20 दिवसांत महाराष्ट्राबाबत महत्वाच्या 4 सुनावण्या

सुप्रीम कोर्टात पुढच्या 20 दिवसात महाराष्ट्राबाबत महत्वाच्या 4 सुनावण्या

आज (13 ऑगस्ट) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासोबतच नागालँड आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी

20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी

21 ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

3 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरणी सुनावणी

कोर्टाने ठरवून दिलेल्या वेळेत सुनावणी होते की पुन्हा नव्या तारखा पडतात हे पाहणं महत्वाचं

Mumbai News: BMC मुख्यालयाजवळ स्टंट करणं तरुणांच्या अंगटल, पोलिसांनी केली कारवाई 

महापालिका मुख्यालयाजवळ माकडासारख्या उड्या मारणे तरुणांच्या अंगलट आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच आझाद मैदान पोलिसांनी कारवाई केली. पहाटे तीनच्या सुमारास या तरुणांनी महापालिका मुख्यालयाजवळ सेल्फी पॉइंटवरून उड्या मारणे, बस स्टॉपवर चढणे सिग्नलवर टॅक्सीच्या टपावर बसून प्रवास केला होता.

Delhi News: दिल्लीमध्ये ९ सप्टेंबरला GST कौन्सिलची होणार ५४ वी बैठक

GST कौन्सिलची ९ सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. ९ सप्टेंबरला GST कौन्सिलची ५४ वी बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मागच्या बैठकीवेळी अजित पवार अनुपस्थित राहिल्याने टीका झाली होती.

Nashik News: मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी २०० किलोचा हार, नाशिकमध्ये जय्यत तयारी

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोनशे किलोचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होणार आहे.

Amravati News: अमरावतीत आज पश्चिम विदर्भाची महायुतीची समन्वय बैठक

अमरावतीत आज पश्चिम विदर्भाची महायुतीची समन्वय बैठक होणार आहे. महायुतीच्या बैठकीचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला निमंत्रणच नाही. निमंत्रण नसल्याने रवी राणा बैठकीला जाणार नाही. माजी खासदार नवनीत राणा यांनाही निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

 Pune News: पुण्यातल्या ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

कोलकत्यातील महिला निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टर आक्रमक झाले आहेत. ससूनमधील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले आहेत. बी जे मेडिकल महाविद्यालया समोर निवासी डॉक्टर आंदोलन करत आहेत.

Ramdev Baba: रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जाहिरातीमधून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी दाखल असलेला अवमान खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला. पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातीमधून अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सोबतच नागालँड मधील सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याने त्यांना अपात्र करावं, अशी मागणी करणाऱ्या शरद पवार यांच्या याचिकेवर देखील आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात दाखल सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधात दाखल सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होईल. या निकालावर राज्य सरकार विद्यार्थ्यांना देत असलेले प्रवेश आणि नोकरभरती अवलंबून असेल असं मुंबई उच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं आहे.

Nashik News : नाशिक शहरातील वाहतूक मार्गात आज बदल

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज नाशिकमध्ये धडकणार आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज सकाळी 8 वाजेपासून ते रॅली संपेपर्यंत पर्याय मार्गाचा वापर करावा, वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन

Beed News : बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच

बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपा पाठोपाठ आता शिंदे गटाने बीड विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीड विधानसभेची जागा महायुतीतून घेणार असल्याचं जगताप यांनी सांगितले.

Vijay Vadettiwar News : बंजारा समाजाला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील - विजय वडेट्टीवार

जालन्यातील बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अविनाश चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे काँगेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. अविनाश चव्हाण हे परतुर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान बंजारा समाजाला विधानसभेत जास्तीत जास्त जागा मिळतील यासाठी मी हायकमांड कडे प्रयत्न करणार असल्याच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Latur News : लातूरमध्ये 1 कोटी 20 लाखाचा सुगंधित गुटखा जप्त, 5 जणांवर गुन्हा

लातूरच्या मुरुड भागात विक्रीसाठी साठवून ठेवलेला तब्बल 1कोटी 20 लाख रुपयांचा सुगंधित गुटखा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मुरुड येथील दोन ठिकाणी राहत्या घरांमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित गुटखा साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ही कारवाई करत 5 आरोपींवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded News : केमिकलचे पाणी पिल्याने 33 शेळ्या दगाल्या

वाहनात भरण्यात येणारे युरिया मिश्रित केमिकलचे पाणी पिल्याने 33 शेळ्यांचा मृत्यू झाला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारात ही घटना घडली. रामकिशन बेळगे आणि योगेश वटे या दोन मेंढपाळांचे जवळपास 5 लाखांचे नुकसान झाले आहे. हे दोन्ही मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन मुक्काम स्थळी जात होते. प्रदूषण होऊ नये म्हणून युरिया मिश्रित केमिकल वाहनात भरले जाते. परंतु हे केमिकल रस्त्यावर पडले होते. हे केमिकल पाणी समजून या शेळ्या मेंढ्यांनी पिले आणि यात 33 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.

Eknath Shinde News : आमदार बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन

आमदार बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याची माहिती आहे. आज आमदार बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. ९ ऑगस्टला बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. याबाबत आज त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

Mumbai Lake Water : मुंबईकरांना मोठा दिलासा, पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षा पेक्षा यावर्षी पाणीसाठ्यात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आधीच मिटली असली तरी तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लवकरच १०० टक्के पाणीसाठा पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाकडून देण्यात आली

Nagpur News : शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर

नागपूर येथील शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहे. कोलकाताच्या निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार, हत्येच्या घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली जात आहे. निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने आज पासून देशभरात संप पुकारला आहे. डॉक्टर संपावर जाणार असल्याने मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता. ओपीडी, निवडक शस्त्रक्रिया, वॉर्ड ड्युटी, लॅब सेवा संपकरी डॉक्टर देणार नाहीत. आकस्मिक सेवा आणि अतिदक्षता विभागाला या संपातून वगळण्यात आले आहे.

Mla Dheeraj Deshmukh : आमदार धीरज देशमुख यांनी कार्यकारी अभियंत्याला झापलं

लातूर टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गावरच्या बोरगाव ते मुरुड अकोला या दरम्यान महामार्गाला मोठ-मोठे खड्डे पडल्याने आतापर्यंत या महामार्गावर अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाचे काम रडखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. रखडलेल्या कामावरून आमदार धीरज देशमुख यांनी चक्क महामार्गावरच कार्यकारी अभियंत्यांना चांगलच झापलं आहे. येत्या 15 तारखेपर्यंत रस्त्याचं काम सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी आ. धीरज देशमुख यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com