मुंबईत ४८ मतांनी अमोल किर्तीकरची निवडणूक चोरली आहे. पदवीधर आणि शिक्षक आजवर जेवढं कधी मतदान झालं नाही तेवढं झालं. कोकण देखील माझंच आहे. हे सगळे त्यांचे अब्दलीची चाळे आहेत, अहमदाबादचे शहा नाहीत अहमद शहा आहेत. आत्ता परत १६ तारखेला येत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
अतिशय दुर्दैवी घटना घडली , 8 तारखेला नाट्यगृह जळून खाक झालं. या नाट्यगृहासोबत भावना जोडल्या आहेत. हे नाट्यगृह राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलं होतं. अशा वास्तू पुन्हा घडणे नाही. अनेकांनी मदतीचा हात दिला, हे नाट्यगृह पुन्हा जसे आहे तसे राहावे अशी मागणी आहे आणि तसंच उभे राहिलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पोहोचत आहेत.
waqf बोर्डाच्या मुद्द्यावरून मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांच्या एका गटाने निषेध केला, मुस्लिम बांधवांचा दुसरा गट मात्र उध्दव ठाकरे यांच्या समर्थनात उतरला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्य अमली पदार्थ तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे. एक कोटी ७५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यता आले आहेत. ७५ किलो गांजासह ४८०० कोडेन सिरपच्या बाटल्या (CBSC ) जप्त केल्या आहेत. उल्हासनगरवरून रॅकेट चालवणाऱ्या ६ जणांना एनसीबीने केली अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये वाकड परिसरातील म्हतोबानगर दत्त मंदिर रोड वाकड येथे रस्ता रुंदीकरणाच्या कामा रम्यान विजेचा खांब कोसळला. यात हातगाडी चालक भाजी विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. नागरिकास हातगाडी चालकाला पुढील उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. विजेचे खांब काढणाऱ्या कंत्राटदाराच्या असम्य दुर्लक्षामुळे ही दुर्घटना झाली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जागृती रॅली सुरू असून आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी भाषण करत असताना त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांनी भाषण थांबवलं आणि खाली बसले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडे घ्या, अशी विनंती करण्यात आली आहे. आज मोदीबाग येथ शरद पवार यांची मतदारसंघाच्या शिष्टमंडळांने भेट घेऊनही मागणी केली आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जमलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी भेट घेण्याची मराठा आंदोलकांनी मागीतली होती वेळ
मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मराठा आंदोलक संतप्त
मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्या घोषणा
मानखुर्दमध्ये रिक्षा चालकांकडून प्रवाशाला मारहाण
मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू
रिक्षा चालकांनी कमरेचा पट्टा काढून प्रवाशाला मारहाण केली.
कारण अद्यापही अस्पष्ट
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील पक्ष संघटनेत हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळे जुन्या दिग्गज नेत्यांना पक्ष सोडण्याची वेळ आलीय. तशीच वेळ माझ्यावर देखील आली असून मी सुषमा अंधारे यांच्या त्रासामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे या सुपारीबाज नेत्या आहेत, असा देखील आरोप संगीता चव्हाण यांनी केलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या परस्पर अनेकांच्या नियुक्ती रखडल्या आहेत, याला सुषमा अंधारे याच जबाबदार असल्याचा आरोप देखील संगीता चव्हाण यांनी केलाय. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात त्या प्रवेश करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील नस्तनपूर येथिल शनीच्या शक्तीपिठांपैकी पुर्णपिठ म्हणून ओळखल्या जाणा-या नस्तनपूर येथे श्रावण शनिवार निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.प्रभू श्रीराम सीतामाईच्या शोधात निघालेले असतांना प्रातकाळी स्नानानंतर सूर्याला अर्ध्य देतांना येथे शनी देवाची वालूकामय मूर्ती हाती लागली आणि त्याची मूर्तीचा नस्तपूर येथे स्थापना केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे श्रावणमासा निमित्त भाविकांची येथे दर्शनाला मोठी गर्दी होत असते.
मनोज जरांगे पाटील सातारा दौऱ्यावर आहेत. त्यांचं कराडमध्ये मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर कराड तालुक्यातील गोटे येथे मुस्लिम बांधवांनी देखील जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केले. मशिदीसमोर हे जरांगे पाटील यांना थांबवून त्यांचं स्वागत केलेल आहे. मुस्लिम समाज हा जरांगे यांच्यासोबत असल्याचं त्यांनी व्यक्त केलेला आहे.
मलकापूर वरून छत्रपती संभाजी नगर ला बस 33 प्रवाशी घेऊन निघाली होती ही बस परडा गाव् फाट्या नजिकच्या वळणावर आली असता समोरून भरधाव वेगाने ट्रक सरळ बसला धडकणार हे बस चालकाच्या लक्षात येताच बस चालकाने तत्काल बस रस्त्याच्या कडेला घेतली यात बसचे ब्रेक सुद्धा लागले नाही रिमझिम पाऊस असल्याने रस्त्याच्या कडेला चिखल असल्याने बस कलंडली.
यंदाच्या बजेटमधून आम्ही तुम्हाला योजना देत आहोत त्यावर विरोधकांची टीका होत आहे. तुम्ही सरकारमध्ये असताना काहीच दिल नाही, देवळात वाजवण्याची घंटा देखील दिली नाही. जे बोलतात ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेत. त्यांना १५०० ची किंमत काय माहिती? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना, अद्यापही कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विसर्जन घाटांची स्वच्छता झालेली नाही. या घाटांची दुरावस्था पाहायला मिळत असून, विसर्जन घाटांवर हिरव्या जलपर्णी आणि निर्माल्याचा खच पडलेला आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिक आणि गणेश भक्तांमध्ये नाराजी आहे. गणेशउत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या तलावांची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
नागपंचमी दिवशीच अतिशय हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. झोपेत असणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला, सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावात घडलीय. भिवराबाई अश्रूबा गणगे वय ६५ असे मयत महिलेचे नाव आहे. मयत भिवराबाई गणगे या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या घरात झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाशिंद ते पडघ्यादरम्यान मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तब्बल ५ ते ६ किलोमीटर वाहतूक कोंडी झाली आहे. प्रवाशांना तासनतास् आपल्या गाडीतच बसून रहावं लागतंय.
ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेपुर्वी डिवचणारे बॅनर्स लागले आहेत. घालीन लोटांगण वंदीन चरण" अशा आशयाचे बॅनर्स लागले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे गुडघे टेकून असलेले व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय. तर उद्धव ठाकरे यांच्यामागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले दाखवण्यात आलंय.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी साधारण एक वाजल्यानंतर सातारा शहरात असणाऱ्या पवई नाका येथील शिवतीर्थ येथून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सातारा शहरांमध्ये ही रॅली निघेल, त्यानंतर सातारा शहरातील गांधी मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी असलेल्या आदिवासी कुटुंबाची झोपडी उद्धवस्त केल्याप्रकरणी शाम सनेर यांनी प्रखर भूमिका घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने शाम सनेर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
सुप्रीम कोर्टाकडून RTE कोट्यातून खाजगी शाळांना सूट देणारा राज्य सरकारचा आदेश रद्द करण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलंय.
-मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील ६ धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. तर ८ धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८५.३३ टक्के पाणीसाठा जमा झालाय. दुसरीकडे माणिकपुंज आणि नाग्यासाक्या धरणांमध्ये मात्र अद्यापही शून्य टक्के पाणी आहे. अत्यल्प पावसामुळे चांदवड, नांदगाव, बागलाण आणि सिन्नर तालुक्यातील काही भागात अद्यापही १११ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर गेल्या तीन वर्षांपासून आसनगाव व वाशिंद येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. बेजबाबदार ठेकेदार यामुळे वाहतूकची व्यवस्था न केल्याने तीन वर्षांपासून शहापूर ते वाशिंद या 7 किलोमीटर च्या अंतरात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष बाब म्हणजे, शुक्रवारी या वाहतूक कोंडी आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाणे शहरात मेळावा घेणार आहेत. यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेपूर्वी ठाणे शहरातील शहरात ठिकठिकाणी त्यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मधल्या चिंचखेडा येथे डेंगूसदृश्य आजाराने 5 वी मध्ये शिकणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून गावात कोरडा दिवस पाळण्याच आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
दिपाली अंबादास वाणी असं या मुलीचं नाव आहे. दरम्यान चिंचखेडा आणि आसपासच्या परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने नदी नाले कोरडेच आहे आणि या ठिकाणी गाजर गवत वाढल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे थंडी ताप आणि डेंग्यू सारखे आजार हळूहळू डोके वर काढायला सुरुवात करत आहे.
मावळ तालुक्याला व पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा 97.17 टक्के झाला आहे. मागील आठवडाभर मावळ तालुक्याला पावसाने झोडपले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.
परंतु आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मागील 24 तासांत केवळ 32 मिलीमीटर पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे पवना धरणातुन विद्युत गृहाद्वारे 800 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे..
छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव मधील गिरडा घाटात आपल्या पिलांसह बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचं दिसून आलंय त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीच वातावरण पसरल्याने नागरिक आपली शेतातील कामे ही अर्धवटच सोडून दिवस मावळायच्या आधीच घराची वाट धरत आहे. त्यामुळे तात्काळ वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.